सकाळी भरपेट नाश्ता करून घर सोडल्यावर दिवसभर चिडचिड होत नाही. नेहमीच भरपेट नाश्ता करून घराबाहेर पडावं असं म्हटलं जातं. पण त्याहीपेक्षा अधिक तुम्हाला तुमचा दिवस फ्रेश आणि उत्साही बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये वेगवेगळ्या चटण्यांचा समावेश करून घ्यायला हवा. चटणी जर सकाळच्या नाश्त्यामध्ये असेल तर तुमचा पूर्ण दिवस उत्साहात जातो. इतकंच नाही तर नाश्त्यामध्ये तुम्ही चटणीचं सेवन केलं तर शरीरामध्ये होणाऱ्या आजारांपासून अथवा समस्यांपासून तुमची सुटका होऊन तुमचं आरोग्यही स्वस्थ अर्थात निरोगी राहण्यास मदत मिळते. काही चटण्यांमध्ये औषधी गुण असतात. जे आपल्या शरीराला आजारांपासून दूर राहण्यासाठी उपयोगी ठरतात आणि त्याव्यतिरिक्त आपली भूक अधिक न वाढू देण्याचंही काम करतात. दिवसभर जर सतत भूक लागत राहिली तर आळसावल्यासारखं होतं आणि कामात लक्ष राहात नाही. तसंच फ्रेशही वाटत नाही. त्यामुळे हे सर्व टाळायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर सकाळच्या नाश्त्यामध्ये नक्की कोणत्या चटणीचा समावेश करून घेणं आवश्यक आहे ते पाहूया –
आवळ्याची चटणी
Shutterstock
आवळ्याची चटणी खाण्यामुळे आपली प्रतिकारशक्ती अधिक चांगली राहाते. यामध्ये आढळणारे विटामिन सी आणि अन्य पोष्टिक तत्व ही आपल्या शरीराच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच या चटणीमध्ये आलं आणि लिंबू मिक्स करून याचं सेवन केल्यास, हृदयाच्या आजारापासूनही दूर राहता येतं. त्यासाठी ही चटणी नक्कीच फायदेशीर ठरते.
रेसिपी – एका कुकरमध्ये 5 आवळे शिजवून घ्या. नंतर बाहेर काढल्यावर त्यात 2 मिरच्या, लिंबू रस, आल्याचे 2 लहान तुकडे घालून मिक्सरमधून वाटून घ्या. नंतर एका कढईत तेल घाला. गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिंग, कडिपत्ता घाला. त्यावर मिक्सरमधून काढलेली आवळ्याची पेस्ट घाला आणि थोडा वेळ शिजवा. स्वादानुसार त्यात मीठ घाला. थंड झाल्यावर एअरटाईट डब्यात घालून ठेवा. हवी तेव्हा खा.
कोथिंबीर चटणी
Shutterstock
कोथिंबीर चटणीमध्ये विटामिन सी चं प्रमाण अधिक असतं. यामुळे मधुमेहासारख्या समस्या दूर होतात. त्याचप्रमाणे पुदिन्याच्या चटणीमध्येही अँटीबॅक्टेरियल गुण आढळतात. ज्यामुळे बद्धकोष्ठतेसारखे आजार दूर राहण्यास मदत होते. कोथिंबीर, आलं आणि लसूण हे कॉम्बिनेशन आतड्यांची समस्या दूर करून ताप आणि जंतासारख्या आजारांपासूनही दूर ठेवते.
रेसिपी – कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, जिरं, काळी मिरी, मीठ हे सर्व एकत्र मिक्सरमधून पाणी घालून सरसरीत वाटून घेणे. ही चटणी तुम्ही सँडविचसाठीदेखील वापरू शकता.
गुढीपाडव्याचा झटपट तयार होणारा महाराष्ट्रीयन खास मेनू
कडिपत्त्याची चटणी
Shutterstock
कडिपत्त्याचा स्वतःचा असा एक स्वाद असतो. या चटणीमधून लोह आणि फॉलिक अॅसिडचं प्रमाण अधिक असतं. कॅल्शियम आणि बऱ्याच प्रमाणात विटामिन्सदेखील यातून मिळतात. या चटणीमुळे केस काळे, मजूबत आणि घनदाट होण्यास मदत मिळते. तसंच या चटणीच्या सेवनाने आपल्या शरीरातील अॅनिमिया अर्थात रक्ताची कमतरता, उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांपासूनही दूर राहण्यास मदत मिळते.
रेसिपी – एका कढईत तेल गरम करून त्यात कडिपत्त्याची पानं कुरकुरीत गरम करून घ्यावीत. खोबरं आणि पांढरे तीळ भाजून घ्या. थंड होऊ द्या. हे सगळं मिश्रण एकत्र करून त्यात लाल तिखट, गूळ, मीठ घालून मिक्सरमधून पाणी घालून वाटून काढावे. पाणी जास्त घालू नये. चटणी जाडीभरणी ठेवावी.
टॉमेटो चटणी
Shutterstock
टॉमेटोमध्ये विटामिन सी, लायकोपीन, पोटॅशियम हे सर्व अधिक प्रमाणात आढळतं. तसंच यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे तत्व अधिक प्रमाणात असतात. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे. त्यांनी ही चटणी नक्की खावी. त्याचा त्यांना फायदा होतो आणि वजनही कमी होतं.
रेसिपी – एका पॅनमध्ये तेल घ्या. त्यात मोहरी, लसूण, आलं आणि कडिपत्ता घाला. तडतडल्यावर टॉमेटो घालून एक जाडी पेस्ट तयार करा. त्यात लाल तिखट, मीठ, काळी मिरी पावडर, व्हिनेगर, थोडीशी साखर घालून नीट शिजू द्या. ही चटणी तुम्ही पोळी, पाव, ब्रेड कशाहीबरोबर खाऊ शकता.
बाप्पाचा नेवैद्य असतो खास, कसे वाढावे ताट
कांदा – लसूण चटणी
Shutterstock
लसूण एक शक्तिशाली नैसर्गिक अँटिबायोटिक, अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल पदार्थ आहे. वाढत्या वयासह होणाऱ्या शारीरिक आजार कमी करण्यासाठी आणि आजार बरे करण्यासाठी याचा उपयोग होतो. कांद्यातही अँटिबायोटिक गुणधर्म असतात. त्यामुळे तुमच्या नाश्त्यात याचा वापर केल्यास, तुम्ही आजारापासून दोन हात लांबच राहाता.
रेसिपी – कांदा तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्या. आलं आणि लसणीच्या पाकळ्या कुटून घ्या. कोथिंबीर चिरून घ्या. हे सर्वा मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात लाल मिरची पावडर, गोडा मसाला, मीठ घाला आणि सर्व एकत्र मिक्स करा. चटणी तयार.
विविध राज्यातील खास चटकदार चटण्या
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.