सतत जिंकण्याची सवय लागली आणि अचानक परायजाला सामोरे जावे लागले की, ती हार पत्करणे खूप जणांना कठीण असते. असेच काहीसे झाले आहे बिग बॉसच्या घरात टीम A च्या बाबतीत. नॉमिनेशन टास्क करताना आपल्यातील कोणी नॉमिनेट होऊ नये यासाठी केलेला प्रयत्न आणि तो करुनही आलेली हार यामुळे सध्या टीम A म्हणजेच गायत्री, मीरा, उत्कर्ष आणि दादूस नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता घरात नवे प्लॅन्स आणि नव्या चर्चांना उधाण आले आहे. जाणून घेऊया या आठवड्याची सुरुवात नेमकी झाली तरी कशी
असे रंगले नॉमिनेशन टास्क
या घरात नॉमिनेशन टास्क म्हणजे राडेच होतात. हे सगळ्यांनाच माहीत झाले आहे. यावेळी घरात एलिएन आला आहे आणि तो वेगवेगळे कार्य करुन घेणार आहे. या सगळ्या टास्कची सुरुवात ही नॉमिनेशन टास्कने झाली यामध्ये टीमला त्याच्या पाठीवर असलेल्या ऑक्सिजन रॅकमध्ये ऑक्सिजनच्या बाटल्या जमवायच्या होत्या. प्रत्येकाकडे तीन टँक असणे गरजेचे होते. टीम B ने यावेळी फारच हुशारीने खेळ खेळला. यावेळी टीममधील विकास, विशाल, मिनल यांना खेळण्याची संधी मिळाली. पहिल्यांदाच टीमचा विचार करुन त्यांनी खेळ खेळल्यामुळे सहा विरुद्ध तीन अशा संघर्षातही त्यांना विजय मिळाला. त्यामुळे या टास्कमध्ये गायत्री, मीरा, उत्कर्ष आणि दादूस असे सगळे नॉमिनेट झाले.दरवेळी विकास-विशालच्या टीममधील लोकांना याला सामोरे जावे लागते. पण पहिल्यांदाच याचा फटका दुसऱ्या टीमला म्हणजेच या घरातील बलाढ्य टीमला बसल्याचे दिसले आहे. त्यामुळेच घरात धुसफूस सुरु झाली आहे. जय या कार्याचे संचालन करत होता. त्याने अगदी योग्य पद्धतीने हे संचालन केले खरे! पण तरीही चोराच्या उलट्या बोंबाप्रमाणे जय आणि उत्कर्षने यावरही आपण बरोबर कसे होतो याची चर्चा रंगवली.
या कारणासाठी हनिमूनला नाही जाणार राजकुमार राव आणि पत्रलेखा
पहिल्यांदा दादूस खेळले
दादूस कायमच जय,उत्कर्षच्या मागे राहतात असे अनेकदा दिसून आले आहे. पण या टास्कच्या निमित्ताने स्वत:ला नॉमिनेशनपासून रोखण्यासाठी त्यांनी चांगला खेळ खेळला. दुसऱ्या टीमकडून बॉटल घेण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. ते जरी यातून पहिले बाहेर पडले असले तरी देखील त्यांचा खेळ पहिल्यांदा पाहायला मिळाला. त्यामुळे खूप जणांना दादूस तुम्ही खेळलात असे झाले.
Bigg Boss Marathi: अक्षय वाघमारे पुन्हा घेणार का एंट्री
उत्कर्षने खेळला डाव
कायम दादूसला पुढे करुन ते या घरात मोठे आहे म्हणून टीम A संधी साधते हे कधीच त्यांना कळलेले नाही. आताही उत्कर्षने त्यांना वाचवण्यासाठी आपली बॉटल दिलेली नाही. तुम्ही दुसऱ्या टीमकडून घ्या असे म्हणून त्यांना चांगलेच जुंपायला भाग पाडले. दादूस खेळले हे फारच चांगले झाले पण तरीदेखील प्रत्येकवेळी उत्कर्ष संधी साधून नेतो. इतकेच नाही तर प्रत्येक वेळी असे होऊन देखील दादूसना अजूनही ही गोष्ट कळत नाही याचे आश्चर्य
आता या नॉमिनेशनचा फटका नेमका कोणाला बसेल ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
टिप टिप पानी बरसा’ गाण्यातून गोविंदाचा कमबॅक, चाहत्यांनी दिल्या या प्रतिक्रिया