चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून राहावे यासाठी आपण चेहऱ्याची योग्य ती काळजी घेतो. चेहरा स्वच्छ ठेवणे, त्याची निगा राखणे, मसाज करणे असे वेगवेगळे प्रयोग आपण आपल्या चेहऱ्यावर करत असतो. बाहेरुन आल्यानंतर चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी केलेली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चेहरा स्वच्छ धुणे. तर कोरड्या त्वचेसाठी उत्तम क्लिंन्झर नक्की कोणते हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. तर चेहरा धुण्यासाठी तुम्ही नेमकं काय वापरता ? फेस क्लिनझर की फेसवॉश? चला तर आज जाणून घेऊया या दोघांमध्ये नेमका फरक तरी काय आहे. म्हणजे त्वचेच्या समस्येनुसार तुम्हाला त्याची निवड करणे फार सोपे जाईल. चला तर मग करुया सुरुवात
Table of Contents
- क्लिनझर म्हणजे काय? (What Is A Cleanser In Marathi)
- फेसवॉश म्हणजे काय? (What Is Face Wash In Marathi)
- क्लिनझर विरुद्ध फेसवॉश काय आहे फरक (Cleanser Vs Face Wash In Marathi)
- या बेस्ट क्लिनझरची करा निवड (Best Face Cleanser In Marathi)
- या बेस्ट फेस वॉशची करा निवड (Best Face Wash In Marathi)
- क्लिनझर वापरण्याची योग्य वेळ (Best Time To Use Cleanser)
- फेसवॉश वापरण्याचा योग्य वेळ (Best Time To Use Face Wash)
- फेसवॉश आणि फेस क्लिनझरमधील कोणते घटक टाळावे (Ingredients To Avoid In Face Wash & Cleanser)
- तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
क्लिनझर म्हणजे काय? (What Is A Cleanser In Marathi)
क्लिझर हे थोडे क्रिम बेसमध्ये असते. त्याचे काम तुमच्या चेहऱ्यावरील घाण, मेकअप आणि पोअर्स यांची स्वच्छता करणे असे असते. क्लिनझर तुम्हाला कापसाच्या मदतीने किंवा हातावर घेऊन चेहऱ्यावर संपूर्ण मसाज करुन चेहरा स्वच्छ करावा लागतो. त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा कापडाने किंवा टिश्यू पेपरने पुसू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचा चेहऱ्यावरील फेसवॉशने धुवू शकता.
फेसवॉश म्हणजे काय? (What Is Face Wash In Marathi)
तुमचा रोजच्या उपयोगातील आणि बाहेरुन आल्यानंतर हमखास वापरायला हवा असे प्रोडक्ट म्हणजे फेसवॉश. फोमबेस तेलकट त्वचेसाठी फेसवॉश त्वचेचे कोरडे आणि त्वचेवरुन छिद्र पाडते तुमच्या त्वचेनुसार तुम्हाला वेगवेगळे फेसवॉश मिळते. जेल आणि फोम बेस असल्यामुळे याच्या वापरानंतर तुम्हाला त्वचा अधिक फ्रेश वाटते.
क्लिनझर विरुद्ध फेसवॉश काय आहे फरक (Cleanser Vs Face Wash In Marathi)
दोघांमधील फरक | फेस क्लिनझर (Face Cleanser) | फेस वॉश (Face Wash) |
स्वच्छतेचे गुणधर्म (Cleansing property) | त्वचेवरील घाण, धूळ, मेकअप आणि खोलवर स्वच्छता करण्याचे काम फेस क्लिनझर करते. | त्वचेवरील घाण, धूळ, पोअर्स स्वच्छ करुन त्वचेला तजेला देण्याचे काम करते. |
खोलवर स्वच्छता (Exfoliation) | क्लिनझर हे थोडे मिल्की असल्यामुळे याचा वापर करताना तुमच्या त्वचेवरील मेकअप हा त्वचेला कोणताही त्रास न देता निघू शकतो. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या पोअर्समध्ये अडकलेली घाण काढून टाकण्यासाठी ते सक्षम आहे. | फेसवॉशमध्येही हल्ली अनेक वेगवेगळे प्रकार मिळतात. तुमच्या त्वचेची खोलवर स्वच्छता करुन त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्याचे काम त्यामध्ये असलेले बारीक बारीक कण करतात. |
त्वचेची दुरुस्ती (Skin Repair) | क्लिनझरमधील आवश्यक घटक तुमच्या त्वचेची दुरुस्ती करण्याचे काम योग्य पद्धतीने करते | फेसवॉशमधील स्वच्छतेचे घटक तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करुन त्वचा चांगली करण्यास मदत करतात. |
मॉश्चरायईज करणे (Moisturization) | त्वचेला कोणतीही दुखापत होऊ न देता तुमच्या चेहऱ्यावरुन धुळ, माती, प्रदुषण काढण्याचे काम क्लिनझर करते. त्याच्या वापरामुळे तुमची त्वचा मॉश्चराईज होण्यास मदत मिळते. पण याचा अति वापरामुळे तुमची त्वचा तेलकटही होऊ शकते | तुमची त्वचा फ्रेश तेव्हाच वाटते जेव्हा ती प्रसन्न असते. चेहऱ्यावरुन सगळी घाण काढून टाकल्यानंतर त्वचेचा तजेला कायम ठेवण्याचे काम करते |
