ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
chakali‌ ‌recipes‌ ‌in‌ ‌marathi‌

Chakli Recipe In Marathi | चकली रेसिपी मराठी

‌गौरीगणपती, नवरात्र, दिवाळी हे सण जवळ आले की घरोघरी फराळाची लगबग सुरू होते. कारण या काळात गौरीगणपती, देवीचे दर्शन करण्यासाठी, आप्त स्वकीयांना भेटण्यासाठी पाहुणेमंडळी घरी येतात. घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी घरी फराळाची रेलचेल असते. पूर्वी अशा सणांना विविध पक्कान्ने बनवली जात असत. मात्र आजकाल लाडू, चिवडा, चकली, कंरजी, शंकरपाळे असे बेसिक पदार्थ फराळात  आवर्जून केले जातात. चकली चविला स्वादिष्ट  आणि खायला कुरकुरीत असल्यामुळे अनेकांच्या घरी बाराही महिने केली जाते. चकली कशी बनवायची हे एकदा कळलं की चकलीची भट्टी चांगली जमते. दिवाळीसाठी फराळात खास चकली (Diwali‌ ‌Chakli‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi) चा बेत केला जातो.पहिल्यांदा बनवताना चकली करणं फार अवघड असेल वाटू शकतं. मात्र एकदा तुम्ही करून पाहिली  की तुम्ही अगदी झटपट चकली (Zatpat‌ ‌Chakli‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi) बनवू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला चकली बनवण्याचे हे विविध प्रकार नक्कीच माहीत असायला हवे. तेव्हा या चकली रेसिपीज (Chakli‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi‌)  ट्राय करा आणि यंदाचा सण आनंदाने साजरा करा. यासोबतच ट्राय करा गौरीगणपती, दिवाळीसाठी खास करंजी रेसिपीज (Karanji Recipe In Marathi)

भाजणीची चकली रेसिपी मराठी | Bhajni‌chi ‌Chakli‌ ‌Recipe‌ ‌in‌ ‌Marathi‌

Chakali‌ ‌Recipes‌ ‌In‌ ‌Marathi‌

चकली म्हटली की सर्वात आधी समोर येते स्वादिष्ट , खमंग आणि कुरकुरीत भाजणीची चकली (Bhajnichi‌ ‌Chakli‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi‌). दिवाळीच्या फराळात ही चकली आवर्जून बनवली जाते. यासाठीच जाणून घ्या ही चकली कशी बनवायची.

साहित्य –

  • सहा वाटी तांदूळ
  • तीन वाटी चण्याची डाळ
  • दीड वाटी उडदाची डाळ
  • एक वाटी मूगाची डाळ
  • दोन चमचे जिरे
  • दोन चमचे  धणे
  • दोन चमचे लाल तिखट
  • दोन चमचे चकली मसाला
  • मीठ
  • हळद
  • पाणी
  • ओवा
  • पांढरे तीळ
  • तूप
  • तेल

कृती –

ADVERTISEMENT

कढईत धान्य प्रत्येकी मंद गॅसवर भाजून घेणे

धणे, जिरे तव्यावर भाजून घेणे

थंड झाल्यावर सर्व साहित्य एकत्र करून घरघंटीवर जाडसर पीठ दळून घ्यावे

एका भांड्यात चार वाटी पाणी उकळत ठेवावे

ADVERTISEMENT

पाणी उकळले की त्यामध्ये तिखट, चकली मसाला, चवीनुसार मीठ, हळद,ओवा, पांढरे तीळ, तूप टाकून गॅस बंद करा. 

चार वाट्या भाजणी त्या पाण्यात टाका आणि उलथण्याच्या टोकाने चांगले ढवळून घ्या.

भांड्यावर झाकण ठेवून साहित्य थंड होऊ द्या.

दोन ते तीन तासांनी भाजणी मळून घ्या

ADVERTISEMENT

चकलीच्या साच्यामध्ये भाजणीचे  गोळे भरा आणि चकल्या पाडा

चकली मंद गॅसवर कुरकुरीत तळून घ्या.

