भारताच्या तुलनेत पाश्चिमात्य देशात या कर्करोगाचे प्रमाण खूपच जास्त आहे. भारतातील स्त्रियांमध्ये सर्व कर्करोगापैकी गर्भाशयमुखाच्या कर्करोगानंतर स्तनाच्याच कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. हा कर्करोग ग्रामीण स्त्रियांपेक्षा शहरी स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. वयोमानाप्रमाणे या कर्करोगाची जोखीमसुद्धा वाढते. हा कर्करोग वयाच्या 30 वर्षांआधी क्वचितच तर 50 वर्षांनंतर जास्त प्रमाणात आढळतो. स्तनाचा कर्करोग आणि मॅस्टक्टॉमी उपचाराने स्तन काढून टाकल्याने स्त्रियांना मानसिक धक्का बसून नैराश्याचा सामना करावा लागू शकतो. मॅस्टक्टॉमीनंतर स्त्रीत्व गमावल्याच्या मानसिकतेमुळे मानसिक ताण, नकारात्मकता, भय आणि प्रियजनांपासून विभक्त होण्याची भिती आदी बाबी स्तनाचा कर्करोगाच्या रुग्णांमध्ये आढळून येतात.
ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे ब्रेस्ट कॅन्सर स्पेशालिटी युनिट हे संपूर्ण जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरात अग्रगण्य आहे. प्रत्येक बाब अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्यासाठी आमच्याकडे अनुभवी ब्रेस्ट ऑन्कोलॉजी तज्ञ आणि तज्ञांची टीम आहे. स्त्रीयांना अवघडल्यासारखे वाटू नये यासाठी या टिममधील सर्व सदस्य (निदान ते उपचारापर्यंत) महिला आहेत. रुग्णाला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय निर्देशानुसार सर्व प्रक्रिया व नियमांचे पालन केले जाते. या सेंटरच्या वतीने स्तन कर्करोगाविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले असून त्यांच्यातील कर्करोगविषयीची भिती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉ तेलज गोरासिया – खडकबाण, स्त्री कर्करोग तज्ज्ञ, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, सातारा यांच्याकडून आम्ही अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
स्तनाच्या कर्करोगावरील उपचार:-
freepik
1) शस्त्रक्रिया करून कर्करोग काढून टाकणे.
2) कर्करोग झालेल्या भागावरती विकिरणोपचार करणे (रेडिएशन थेरपी)
3) रसायन शास्त्रानुसार औषधोपचार व विकिरणोपाचर करणे (केमोथेरपी – रेडिएशन थेरपी)
4) संप्रेरक औषधोपचार (हार्मोनल थेरपी )
> वरीलपैकी कोणती उपचार पद्धती रुग्णास योग्य आहे हे कर्करोग तज्ज्ञ ठरवतात आणि योग्य उपचार करतात.
> वैद्यकीय शास्त्रानुसार कर्करोग झालेला भाग शस्त्रक्रिया करून काढून टाकणे ही उपचारती रुग्णास जास्त फायद्याची असल्याचे सिद्ध झाले आहे. स्तनाच्या कर्करोगामध्ये शस्त्रक्रिया करण्याच्या प्रमुख दोन पद्धती आहेत.
1) एमआरएम (मॅस्टक्टॉमी):- यामध्ये कर्करोग झालेले स्तन आणि त्या बाजूच्या काखेतील गाठी पूर्णपणे काढून टाकल्या जातात.
2) बीसीटी (ब्रेस्ट कन्झर्व्हिंग थेरपी):- यामध्ये स्तनाचा फक्त कर्करोग काढला जातो आणि त्याबरोबर काखे गाठी काढल्या जातात, आणि स्तनाचा निरोगी भाग आहे तसाच ठेवला जातो.
लठ्ठपणा ठरतोय कर्करूग्णांच्या मृत्यूला कारणीभूत, तज्ज्ञांचे मत
काळजीपूर्वक केली जाते स्तन संवर्धन शस्त्रक्रिया
ज्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर संपूर्ण स्तनच काढून टाकण्याची मॅस्टक्टॉमी ही शस्त्रक्रिया केली जाते, तर ज्यांच्यात केवळ गाठ काढून टाकून भागते, त्या स्त्रियांमध्ये कॅन्सरवर मात करण्याचे प्रमाण समान असते, असे तज्ञांच्या अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. संपूर्ण स्तनच काढून टाकल्याने कर्करोग पसरणार नाही असे अनेकांना वाटते, प्रत्यक्षात असे घडत नाही. उलट स्तन संवर्धनाच्या (ब्रेस्ट कन्झर्व्हिंग) शस्त्रक्रियेने देखील कर्करोगावर मात करण्यास नक्कीच फायदा होतो. 20 वर्षांहून अधिक काळापासून सुरु असलेल्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, रेडिएशन थेरपीसह स्तन संवर्धन शस्त्रक्रिया काळजीपूर्वक निवडलेल्या रूग्णांमध्ये मॅस्टक्टॉमी म्हणून समान परिणाम देतात. आजही सर्जन आणि रुग्ण सर्जिकल निवड म्हणून मॅस्टक्टॉमी प्राधान्य देतात. ऑन्को लाइफ केअर कॅन्सर सेंटरचे ब्रेस्ट कॅन्सर स्पेशालिटी युनिटमध्ये आतापर्यंत पाच महिलांनी स्तन संवर्धनाच्या (ब्रेस्ट कन्झर्व्हिंग) शस्त्रक्रिया करून घेत कर्करोगाशी यशस्वी लढा दिला आहे. यामाध्यातून अशा स्त्रियांमधील आत्मविश्वास देखील वाढला आहे. पाश्चात्य लोकसंख्येमध्ये, आरंभिक टप्प्यातील ट्यूमरसाठी बीसीएसचा दर 45 ते 60 टक्के इतका होता. तथापि, भारतात हे प्रमाण 10 ते 40 टक्के इतके आहे. स्तनपक्ष संवर्धन उपचारासाठी काळजीपूर्वक रूग्णांची निवड करणे हा एक प्रमुख निकष आहे आणि आपल्या स्तन कर्करोगाच्या शल्यचिकित्सकांशी याबद्दल सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे.
स्थानिक स्तनाचा कर्करोग असलेल्या बहुतेक महिलांमध्ये मॅस्टक्टॉमी आणि स्तन संवर्धन शस्त्रक्रिया (बीसीएस) दरम्यान निवड असते. क्लिनिकल घटकांना बाजूला ठेवून हा निर्णय सर्जन आणि रुग्णांच्या वैशिष्ट्यांशी संबंधित असू शकतो. स्तनाच्या कर्करोगात कॅन्सर पेशी नष्ट करण्यासाठी रेडिएशन थेरपीमध्ये उच्च-उर्जेचा एक्स-रे आणि इतर कणांचा वापर केला जातो. वेगाने वाढणाऱ्या कॅन्सर पेशींवर हे उपचार अत्यंत प्रभावी आहे. रेडिएशन थेरपीचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे शस्त्रक्रियेनंतर स्तनामध्ये किंवा लिम्फ नोड्समध्ये किंवा आजूबाजूला जीवंत राहिलेल्या कुठल्याही कॅन्सर पेशी नष्ट करणे हा आहे.
कॅन्सरचा धोका टाळायचा असेल तर करा नैसर्गिक पदार्थांचा वापर
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक