ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
लग्न न करता चाळीशी पार करूनही मजेत जगत आहेत ‘या’ अभिनेत्री

लग्न न करता चाळीशी पार करूनही मजेत जगत आहेत ‘या’ अभिनेत्री

मुलींना नेहमीच घरातून ऐकवलं जातं की, अमुक एक वय झालं की, लग्न होणं कठीण आहे. एक वय सरायला लागलं की, लग्न होणं कठीण असतं. पण मुलींना लग्न करायचं आहे की नाही हे त्यांचं त्यांनी ठरवणं योग्य आहे. पण आपल्या बॉलीवूडमध्ये अशा काही तगड्या अभिनेत्री आहेत ज्यांनी चाळीशी गाठली असली तरीही अजून लग्न केलेलं नाही आणि तरीही त्या अगदी मजेत आहेत. आपलं लग्न झालं नसल्याचा जराही त्यांना कोणताही फरक पडलेला दिसून येत नाही. समाजातील लग्नाची असलेली बंधनं झुगारून देत स्वतःच्या हिमतीवर या अभिनेत्री जगत आहेत. वयाची 40 वर्ष पूर्ण झाली असली तरीही त्यांनी अजूनपर्यंत कोणताही लग्नाचा विचार केलेला नाही. यांची नावं काही जणांबरोबर जोडली गेली आणि पुन्हा ब्रेकअपच्या न्यूजही आल्या. पण तरीही या अभिनेत्री आपल्या कुटुंबासमवेत अतिशय मजेत आयुष्य जगत आहेत आणि लग्न न करताही आपण मजेत जगू शकतो याचा एक आदर्शच या अभिनेत्रींनी घालून दिला आहे.  

बॉलीवूडमधील अभिनेत्री ज्या अजूनही आहेत अविवाहित

आम्ही तुम्हाला अशा काही बॉलीवूडमधील अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यासाठी लग्न ही प्राथमिकता कधीच नव्हती. मात्र यांंचं लव्ह लाईफ हे कायमच न्यूजमध्ये राहिलं आहे. अविवाहित राहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मुलींसाठी  नक्कीच या अभिनेत्री आदर्श ठरू शकतात. जाणून घेऊया कोणत्या आहेत अशा अभिनेत्री 

तब्बू

Instagram

ADVERTISEMENT

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना आपलंसं करणारी अशी अभिनेत्री म्हणजे तब्बू. आपल्या लव्ह लाईफबद्दल तब्बू नेहमीच चर्चेत राहिली होती. पण तिने आपलं नातं कधीही लपवण्याचा प्रयत्न केला नाही. मग ते ‘प्रेम’ या चित्रपटादरम्यान संजय कपूरबरोबर असणारं अफेअर असो अथवा दिव्या भारतीच्या निधनानंतर साजिद नाडियादवालासह असणारी तिची मैत्री असो. तसंच साऊथ सुपरस्टार नागार्जुनसाठी तब्बूने लग्न केलं नाही असं म्हटलं जातं. पण तब्बूने कधीही याबाबत काहीच सांगितलं नाही. पण तिचं आयुष्य हे अगदी ‘खुली किताब’ असल्याचंही म्हटलं जातं. तब्बल दहा वर्ष नागार्जुन आणि तब्बू एकमेकांना डेट करत होते. जेव्हा तब्बूला खात्री पटली की, नागार्जुन कधीही त्याच्या बायकोला सोडणार नाही तेव्हा तिने आपला रस्ता बदलला असंही सांगण्यात येतं. या अफेअर्सनंतरही 47 वर्षांची तब्बू अजूनही सिंगल असून मजेत आपल्या मित्रपरिवारासह आयुष्य व्यतीत करत आहे. 

सुष्मिता सेन

Instagram

सुष्मिता सेनचं लव्ह लाईफदेखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. सध्या सुष्मिता मॉडल रोहमन शॉल याच्याबरोबर नात्यात असून रोहमन हा तिच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. यापूर्वी सुष्मिताचंं नाव ऋतिक भासीन, दिग्दर्शक विक्रम भट, सेलिब्रिटी मॅनेजर बंटी सचदेव, इम्तियाज खत्री, अभिनेता रणदीप हुडा आणि क्रिकेटर वासिम अक्रम या सर्वांसोबत जोडण्यात आलं होतं. सुष्मिता आणि रोहमन लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण तरीही 43 वर्षीय सुष्मिताने आतापर्यंत लग्न केलं नसून दोन मुलींना दत्तक घेऊन ती त्यांची काळजी घेत आहे. शिवाय ती नेहमीच आपले फिटनेस व्हिडिओदेखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

ADVERTISEMENT

बॉलीवूडपासून दुरावलेल्या मल्लिका शेरावतचा ‘फिटनेस फंडा’

अमिषा पटेल

Instagram

अमिषा पटेलने धुमधडाक्यात बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पण अमिषाला स्टारडम टिकवता आलं नाही. पण तिच्या अफेरर्सची चर्चा मात्र राहिली. दिग्दर्शक विक्रम भट याच्यासह अनेक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अमिषा राहात होती. पण त्याच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर अमिषाच्या आयुष्यात लंडनमधील उद्योगपती कनव पुरी आला. पण त्याच्याबरोबरीही तिचं ब्रेकअप झालं. 43 वर्षांची अमिषा आजही सिंगल असून एक प्रॉडक्शन हाऊस असून ती आपल्या मित्रपरिवारासह मजेत आयुष्य जगत आहे. तसंच तिचे फोटोशूटचे व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात.  

ADVERTISEMENT

शमिता शेट्टी

Instagram

बॉलीवूड अभिनेत्री आणि शिल्पा शेट्टीची लहान बहीण शमिता शेट्टीबद्दल कधीच कोणत्याही गॉसिप्स झाल्या नाहीत. तिचं कोणाही बरोबर नाव जोडलं गेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार शमिताला लग्नबंधनाची भीती वाटते. शमिताच्या मते हल्ली जोडीदारांमध्ये एकमेकांबद्दल सन्मान दिसून येत नाही आणि तिला अशा कोणत्याही बंधनात राहायचं नाही जिथे सन्मान नसेल. कारण कोणतंही असो पण सध्या शमिताचं वय 40 आहे आणि शमिता शेट्टीदेखील सिंगल क्लबमध्येच आहे.  

भारती सिंह लवकरच देणार Good News, आई होण्याची आहे इच्छा

ADVERTISEMENT

तनिषा मुखर्जी

Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री तनुजाची मुलगी आणि काजोलची लहान बहीण तनिषा मुखर्जीचं अभिनेता अरमान कोहलीबरोबर अफेअर होतं. ‘बिग बॉस’मध्ये भेट झाल्यानंतर दोघेही नात्यात होते. पण काही वर्षांनंतर अरमानच्या वागण्यामुळे त्यांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातं. त्यापूर्वी तनिषाचं नाव यश चोप्राचा मुलगा उदय चोप्रा याच्यासह जोडण्यात आलं होतं. या दोन ब्रेकअपनंतर तनिषाला लग्न करण्याची इच्छा नाही असं म्हटलं जातं. ती आपली आई आणि आपल्या बहिणीसह तसंच आपल्या मित्रपरिवारासह आनंदी असल्याचं सांगते. 40 वर्षीय तनिषा इतक्यात तरी लग्नबंधनात अडकणार असल्याची कोणतीही चिन्हं नाहीत. त्यामुळे तीदेखील सिंगल या गटातच आहे.

#VFX च्या मदतीने पहिल्यांदाच होणार 100 मराठी लघुपटांची निर्मिती

ADVERTISEMENT
16 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT