ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
birthday wishes for teacher in marathi

Happy Birthday Wishes For Teacher In Marathi | शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचं स्थान हे अढळ असतं. प्रत्येकाला आपल्या शाळेतील अथवा महाविद्यालयातील एक असा गुरू प्रिय असतोच ज्याच्याशिवाय आपलं पान हलत नाही आणि आपणही कोणत्या ना कोणत्या शिक्षकांचे आवडते विद्यार्थी अथवा विद्यार्थीनी असतोच. गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा तर आपण नेहमीच देतो. मात्र आपल्या शिक्षकांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देण्यासाठी (teacher birthday wishes in marathi) आम्ही हा लेख लिहित आहोत. तुम्हीही तुमच्या शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (birthday wishes for teacher in marathi) देण्यासाठी आम्ही दिलेल्या शुभेच्छांचा आधार घेऊ शकता. आपल्या जवळच्या आणि आवडत्या टिचर्सचे आभार मानून शुभेच्छा देण्यासाठी (happy birthday wishes in marathi for teacher) काही खास संदेश. 

शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Teacher In Marathi

Birthday Wishes For Teacher In Marathi
Birthday Wishes For Teacher In Marathi

गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वरा हा श्लोक आपण अगदी शाळेपासून पाठ करून ठेवलेला असतो आणि त्याचा अर्थ आपण आयुष्यभर आपल्या शिक्षकांच्या बाबतीत पाळतोच. गुरूपौर्णिमेची माहिती तर आपल्याला माहीत आहेच. आपल्या शिक्षकांचा वाढदिवस हादेखील आपल्यासाठी खास असतो. अशाच आपल्या आवडत्या शिक्षकांना शुभेच्छा देण्यासाठी (birthday wishes for teacher in marathi) आपण पाहूया काही खास शुभेच्छा संदेश (birthday msg for teacher in marathi).

1. जीवनाच्या प्रत्येक समस्येत जर कोणी मार्ग दाखवत असेल तर ते आहात तुम्ही, जेव्हा काय करावे काहीही समजत नाही तेव्हा तुम्ही दिलेल्या शिकवणीची आठवण येते, तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून खरोखर धन्य झालो आहोत आम्ही! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा टीचर

2. शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे ‘शिक्षक’ असं प्रत्येकालाच वाटतं आणि त्यात काही नवल नाही. अशाच आमच्या प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

3. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कसं चालावं याचा उत्कृष्ट धडा देणार्‍या शिक्षकरूपी देव माणसाला शतशः नमन आणि जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

4. केवळ धडेच नाही तर आयुष्यातील प्रत्येक धडा कसा गिरवायचा याचा पायाच घालून देता तुम्ही. अशा माझ्या आवडत्या शिक्षकांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा

5. आई हा पहिला गुरू हे खरं आहे. मात्र तुम्ही आम्हाला घडवले आहे हे विसरून चालणार नाही. तुमच्या शाबासकीची थाप पाठीवर पडणं म्हणजे सर्वकाही प्राप्त करणं. वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा टीचर

6. अक्षर अक्षर तुम्ही आम्हाला शिकवता शब्द शब्दांचा अर्थ सांगता कधी प्रेमाने तर कधी रागाने जीवन जगणे आम्हाला शिकवता, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तयार करता. हॅप्पी बर्थडे 

ADVERTISEMENT

7. ज्ञानाचा महासागर, दयाळूपणाचा कळस अशा माझ्या प्रेमळ शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

8. शिक्षक हे एक प्रकारचे शेतकरी आहे जे मेंदूत ज्ञानाचे आणि हृदयात संस्कारांचे बी पेरतात आणि त्याचेच पुढे फळ मिळते. अशा माझ्या शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

9. ते ज्ञान आणि प्रेमाचे आहेत महासागर त्यांच्यावर बहरतात दगड देखील मोती बनून कधीही भेद न करता रंग, रूप आणि आकार. त्यांची शिकवण प्रत्येकास असते समान. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

10. एक मित्र, मार्गदर्शक आणि वेळप्रसंगी आपले नातेवाईक म्हणूनही भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या माझ्या शिक्षकांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

गुरूवर्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi For Teacher

Happy Birthday Wishes In Marathi For Teacher
Happy Birthday Wishes In Marathi For Teacher

गुरूशिवाय कोणतेच ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. अशा आपल्या आवडत्या शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी (birthday wishes for teacher in marathi) खास संदेश. 

1. गुरूशिवाय कोणतेही जीवन साकार होत नाही. जेव्हा गुरूंचा हात डोक्यावर असतो तेव्हा जीवनाला मिळतो आकार. Happy Birthday 

2. ज्ञानाचा हात माझ्या डोक्यावर ठेवल्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

3. केवळ आमचे शिक्षकच नाही तर आमचे मित्र झाल्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

4. उगवता सूर्य हा नेहमी तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, देव आपणास सदा सुखात ठेवो हीच सदिच्छा. वाढदिवसाच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!

5. सामान्य शिक्षक सांगतात, वरीष्ठ शिक्षक स्पष्टीकरण देतात तर तुमच्यासारखे महान शिक्षक हे प्रेरित करतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा!

6. गुरूविना मिळे ना ज्ञान, ज्ञानाशिवाय होईना जगी सन्मान. अशा ज्ञान देणाऱ्या आमच्या शिक्षकांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!

7. आपली सारी स्वप्ने साकार व्हावीत. आपला आजचा वाढदिवस हा आपल्यासाठी आयुष्यभराची आठवण ठरावी. खूप खूप शुभेच्छा टीचर

ADVERTISEMENT

8. तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. मनात आमच्या एकच इच्छा सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे…वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

9. गुरू तो सेतू असतो जो ज्ञान आणि विद्यार्थ्याला जोडण्याचे कार्य करतो. माझ्यासाठी हा सेतू कायम तुम्हीच असाल. वाढदिवसाच्या भरघोस शुभेच्छा!

10. आपणास उदंड आयुष्य लाभो. वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

वाचा – Special Birthday Wishes For Mama In Marathi

ADVERTISEMENT

प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Best Teacher In Marathi

Happy Birthday Wishes For Best Teacher In Marathi
Happy Birthday Wishes For Best Teacher In Marathi

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा तर दिल्या जातात. मात्र वाढदिवसाच्याही शुभेच्छा तुम्ही देऊ शकता. द्या शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मनःपूर्वक!

1. तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशीर्वादापेक्षा कमी नाही माझे जग संपूर्णतः बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद. Happy birthday टीचर

2. टेक्नॉलॉजी फक्त एक साधन आहे मुलांना प्रेरित करण्यासाठी शिक्षकाची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहील यात काहीच शंका नाही. वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

3. मला वाटते आजचा दिवस “मी तुमचा आभारी आहे” हे सांगण्यासाठी सर्वोत्तम आहे. हॅपी बर्थडे टीचर

ADVERTISEMENT

4. तुम्ही आमचे शिक्षक असण्यासोबतच एक चांगले मित्र आणि मार्गदर्शकही आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

5. पाटी-पेन्सिल पासून सुरु करुन पुस्तके आणि फळ्यापर्यंत ते शिकवत राहिले, वाढत्या वयाच्या वर्गात माझ्या ज्ञानात काही न काही भर देत राहिले आणि काय सांगू तुम्हास आज बदलत्या वेळेसोबत ते आम्हास ऑनलाईनदेखील शिकवत राहिले. शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

6. मला एक जबाबदार व्यक्ती बनविल्याबद्दल आणि एक उत्तम नागरिक घडविल्याबद्दल माझ्या शिक्षकांचे धन्यवाद. तुम्हाला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा

7. चांगले शिक्षक नशीबाप्रमाणे असतात, जे फक्त ईश्वराच्या आशीर्वादानेच मिळतात. आजचा दिवस तुमचे आभार मानण्यासाठी उत्तम आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

8. माझे शिक्षक, जे एक मित्र, मार्गदर्शक, संरक्षक आणि अखंड प्रेरणेचा स्त्रोत आहेत. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

9. खरा शिक्षक तो जो विद्यार्थ्यांना उद्याची आव्हाने पेलण्यास शिकवतो. तुम्हाला वाढदिवसाच्या भरघोस शुभेच्छा मॅडम

10. अज्ञानाच्या अंधःकारातून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या प्रकाशात आणणाऱ्या आमच्या शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima Wishes In Marathi

ADVERTISEMENT

शिक्षकांकरिता वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स | Birthday Quotes In Marathi For Teacher

Birthday Quotes In Marathi For Teacher
Birthday Quotes In Marathi For Teacher

जगात कसं वागायचं हे आपल्या शिक्षकांपेक्षा अधिक चांगलं कोण शिकवू शकतं. अनुभव हा आयुष्याचा शिक्षक असतो असं म्हणतात. मात्र आयुष्यात चांगले शिक्षक मिळणं हे भाग्याचं ठरतं. अशाच शिक्षकांच्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा संदेश (birthday quotes in marathi for teacher).

1. गुरुजी आपल्या उपकारांचे कसं काय फेडू मी मोल, लाख किमती असले धन जरी परंतु गुरु माझे आहेत अनमोल! सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

2. माझ्या आयुष्याला योग्य दिशा व ध्येय देणाऱ्या अशा माझ्या प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

3. माझ्या आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद असे ज्ञान देणाऱ्या माझ्या प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

4. गुरु तोच असतो महान जो देतो सर्वांना ज्ञान. वाढदिवशी तुमच्या गुरूंच्या मी करिते प्रणाम. माझ्या गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

5. गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही. ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंमुळेच प्राप्त आहे. अशा माझ्या प्रिय गुरूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

6. हिऱ्याप्रमाणे तुम्ही मला सजवले, देऊन ज्ञान मला जगणे शिकवले. Wish you very very happy birthday sir/madam

7. गुरुजी तुमच्या कृपेने आमचा झाला आहे उद्धार, आज जे काही आहोत आम्ही हे तुमचेच आहेत उपकार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

8. नेहमी असू द्या तुमचे असेच प्रेम आणि आशीर्वाद आम्हावर. हीच प्रार्थना आहे चरणी आपल्या गुरूवर! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर

9. भारतीय संस्कृतीत गुरुंचे स्थान अत्यंत आदरणीय आहे. असे माझे दैवत असणाऱ्या माझ्या गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

10. आई वडिलांनी जन्म दिला परंतु गुरूंनी जगणे शिकवले आहे, ज्ञान, चरित्र आणि संसाराचे शिक्षण आम्ही मिळवले आहे. lots of birthday wishes to you sir/madam

मराठीतून शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Msg For Teacher In Marathi

Birthday Msg For Teacher In Marathi
Birthday Msg For Teacher In Marathi

आयुष्यात योग्य दिशा हवी असेल तर शिक्षकावाचून दुसरा पर्याय नाही. आपले आयुष्य घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो. अशाच आपल्या शिक्षकांना द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday msg for teacher in marathi). 

ADVERTISEMENT

1. गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया. हॅप्पी बर्थडे मॅडम

2. आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगरघाट गुरूविण कोण दाखविल वाट..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

3. माझे शिक्षक हे माझ्यासाठी देवासारखेच आहेत. अशा माझ्या देवाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

4. अगणित माणसे या भूतलावर जन्माला येतात पण तुमच्यासारखे शिक्षक मिळणे आमच्यासारख्या भाग्यवान विद्यार्थ्यांचे नशीब आहे…तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

5. आमच्यावर असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद निरंतर राहोत. तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

6. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि अशाच पिढ्या घडत राहोत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

7. ज्याच्या मनात गुरुंविषयी सन्मान असतो, त्यांच्या पायाशी सारे जग असते. हेच त्रिवार सत्य आहे, अशा माझ्या देवाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

8. एखादा गुरु हा मेणबत्तीसारखा असतो, जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वत: जळत राहतो आणि तुम्ही तसेच आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

ADVERTISEMENT

9. गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे, ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे. तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

10. शांतिचा पाठ पठवून, अज्ञानाचा मिटवला अंध:कार, गुरुने शिकवले आम्हाला, कसा मिळवावा रागावर प्रेमाचा विजय, अशा माझ्या गुरुंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

तुम्हीदेखील तुमच्या आवडत्या शिक्षकांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना खास शुभेच्छा संदेश पाठवा आणि करा त्यांना आनंदी. तुम्हाला आमचे हे शुभेच्छा संदेश नक्की कसे वाटले आम्हाल नक्की कळवा आणि शेअर करा. 

06 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT