नाताळ म्हटलं की मजा मस्ती आणि आनंद. जरी हा सण ख्रिश्ननांचा असला तरीही आता सगळीकडेच मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. तसंच याला जोडूनच नवीन वर्षाची सुरूवात होणार असते. त्यामुळे सगळं दुःख मागे सोडून मोठ्या उत्साहात नव्या वर्षाला सामोरं जायला प्रत्येक जण तयार होतो. विविध देशांमध्ये हा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी सांताक्लॉज येऊन लहान मुलांना छानसे गिफ्ट्स देऊन जातात. ही प्रथा आजही तशीच सुरू आहे. खरं तर यातून लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणणं हा हेतू असतो. पण प्रत्येक देशातील पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर काही ठिकाणी अगदी विचित्र पद्धतीने नाताळ साजरा करण्यात येतो. काही देश असे आहेत जिथे नाताळ साजरा करताना काही विचित्र गोष्टी करण्यात येतात. त्यापैकी काही गोष्टी मजेशीरही आहेत. तुम्हाला माहीत आहेत का या गोष्टी? नसतील तर नक्की या लेखातून जाणून घ्या. पाहूया कोणत्या देशांमध्ये आहेत काय विचित्र पद्धती –
ऑस्ट्रियामध्ये येतो क्रमपुस
Shuuterstock
ऑस्ट्रियामधील क्रमपुसमध्ये एक विचित्र पद्धत आहे. एक व्यक्ती अतिशय वाईट मुखवट्यामध्ये आणि भयानक वेशभूषा करून फिरतो. नाताळच्या दिवशी लोकांना घाबरवायचं आणि चुकीचं वागणाऱ्यांना शिक्षा द्यायचं काम हा व्यक्ती करतो. असं करण्याचं कारण असं सांगण्यात येतं की, ऑस्ट्रियामध्ये संत निकोलस हे नाताळच्या दिवशी मुलांवर प्रेमाचा वर्षाव करत होते तर अकॉमप्लिस क्रमपुस हे वाईट वागणाऱ्यांना त्यादिवशी शिक्षा द्यायचे. त्यामुळे पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आजही जपली जाते आणि वाईट माणसांना तिथे नाताळच्या दिवशी शिक्षा करण्यात येते.
जर्मनीत निकोलस येतो गाढवावरून
Shutterstock
जर्मनीमध्ये थोडा वेगळ्या पद्धतीने नाताळ साजरा करण्यात येतो. तुम्हाला नक्कीच ही पद्धत ऐकून विचित्र वाटेल. इथे सांताक्लॉज येताना निकोलसची वेशभूषा करून जेव्हा लहान मुलांना भेटवस्तू द्यायला येतो तेव्हा मध्यरात्री गाढवावरून येतो. तसंच लहान मुलांना जेव्हा निकोलस गिफ्ट देतो तेव्हा त्या भेटवस्तू मोठ्यांसाठीही आणलेल्या असतात. पण भेटवस्तू दिल्यानंतर सांताक्लॉज मुलांना गाणी म्हणायला अथवा कविता म्हणायला सांगतो. इतकंच नाही तर इथे लहान मुलं त्याच्यासाठी फक्त गाणी गात नाहीत तर त्याच्यासाठी खास चित्रही काढतात. त्यामुळे इथलं वातावरण खूपच आनंदाचं आणि मजेशीर असतं. सगळेच मध्यरात्रीदेखील मजा मस्ती करत असतात.
मुंबईत अशापद्धतीने साजरा करा तुमचा 31 st
व्हेनेझुएलामध्ये शहराची वाहतूक केली जाते बंद
Shutterstock
व्हेनेझुएलामध्ये असणाऱ्या काराकास या शहरामध्ये नाताळच्या संध्याकाळी शहरातील प्रत्येक व्यक्ती ही स्केटिंग करत येशूच्या दर्शनासाठी चर्चमध्ये जात असते. त्यामुळे या दरम्यान कोणतीही दुर्घटना अथवा जीवितहानी होऊ नये यासाठी शहराची पूर्ण वाहतूक बंद करण्यात येते. यादिवशी तुम्हाला प्रत्येक व्यक्ती ही स्केटिंग करून जातानाच दिसते. या शहराची ही परंपरा आहे. नाताळच्या दिवशी कोणतीही गाडी रस्त्यावर चालत नाही. तर प्रत्येक व्यक्तीच्या पायात तुम्हाला स्केटिंग शूज वा बोर्ड दिसून येईल.
ख्रिसमसचा आनंद द्विगुणित करा या शुभेच्छा, मेसेजेस, स्टेटस आणि कोट्सनी
नॉर्वेतील लोक लपवतात झाडू
Shutterstock
आहे ना हे मजेशीर आणि विचित्र? नाताळच्या दिवशी नॉर्वेमधील लोक अशी विचित्र पद्धत करतात. इथे घरातील झाडू लपवण्यात येते. इथल्या लोकांच्या मते यादिवशी वाईट आत्मा उडण्यासाठी झाडूच्या शोधामध्ये असतात. त्यामुळे आपल्या घरात वाईट आत्म्याच्या प्रवेश होऊ नये आणि घरात कायम सुख समाधान आणि शांतता राहावी यासाठी नॉर्वेतील लोक हे घरातील झाडू नाताळच्या दिवशी लपवून ठेवातात.
ख्रिसमससाठी सोप्या केक रेसिपीज
कोलंबियामध्ये लिटील कँडल डे पासूनच नाताळची सुरूवात
Shutterstock
कोलंबियामध्ये तर नाताळ आधीच सुरू होतो. मेरीबद्दल आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी लिटिल कँडल डे पासूनच नाताळची सुरूवात होते. लिटील कँडल डे हा 7 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. या दिवशी कोलंबियातील प्रत्येक घर हे अगदी घराच्या कोपऱ्यापासून कँडलने सजलेलं असतं. आपली असणारी श्रद्धा यातून लोक व्यक्त करतात.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.