वापरण्याची योग्य वेळ (Best Time To Use) | तुम्ही खूप बाहेरुन आला असाल किंवा मेकअप केला असेल तर घरी आल्यावर याचा वापर करा. अन्यथा याची फार गरज नाही. | सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दोन वेळा याचा वापर करणे अनिवार्य आहे. |
कोणासाठी योग्य (Suited For) | जे मेकअप करतात किंवा रोज अधिक प्रवास करतात अशांनी याचा वापर करणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या पोअर्समध्ये माती, धूळीचे कण चिकटण्याची आणि त्यानंतर त्वचा अधिक खराब होण्याची शक्यता असते. | तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार निवड केल्यास प्रत्येकासाठी गरजेचे |
मिळणारे वेगवेगळे प्रकार (Types Of Products) | क्लिनझर हे नेहमी मिल्की, क्रिम किंवा जेली बेस असे असते. हल्ली तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसारही तुम्हाला हे क्लिनझर मिळतात | फेसवॉशमध्ये तुम्हाला फोम, जेल, स्क्रब बेस असे प्रकार मिळतात.तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार आणि तक्रारीनुसार त्याची निवड तुम्हाला करता येते. |
या बेस्ट क्लिनझरची करा निवड (Best Face Cleanser In Marathi)
तुम्ही तेलकट त्वचेसाठी बेस्ट क्लिनझर शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही उत्कृष्ट क्लिनझर निवडले आहेत.
Cetaphil Gentle Skin Cleanser
सेटाफिल कंपनीचे सगळे प्रोडक्ट सध्या अनेकांच्या आवडीचे आहेत. त्याचे हे क्लिनझर अत्यंत हळुवारपणे तुमच्या चेहऱ्यावरील धुळ – घाण माती काढून टाकतात.
फायदा (Pros) : क्रिमी टेक्श्चर असल्यामुळे चेहऱ्यावर ते जेंटल वाटतात.
तोटा (Cons) : तुमचा चेहरा तेलकट असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा प्रकार ओळखून मगच याचा वापर करा
Neutrogena Liquid Mild Facial Cleanser
अत्यंत माईल्ड क्लिनझर म्हणून याची ओळख आहे. कोणत्याही स्किनटाईपसाठी हा चांगला क्लिनझर आहे. क्लिनझिंगसोबत हा एक फोम बेस क्लिनझर असल्यामुळे एकावेळी तो दोन्ही काम करतो.
फायदा (Pros) : एका वेळी दोन गोष्टींचे काम हे क्लिनझर करते. फेसवॉशचे गुणधर्मही यामध्ये असतात. शिवाय कोणत्याही स्किनटाईपसाठी चालू शकेल असा हा क्लिनझर आहे.
तोटा (Cons) : जर तुम्ही फक्त मेकअप काढण्यासाठी क्लिनझर शोधत असाल तर हा क्लिनझर फक्त क्लिनझर नाही
Mama earth Micellar Water Foaming Makeup Remover with RoseWater
गुलाबपाणी आणि मिस्लेअर वॉटर असे कॉम्बिनेशन असलेले हे क्लिनझर तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप खोलवर जाऊन काढण्यास समर्थ आहे. त्यामुळे तुमचा चेहरा यामुळे स्वच्छ होतो. शिवाय या मध्ये असलेले रोझ वॉटर तुमच्या चेहऱ्यावरील तजेला तसाच कायम ठेवण्यास मदत करते.
फायदा (Pros) : मेकअप अत्यंत खोलवर जाऊन काढते. तुमच्या त्वचेचा कोरडेपणा दूर करुन त्याला तजेला देते.
तोटा (Cons) : तोटे नाहीत.
या बेस्ट फेस वॉशची करा निवड (Best Face Wash In Marathi)
बेस्ट क्लिनझरची माहिती घेतल्यानंतर आता आपण उत्कृष्ट मुरुम काढून टाकण्यासाठी फेस वॉश कोणते ते आता पाहूया.
WIPEOUT GERM KILLING FACE WASH
माय ग्लॅमचे उत्पादन असलेला हा फेसवॉश टी ट्री ऑईल आणि व्हिटॅमिन E ने युक्त आहे. याशिवाय यामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल जर्म क्वालिटी तुमच्या त्वचेसाठी उत्तम आहे.
फायदा (Pros) : तुमच्या त्वचेची खोलवर स्वच्छता करुन तुमच्या त्वचेला आवश्यक घटक पुरवण्याचे काम हा फेस वॉश करते.
तोटा (Cons) : याचे पॅकेजिंग फार आकर्षक नाही
Plum Green Tea Pore Cleansing Face Wash
Plum या कंपनीचा हा फेस वॉशही रेटींगच्या बाबतीत चांगला आहे. यातील डीप क्लिन्झिंग गुणधर्म तुमच्या त्वचेवरील पोअर्स स्वच्छ करण्यास मदत करतात. तुमच्या त्वचेवरील सेबमची पातळी वाढवण्यास मदत करते.
फायदा (Pros) : ग्रीन टीचे गुणधर्म तुमची त्वचा खुलवण्यास चांगल्या आहेत. त्यामुळे हा फेस वॉश तुमच्या त्वचेवर चांगला फरक दाखवतो.
तोटा (Cons) : याचे फार दुष्परिणाम नाही
Ubtan Face Wash for Tan Removal
ममा अर्थचे आणखी एक प्रोडक्ट म्हणजे त्यांचा उपटन फेसवॉश. हा टॅन रिमुव्हल फेसवॉश तुमच्या चेहऱ्यावरील टॅन काढून टाकण्यास समर्थ आहे असा दावा कंपनी करते. अनेक आयुर्वेदीक घटकांचा समावेश असलेले हे प्रोडक्ट अनेकांच्या आवडीचे आहे.
फायदा (Pros) : अनेक नैसर्गिक घटकांमुळे हे प्रोडक्ट वेगळे ठरते. चेहऱ्यावरील टॅन, मृत त्वचा काढून त्वचेला उजळवण्याचे काम करते
तोटा (Cons) : जर तुम्हाला नैसर्गिक घटक आवडत नसतील तर तुम्हाला हा फेसवॉश आवडणार नाही.
क्लिनझर वापरण्याची योग्य वेळ (Best Time To Use Cleanser)
तुम्ही घरी आल्यानंतर मेकअप काढण्याचा विचार करत असाल तर क्लिनझरचा प्रयोग तुम्ही अशा पद्धतीने करु शकता.
- तळहातावर चेहऱ्याच्या आवश्यकतेनुसार क्लिनझर घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर लावा.
- डोळे, गाल, कपाळ, हनुवटी यांना अगदी व्यवस्थितपणे क्लिनझर लावून घ्या. चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करत चेहऱ्यावरील मेकअप काढून घ्या.
- टिश्यू पेपरने तुम्ही चेहरा स्वच्छ करुन घ्या.
- याच्या वापरानंतर तुम्ही तुमचा चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुणे फार गरजेचे आहे.
फेसवॉश वापरण्याचा योग्य वेळ (Best Time To Use Face Wash)
दिवसातून दोन वेळा तुम्ही फेसवॉशचा प्रयोग करणे फारच गरेजेचे असते.
- सकाळी उठल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर काही ठिकाणी तेल आलेले तुम्हाला जाणवेल. किंवा काहींना त्यांची त्वचा कोरडी जाणवेल. फेसवॉशमुळे तुमची त्वचा सकाळी जागे करण्याचे महत्वाचे काम होते.
- रात्री झोपतानाही तुम्ही फेसवॉश करणे गरजेचे असते. त्यामुळे तुमच्या त्वचेला आलेला दिवसभराचा क्षीण निघून जाण्यास मदत होते.
फेसवॉश आणि फेस क्लिनझरमधील कोणते घटक टाळावे (Ingredients To Avoid In Face Wash & Cleanser)
कोणत्याही मेकअप प्रोडक्टचा विचार करता त्यामध्ये असणारे काही केमिकल्स हे त्वचेसाठी फारच हानिकारक असतात. म्हणूनच एखाद्या प्रोडक्टची निवड करण्यापूर्वी तुम्ही ते प्रोडक्ट पॅराबिन फ्री (Paraben free), सल्फेट फ्री (Sulfate Free) आणि त्यामध्ये कोणत्याही पद्धतीने प्राण्यांची चरबी असता कामा नये
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही प्रत्येक प्रोडक्टची निवड करणे फार गरजेचे असते. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुमच्या त्वचेवर तेल सोडतील असे घटक असलेले फेस क्लिनझर मुळीच निवडू नका. कारण त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो.
अर्थात तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉशची निवड करणे हे फारच फायद्याचे असते. तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला त्वचेसाठी नरिशिंग, तेलकट असेल तर त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकणे आणि तुमची त्वचा नाजूक असेल तर त्यामधील घटक असे सगळे काही पाहणे गरजेचे असते. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही फेसवॉशची निवड करणे नेहमीच उत्तम राहील.
दोन्ही प्रोडक्टचे गुणधर्म हे एकमेकांपासून वेगळे असले तरी तुमचा चेहरा स्वच्छ करणे हे या दोन्हीचे प्रथम उद्दिष्ट आहे. तुम्ही एखादी गोष्ट सतत वापरत असाल तर तुम्हाला त्वचेसंदर्भात काही त्रास होणे फारच स्वाभाविक आहे. या दोन्हीच्या एकत्र वापरामुळे तुमच्या त्वचेचे मॉश्चरायझर कमी होऊन तुमची त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. त्वचा फार जास्त कोरडी झाली की, ती निस्तेज दिसू लागते. त्यामुळे एकावेळी या दोघांचाही प्रयोग करु नका.