शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागले की त्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. काही जणींच्या डोळयांजवळ यामुळे कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे जाडसर खुणा निर्माण होतात. प्राथमिक लक्षणांवरून तुम्हाला या खुणा त्वचेच्या समस्यांचा एखादा प्रकार वाटू शकतो. त्यामुळे नेहमी या समस्येवर आधी त्वचा रोगांवर केले जाणारे उपाय केले जातात. मात्र तज्ञ्ज तपासणीनंतर हे कोलेस्ट्रॉलच्या खुणा आहेत याचं निदान करू शकतात. जर तुमच्या डोळ्याजवळही अशाच खुणा निर्माण झाल्या असतील तर त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यासोबतच जाणून घ्या कशा दूर कराव्या कोलेस्ट्रॉलच्या खुणा. तसेच वाचा डोळ्याचा पफीनेस दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय
डोळ्याजवळील कोलेस्ट्रॉलच्या खुणा दूर करण्यासाठी उपाय
डोळ्याजवळ पांढऱ्या रंगाच्या खुणा तयार झाल्या असतील तर हे डाग कोलेस्ट्रॉलचे असू शकतात. हे डाग कमी करण्यासाठी अनेक उपाय करतात येतात.
फ्रीज थेरपी
आजकाल तज्ञ्ज क्रायो थेरपीने कोलेस्ट्रॉलचे डाग कमी करतात. त्वचेवरील डाग कमी करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. अतिशय सुरक्षित मार्ग असल्यामुळे तुम्ही हे वेदनामुक्त उपचार नक्कीच करू शकता. मात्र हे उपचार तज्ञ्जांच्या सल्लाने करायला हवेत. कारण काही वेळा हायपो पिंगमेंटेशनमुळे त्वचेच्या रंगामध्ये या उपचारानंतर बदल होण्याची शक्यता असते.
इलेक्ट्रिक नीडल –
डोळ्याजवळील कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी इलेक्ट्रिक नीडल वापरणं हा एक आधूनिक उपचार केला जातो. या उपचारात डॉक्टर सुईच्या मदतीने त्वचेवरील कोलेस्ट्रॉल जमा झालेला भाग जाळून टाकतात. शरीरात स्वयंनियंत्रित व्यवस्था असते. ज्यामुळे या उपचारानंतर त्वचा आपोआप पूर्ववत होण्यास मदत होते. मात्र तुमच्या डोळ्याच्या त्वचेवर जर मोठ्या प्रमाणावर कोलेस्ट्रॉल जमा झालं असेल तर हा उपचार करता येत नाही.
लेझर ट्रिटमेंट –
लेझर ट्रिटमेंटच्या मदतीने तुम्ही तुमच्या डोळ्याजवळील जमा झालेलं कोलेस्ट्रॉल कमी करू शकता. कोणत्याही वेदनेशिवाय आणि सहजपणे लेझरने जाळून हे कोलेस्ट्रॉल कमी करता येते. अशा ट्रिटमेंटनंतर त्वचा पुन्हा पूर्ववत होण्यास एक ते दोन आठवडे लागू शकतात. मात्र ही ट्रिटमेंट अधिकृत लेझर उपचार करण्याऱ्या क्लिनिकमध्येच करायला हवी.
ऑपरेशन –
डोळ्याजवळील कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे शस्त्रक्रिया अथवा ऑपरेशन. ऑपरेशनमुळे तुमच्या डोळ्याजवळ जमा झालेले कोलेस्ट्रॉल निघून जाते मात्र त्यानंतर ऑपरेशनचे मार्क्स त्वचेवर राहण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या डोळ्याजवळील त्वचेचा आणि पर्यायाने चेहऱ्याचा आकार बदलू शकतो.
डोळे जळजळ उपाय, करा सोप्या पद्धतीने (Dolyana Khaj Yene Upay)
गोळ्या औषधे –
जर तुम्हाला वरील पैकी कोणतीच उपचार पद्धती करायची नसेल तर डॉक्टर तुम्हाला फक्त गोळ्या औषधे घेऊन ही समस्या बरी करण्याचा सल्ला देतात. मात्र या उपचारांना खूप वेळ लागतो एवढे दिवस सतत गोळ्या औषधे घेतल्याने त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होण्याची शक्यता असते. यासाठी योग्य तज्ञ्जांचा सल्ला घ्या आणि मगच उपचार कोणते करायचे याचा निर्णय घ्या.
डोळ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी सोपे डोळे दुखणे घरगुती उपाय (Home Remedies For Eye Pain)