ADVERTISEMENT
home / Recipes
घरच्या घरी करा दाबेली मसाला आणि बनवा चविष्ट दाबेली

घरच्या घरी करा दाबेली मसाला आणि बनवा चविष्ट दाबेली

स्ट्रीट फूड (Street Food) मध्ये प्रसिद्ध असणारा दाबेली (Debeli) हा प्रकार कोणाला आवडत नाही असं होणारच नाही. दाबेली म्हटली की तोंडाला पाणीच सुटते. गरमागरम बटरवर भाजलेली दाबेली आणि त्यावर मुरमुरीत शेव आणि तिखट शेंगदाणे हे नुसतं आठवलं तरी आता लगेचच खावीशी वाटते. बऱ्याच जणांना दाबेली घरी बनवता येते असं वाटतंच नाही. पण तुम्ही घरच्या घरी दाबेलीचा मसाला बनवून अप्रतिम चविष्ट अशी दाबेली बनवू शकता. या लेखातून खास तुमच्यासाठी आम्ही दाबेली रेसिपी (dabeli recipe in marathi) आणि दाबेलीचा मसाला (dabeli masala recipe in marathi) आणली आहे. तुम्हीही घरच्या घरी मस्तपैकी दाबेलीचा मसाला तयार करून घरगुती दाबेली बनवून अगदी स्ट्रीट फूड दाबेलीचा स्वाद घेऊ शकता. 

हाताची बोटं चाटत राहाल असा चविष्ट मसाला पाव बनवा घरी, सोपी रेसिपी

दाबेलीचा मसाला बनविण्याची पद्धत

कच्छी दाबेलीचा मसाला असा तर बाजारात तयार मिळतो. पण तुम्हाला बाजारातील मसाला नको असेल आणि घरात बनवायचा असेल तर तुम्ही घरच्या घरी दाबेलीचा मसाला कसा बनवायचा याची आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. त्यासाठी आधी लागणारे साहित्य आपण जाणून घेऊ. 

साहित्य 

ADVERTISEMENT
  • अर्धा कप धने 
  • 4 चमचे जिरे 
  • 2 चमचे बडिशेप
  • 6 लवंगा 
  • 2 चमचे काळीमिरी 
  • 2 इंचाचा दालचिनीचा तुकडा 
  • 4 मोठ्या वेलची
  • 4 चक्रीफूल (दगडफूल)
  • 4 तमालपत्र
  • अर्धा कप सुक्या नारळाचा किस 
  • 6 सुक्या मिरच्या तुकडे करून 
  • 1 चमचा तीळ
  • 2 चमचे काळे मीठ 
  • 4 चमचे काश्मिरी लाल तिखट पावडर 
  • 2 चमचे साखर 
  • 2 चमचे तेल 

मसाला बनविण्याची पद्धत 

  • दाबेलीचा मसाला बनविण्यासाठी सर्वात आधी एका नॉनस्टिक पॅनमध्ये धणे, जिरे, बडिशेप, लवंग, तमालपत्र, काळी मिरी, दालचिनी, दगडफूल, मोठी वेलची सर्व एकत्र करा आणि भाजा. साधारण 1-2 मिनिट्स मध्यम आचेवर हे भाजून घ्या. भाजून झाल्यावर एका ताटात काढून ठेवा 
  • नंतर त्याच पॅनमध्ये सुक्या नारळाचा किस, लाल मिरच्या, तीळ घालून पुन्हा हे मिश्रण मध्यम आचेवर भाजून घ्या आणि ते त्याच ताटात बाजूला काढून ठेवा 
  • हे दोन्ही थंड झाल्यावर त्यात काळे मीठ आणि लाल मिरची पावडर मिक्स करा. हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या 
  • एका मोठ्या भांड्यात हा मसाला काढून घ्या आणि त्यात तेल आणि साखर मिक्स करून व्यवस्थित मिश्रण करून घ्या. तुमचा दाबेली मसाला तयार आहे. हा एअर कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा आणि त्याचा तुम्हाला हवा तेव्हा बाहेर काढून वापर करा 

पनीरपासून बनवा चटपटीत पदार्थ, पनीर रेसिपी मराठीमध्ये (Paneer Recipes In Marathi)

दाबेली बनविण्यासाठी लागणारे साहित्य

दाबेलीचा मसाला कसा बनवायचा ते आपण पाहिले. आता त्या मसाल्याचा वापर करून दाबेली कशी बनवायची याचीदेखील रेसिपी जाणून घेऊया. 

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 6 दाबेलीचे पाव
  • 4 मोठे बटाटे (उकडलेले)
  • 1 चमचा लाल तिखट
  • 2 चमचे दाबेली मसाला
  • 1 कांदा बारीक चिरून
  • 2 चमचे कोथिंबीर बारीक चिरून
  • 3 चमचे डाळिंबाचे दाणे
  • 3 चमचे मसाला शेंगदाणे
  • चवीनुसार मीठ
  • बटर (मस्का)
  • 1 चमचे बारीक शेव
  • 1 चमचे गोड चटणी (खजूर चटणी)
  • 2 चमचे हिरवी तिखट चटणी (कोथिंबीर – पुदीना चटणी)
  • 2 चमचे तेल

बनविण्याची पद्धत 

  • सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य एकत्र करून घ्या. उकडून घेतलेले बटाटे मॅश करून घ्या. यामध्ये जास्त मोठे तुकडे ठेऊन नका
  • आता एका कढईत तेल गरम करून त्यात दाबेली मसाला, मीठ आणि लाल मिरची पावडर घालून हा मसाला बारीक गॅसवर परतून घ्या.आता त्यात उकडलेले बटाटे घालून व्यवस्थित एकजीव करुन घ्या. मसाला यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे आणि मिठाची चव व्यवस्थित आहे की नाही याची चव घेऊन खात्री करा 
  • तयार झालेले बटाट्याचे मिश्रण एका ताटात काढून पसरवून घ्या.त्यात इतर पदार्थ म्हणजे चिरलेला कांदा, डाळिंबाचे दाणे, मसाल्याचे शेंगदाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला
  • आता दाबेलीचा पाव एका बाजूने थोडा कापून पावात एका बाजूने गोड चटणी आणि दुसऱ्या बाजूला तिखट हिरवी चटणी लावा. त्याच्या वर तयार केलेले बटाट्याचे मिश्रण व्यवस्थित पसरवा. तुम्हाला हवं असल्यास यात चीज किसून घाला
    वरीलप्रमाणे सगळे दाबेलीचे पाव भरुन घ्या. आता तवा गरम करून त्यावर पहिले बटर लावा.  दाबेली दोन्ही बाजूंनी बटर वर भाजून घ्या. भाजून झाले की दाबेलीच्या सर्व बाजूने बारीक शेव लावा आणि त्यावर डाळिंबाचे दाणे आणि मसाला शेंगदाणे आणि कोथिंबीर वरूनही घाला

उपवासाची रेसिपी बनवा घरी, खमंग पदार्थ रेसिपी (Upvasache Recipes In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

23 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT