कोरोना व्हायरसच्या भितीमुळे गेल्या तीन महिन्यापासून जास्त काळ सर्वजण लॉकडाऊन होते. आता अनलॉक 2 सुरू झालं असलं तरी सर्वजण घरातच खऱ्या अर्थाने सुरक्षित आहेत. आज आषाढी एकादशी… पण विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भक्तांना यंदा वारी विनाच आषाढी साजरी करावी लागत आहे. सरकारतर्फे अजून काही दिवस सोशल डिस्टन्सिंग अधिक कठोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांतही घरात राहून आणि कोणत्याही धार्मिक स्थळी गर्दी न करता अत्यंत साधेपणाने सण साजरे करावे लागणार आहेत. सोशल मीडियावरून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. कोरोनाचे संकट पिटाळून लावण्यासाठी आपण सर्वांनीच घरात राहून हे प्रयत्न केले पाहिजेत व सकारात्मक विचार करून या संकटाशी दोन हात केले पाहिजेत. म्हणूनच टेलिव्हिजन माध्यमांतर्फे यंदा अशा प्रकारे आषाढी साजरी केली जाणार आहे.
विठ्ठल नामाचा गजर आणि लोकसंगीताचा जागर
कोरोनाच्या या संकटामुळे यंदा सर्वजण आषाढी वारीला मुकले आहेत. म्हणूनच सर्वांसाठी “आषाढी एकादशी” निमित्त टेलिव्हिजवर एक सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एकादशी म्हटली की आढवतो तो टाळ,मृदुंग आणि विठ्ठल नामाचा गजर. म्हणूनच झी टॉकीजने रात्री 8.30 वाजता “बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल” या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एवढंच नाही तर या कार्यक्रमातून आपल्या लाडक्या विठ्ठलाला साद घालण्यासाठी अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. दोन तासांच्या या सांगीतिक भेटीत प्रेक्षकांना गायन, वादन, नृत्य, भारूड, भजन अश्या अनेक कलांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.
काय असणार या सांगीतिक मैफिलीत
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल या कार्यक्रमात भारतरत्न पं . भीमसेन जोशी यांचे स्वर्गीय सूर तुम्हाला घरातूनच अनुभवता येणार आहेत .पंडितजींची अभंगवाणी ऐकताना लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच विठ्ठलाशी एकरूप होऊन जातात. याशिवाय आर्या आंबेकर, आदर्श शिंदे, कार्तिकी गायकवाड, सोनाली कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, आदिनाथ कोठारे हे सर्व लाडके कलाकार आणि गायक या कार्यक्रमातून आपल्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसंच जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन सादर होणार आहे तर धुंडा महाराजांचा आदर्श घेवून भारूड सादरीकरणाला सुरूवात करणाऱ्या, भारूडाची पंरपरा जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील जेष्ठ लोककलावंत “चंदाताई तिवाडी” भारूड सादर करणार आहेत. या कठीण काळात पांडुरंगाशी एकरूप होत ,सकारात्मक राहण्याची प्रेरणा आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची एक अनोखी संधी यातून सर्वांना मिळणार आहे. पंढरपूरला न जाताही आषाढी एकादशीचा दिव्य अनुभव यामुळे भक्तांना यातून नक्कीच घेता येईल. महाराष्टाचं दैवत पंढरपूर आज आषाढीला नेहमीप्रमाणे दुमदुमलं नाही तरी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात विठू नामाचा गजर नक्कीच होणार. त्यामुळे नामस्मरणाच्या आणि सकारात्मकतेच्या या दिव्य लहरी संपूर्ण विश्वाला या संकटातून बाहेरे काढतील अशी आशा प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे.
खूप दिवसांपासून तुमची आमची भेट झाली नव्हती. पण आजपासून गॉसिप, मेकअप टीप्स आणि तुमच्या आवडीचे सगळे विषय घेऊन POPxo marathi येत आहे.
अधिक वाचा –
आषाढी एकादशीच्या उपवासाला खा हे ‘आरोग्यदायी पदार्थ’
दिवसाची सुरूवात करा या पहाटेच्या भक्ती गीतांनी – Morning Devotional Songs In Marathi
उपवास करत आहात, तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि नुकसान (Benefits Of Fasting In Marathi)