दिवाळीचा खास फराळ, मराठमोळ्या फक्कड रेसिपीज (Diwali Faral Recipes In Marathi)

Maida‌ ‌Chakli‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi‌ | मैदा चकली रेसिपी मराठी

Chakali‌ ‌Recipes‌ ‌In‌ ‌Marathi‌

सणासुदीचे दिवस जवळ आले की घरी फराळीची रेलचेल असते. अशा वेळी नेहमीच्या भाजणीच्या चकलीचा कंटाळा आला असेल तर बनवा खास मैद्याची चकली (Maida‌ ‌Chakali‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌mMarathi‌).

ADVERTISEMENT

साहित्य –

  • तीन वाटी मैदा
  • एक वाटी मूडडाळीचे पीठ
  • एक चमचा बटर
  • दोन चमचे तीळ
  • एक चमचा ओवा
  • एक चमचा जिरे
  • हिंग
  • हळद
  • मीठ चवीनुसार
  • लाल तिखट

कृती –

मैदा आणि मूडडाळीचे पीठ कापडात गुंडाळून कुकरमध्ये वीस मिनीटे वाफवून घ्या.

थंड झाल्यावर पीठ फोडून घ्या त्यात जिरे, ओवा, मीठ, हळद, लाल तिखट आणि तेलाचे मोहन टाका.

ADVERTISEMENT

पीठ चांगले मळून घ्या आणि एक तासाने त्याच्या चकल्या पाडा

मंद गॅसवर चकला कुरकुरीत तळून घ्या.

मैद्याचे पदार्थ रेसिपी मराठीत, बनवा विविध प्रकारच्या ‘या’ डिश (Maida Recipes In Marathi)

Moong‌ ‌Dal‌ ‌Chakli‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi‌ | मूग डाळ चकली रेसिपी मराठी

Maida Chakali‌ ‌Recipes‌ ‌In‌ ‌Marathi‌

मैद्याच्या चकलीप्रमाणे तुम्ही मूगडाळीची चकली‌ (Mugachi‌ ‌Chakli‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi) करू शकता. फक्त यामध्ये मैदाचे प्रमाण कमी आणि मूगडाळीचे प्रमाण जास्त असते. कारण मूगडाळीच्या चकल्या जास्त चविष्ठ आणि पौष्टिक असतात. 

ADVERTISEMENT

साहित्य –

  • दोन वाटी मूगडाळ
  • एक वाटी मैदा
  • एक चमचा पांढरे तीळ
  • एक चमचा ओवा
  • एक चमचा जिरे
  • दोन चमचे लाल तिखट
  • चवीपुरते मीठ
  • तेल

कृती –

कुकरच्या एका डब्यात पाणी घालून मूगडाळ शिजवून घ्या.

दुसऱ्या डब्यात मैदा कापडात गुंडाळून उकडून घ्या.

ADVERTISEMENT

कुकर थंड झाल्यावर मैदा फोडून चाळून घ्या.

मूगडाळ गाळून घोटून घ्या.

मैद्यामध्ये मूगडाळीचे मिश्रण, मीठ, तिखट, पांढरे तिळ, ओवा, जिरे टाकून पीठ भिजवून घ्या.

चकलीच्या साच्यात पीठ भरा आणि चकल्या पाडा.

ADVERTISEMENT

गरम तेलात मंद गॅसवर कुरकुरीत तळा.

खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी मराठीतून (Shankarpali Recipe In Marathi)

Spinach‌ ‌Chakli‌ Recipe In Marathi | पालक चकली रेसिपी मराठी

Spinach Chakali‌ ‌Recipes‌ ‌In‌ ‌Marathi‌

मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी अथवा घरात आलेल्या पाहुण्यांसाठी स्नॅक्स म्हणून तुम्ही पालक चकली करू शकता. यासाठी जाणून घ्या ही चकली कशी बनवायची.

साहित्य –

ADVERTISEMENT
  •  दोन वाटी तांदळाचे पीठ
  • पाव वाटी चणा डाळीचे पीठ
  • अर्धा वाटी वाफवलेल्या पालकची पेस्ट
  • लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट
  • पांढरे तीळ
  • हिंग
  • दोन चमचे बटर
  • चवीपुरतं  मीठ
  • तेल

कृती –

तांदळाचे पीठ, चण्याच्या डाळीचे पीठ एकत्र करा

त्यामध्ये बटर, हिंग, तीळ, हिंग मिसळा

पालक  आणि लसूणमिरचीची पेस्ट मिसळून पीठ मळून घ्या.

ADVERTISEMENT

अर्ध्या  तासाने  पीठाच्या  साच्यात टाकून चकल्या करा.

मंद गॅसवर चकल्या तळून घ्या.

वाचा – खवा  मोदक (Khava Modak Recipe In Marathi)

Wheat‌ ‌Flour‌ ‌Chakli‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi‌ | कणकेची चकली रेसिपी मराठी

Chakali‌ ‌Recipes‌ ‌In‌ ‌Marathi‌

जर घरात भाजणी नसेल तर तुम्ही गव्हाचे पीठ म्हणजेच कणीक वापरून चकली बनवू शकता. कणकेची चकली (Wheat‌ ‌Flour‌ ‌Chakli‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi‌) देखील खमंग खुशखुशीत होतात.

ADVERTISEMENT

साहित्य –

  • एक वाटी कणीक
  • एक चमचा धण्याची पूड
  • एक चमचा जिऱ्याची पूड
  • एक चमचा लाल तिखट
  • चवीपुरतं मीठ
  • हिंग
  • हळद
  • थोडा ओवा
  • तेल

कृती –

एका स्वच्छ कापडात कणीक बांधून कुकरमध्ये वीस ते तीस मिनीटे वाफवून घ्या

कणीक थंड झाल्यावर हाताने सारखी करून त्यात तिखट, मीठ, हळद, हिंग, ओवा, धणे पूड, जिऱ्याची पूड, तेलाचे मोहन घालून पीठ भिजवून घ्या.

ADVERTISEMENT

लगेच चकला पाडून घ्या

मंद गॅसवर चकली तळा

खमंग चिवडा रेसिपी, बनवा घरच्या घरी (Chivda Recipe In Marathi)

Rice‌ ‌Flour‌ ‌Chakali‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi‌ | तांदळाच्या पिठाची चकली रेसिपी मराठी

तांदळाच्या पीठापासूनही अगदी खुशखुशीत आणि कुरकुरीत चकल्या करता येतात. यासाठी जाणून घ्या हा स्पेशल तांदळाची चकली रेसिपी  (Tandul‌ ‌Chakali‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi‌).

ADVERTISEMENT

साहित्य –

  • दोन वाटी तांदळाचे पीठ
  • दोन वाटी मैदा
  • अर्धी वाटी तूप
  • चवीपुरते मीठ
  • हळद
  • दोन चमचे लाल तिखट
  • दोन चमचे धणे जिरे पूड
  • दहा लसूण पाकळ्या
  • चिमूटभर सोडा

कृती –

तांदळाचे पीठ, मैदा एकत्र करा त्यात लाल तिखट,धणे जिरे पूड, मीठ, हळद आणि वाटलेली लसूण पेस्ट मिसळा.

तूप गरम करून कडकडीत तूपाचे मोहन टाका.

ADVERTISEMENT

तूपात पीठ फेसून चांगले मळून घ्या.

एक ते दीड तासाने चकल्या पाडा

मंद गॅसवर तळून घ्या. 

Jowar‌ ‌Chakli‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi‌‌ | ज्वारीची चकली रेसिपी मराठी

Chakali‌ ‌Recipes‌ ‌In‌ ‌Marathi‌

ज्वारी आरोग्यासाठी उत्तम असल्यामुळे भाकरीप्रमाणेच तुम्ही या पिठाचे विविध प्रकार बनवू शकता. नेहमीचेच चकलीचे प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर यंदा ट्राय करा ज्वारीची चकली (Jowar‌ ‌Chakli‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi‌‌). 

ADVERTISEMENT

साहित्य –

  • दोन वाटी ज्वारीचे पीठ
  • अर्धी वाटी तांदळाचे पीठ
  • एक चमचा धणे जिरे पावडर
  • एक चमचा लाल तिखट
  • ओवा
  • पांढरे तीळ
  • मीठ चवीनुसार
  • तेल

कृती –

ज्वारीचे पीठ आणि तांदळाचे पीठ कापडात गुंडाळून कुकरमध्ये वाफवून घ्या.

थंड झाल्यावर त्यात पांढरे तीळ, ओवा, मीठ, मोहन टाकून चांगले मळून घ्या. 

ADVERTISEMENT

अर्ध्या तासाने पीठाच्या चकल्या पाडा

गरम तेलात मंद गॅसवर तळा. 

Nachni‌ ‌Chakli‌ Recipe In Marathi | नाचणीची चकली रेसिपी मराठी

Chakali‌ ‌Recipes‌ ‌In‌ ‌Marathi‌

नाचणी आरोग्यासाठी चांगली असते. ज्यांना भात, गहू खाणं वर्ज्य असतं अशा लोकांसाठी नाचणी वरदान ठरते. यासाठी तुमच्यासाठी या खास नाचणी चकली रेसिपीज

साहित्य –

ADVERTISEMENT
  • दोन वाटी नाचणीचे पीठ
  • अर्धी वाटी ज्वारीचे पीठ
  • दोन चमचे लाल तिखट
  • पांढरे तीळ
  • जिरे
  • ओवा
  • हिंग
  • तूप
  • मीठ चवीनुसार
  • तेल

कृती –

एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करा

तांदळाची उकड काढतो तशी नाचणीचे पीठ आणि ज्वारीच्या पिठाची उकड काढा.

उकडीसाठी पाण्यात पीठ घालण्यापू्र्वी पांढरे तीळ, जिरे, हिंग, तिखट, मीठ घाला आणि गॅस बंद करून ज्वारी आणि नाचणीचे पीठ मिसळा.

ADVERTISEMENT

भांडे बंद करून ठेवा. 

थंड झाल्यावर पीठ मळून घ्या आणि अर्ध्या तासाने चकलीच्या साच्यात घालून चकल्या पाडा.

नाचणीच्या चकल्या गरम तेलात कुरकुरीत तळून घ्या. 

Baked‌ ‌Chakli‌ Recipe In Marathi | बेक्ड चकली रेसिपी मराठी

Chakali‌ ‌Recipes‌ ‌In‌ ‌Marathi‌

आजकाल सर्वांच्या घरीच ओव्हन असतात. त्यामुळे ओटीजी अथवा मायक्रोवेव्हमध्ये छान बेकिंगचे पदार्थ घरच्या घरी करता येतात. तळलेल्या पदार्थांपेक्षा बेक केलेले पदार्थ आरोग्यासाठी हिताचे असल्यामुळे यंदा सणासुदीला बनवा बेक्ड चकली

ADVERTISEMENT

साहित्य –

  • एक वाटी तांदळाचे पीठ किंवा मैदा
  • एक चमचा दही
  • एक चमचा लाल तिखट
  • हिंग
  • चवीनुसार मीठ
  • पांढरे तीळ
  • तेल

कृती –

पीठ, दही, मीठ, लाल तिखट, हिंग, पांढरे तीळ एकत्र करून सैलसर पीठ मळा.

पीठ चकलीच्या साच्यात टाकून सम आकाराच्या चकल्या तयार करा.

ADVERTISEMENT

ओव्हन प्री हिट करा.

बेकिंग ट्रे मध्ये चकल्या अरेंज करा आणि 180 से. ला तीस ते चाळीस मिनीटे बेक करा.

वीस मिनीटांनी ओव्हन मधून ट्रे बाहेर काढून चकली उलट्या दिशेने पलटून घ्या. ज्यामुळे त्या दोन्ही बाजूने बेक होतील.

Potato‌ ‌Sabudana‌ ‌Chakali‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi‌ | बटाटा साबुदाणा चकली रेसिपी मराठी

Chakali‌ ‌Recipes‌ ‌In‌ ‌Marathi‌

‌उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी हा उत्तम फराळ आहे. त्यामुळे गौरी गणपती अथवा नवरात्रीमध्ये नैवेद्याच्या फराळामध्ये बटाटा साबुदाणी चकली (Potato‌ ‌Sabudana‌ ‌Chakali‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi‌) जरूर करा.

ADVERTISEMENT

साहित्य –

  • एक वाटी साबुदाणा
  • चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे
  • चार पाच हिरव्या मिरच्या
  • जिरे 
  • चवीप्रमाणे मीठ

कृती –

साबुदाणा  रात्रीच भिजवून ठेवा

सकाळी बटाटे उकडून घ्या

ADVERTISEMENT

साबुदाणा उकडीच्या भांड्यात पारदर्शक होईपर्यंत वाफवून घ्या

बटाटे सोलून स्मॅश करा, त्यात जिरे आणि हिरवी मिरची वाटून टाका

साबुदाणा मिसळून पीठ मळून घ्या

चकलीच्या साच्यात पीठ घाला आणि चकली पाडा.

ADVERTISEMENT

या चकला उन्हात चार ते पाच दिवस सुकवा

वाळल्यानंतर डब्यात भरून ठेवाट

उपवासाच्या दिवशी मस्त गरम तेलात तळून कुरकुरीत चकलीचा फराळ खा.

Rava‌ ‌Chakli‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi‌ | रव्याची चकली रेसिपी मराठी

Chakali‌ ‌Recipes‌ ‌In‌ ‌Marathi‌

कुरकुरीत चकली खायची असेल तर रव्याची चकली (Rava‌ ‌Chakli‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi‌) बनवा. ही इतर चकल्यापेक्षा जास्त कुरकुरीत आणि चविष्ठ लागते. 

ADVERTISEMENT

साहित्य –

  • एक वाटी बारीक रवा
  • दोन वाटी तांदळाचे पीठ
  • चार चमचे तूप
  • हळद
  • धणे जिरे पावडर
  • पांढरे तीळ
  • ओवा
  • दोन चमचे लाल तिखट
  • हिंग

कृती –

पाणी गरम करून तांदळाचे पीठ आणि रव्याची उकड काढा.

या पीठात तूप, हिंग, लाल तिखट, ओवा, तीळ, मीठ मिक्स करून पीठ मळा.

ADVERTISEMENT

चकलीच्या  साच्यात भरा आणि चकली बनवा.

गरम तेलात मंद आचेवर तळून घ्या. 

Butter‌ ‌Chakli‌ ‌Recipe‌ ‌In‌ ‌Marathi‌ | बटर चकली रेसिपी मराठी

Chakali‌ ‌Recipes‌ ‌In‌ ‌Marathi‌

बटर चकली बऱ्याचदा बाजारातून विकत आणली जाते. संध्याकाळी चहासोबत बटर चकली खाण्याची मजाच निराळी आहे. यासाठी घरीच ट्राय करा ही बटर चकली रेसिपी

साहित्य –

ADVERTISEMENT
  • तांदळाचे पीठ दोन वाटी
  • दोन चमचे मैदा
  • दोन चमचे साबुदाणा पीठ
  • दोन चमचे कॉर्नफ्लोअर
  • एक कप बटर
  • तीळ
  • हिंग
  • चवीनुसार मीठ

कृती –

एका भांड्यात बटर गरम करून घ्या

त्यात तांदळाचे पीठ, मैदा, कॉर्न फ्लोअर, साबुदाणा पीठ मिसळा

हिंग आणि तीळ टाका

ADVERTISEMENT

मीठ टाकून पीठ चांगले मळून घ्या

चकलीच्या साच्यात पीठ भरा आणि चकली पाडून घ्या

गरम तेलात मध्यम गॅसवर चकली तळून घ्या. 

सणासुदीला चकली, चिवडा, लाडू सारखे पदार्थ घरात तयार असतील घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुम्ही नेहमीच तयार राहू शकता. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत या चकली रेसिपीज शेअर करत आहोत. आम्ही शेअर केलेल्या या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या आणि गौरीगणपती, नवरात्र, दिवाळीसाठी तुम्ही यामधील कोणत्या चकली रेसिपीज ट्राय केल्या हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

ADVERTISEMENT
28 Oct 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT