ADVERTISEMENT
home / Acne
मसूर डाळीचे सोपे आणि घरगुती फेसपॅक्स (DIY Masoor Dal Face Packs In Marathi)

मसूर डाळीचे सोपे आणि घरगुती फेसपॅक्स (DIY Masoor Dal Face Packs In Marathi)

मसूराची डाळ ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे, हे तर सगळ्यांना माहीतच आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, आहारासोबतच मसूर डाळीचा वापर तुम्ही त्वचेसाठीदेखील करू शकता. मसूर डाळ त्वचेवर परिणामकारक ठरते आणि त्वचेला नितळ आणि चमकदार करते. खरंतर सर्व प्रकारच्या डाळींमध्ये त्वचेसाठी उपयुक्त ठरणारे गुण असतात. पण या लेखात आपण जाणून घेणार आहोत मसूर डाळीपासून निरनिराळे फेसपॅक घरीच  कसे तयार करायचे.विशेष म्हणजे या फेसपॅकसाठी तुम्हाला फार तयारीही करावी लागत नाही. मसूर डाळ मिक्सरमध्ये वाटून तयार पीठ अथवा ती रात्रभर पाण्यात भिजवून, मिक्सरमध्ये वाटून तुम्ही मसूर डाळीचे फेसपॅक तयार करू शकता. चला जाणून घेऊया त्वचेवर होणारे मसूर डाळीचे फायदे आणि फेसपॅक (DIY Masoor Dal Face Packs In Marathi)चे निरनिराळे प्रकार.

मसूर डाळीचे फायदे (Benefits Of Masoor Dal In Marathi)

Masoor Dal Face Packs In Marathi

Masoor Dal Face Packs In Marathi

ADVERTISEMENT

मसूर डाळ भारतीय स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मसूर डाळीपासून गोडी डाळ, आमटी, भाजी, भजी, वडे असे विविध प्रकार बनवले जातात. मसूर डाळीत फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटिन्स, सल्फर, झिंक, कॉपर असे अनेक गुणधर्म असल्यामुळे मसूर डाळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मात्र एवढंच नाही मसूर डाळ तुमच्या त्वचेसाठीदेखील खूपच फायदेशीर आहे. यासाठीच पूर्वीपासून मसूर डाळीचा वापर सौंदर्योपचारांसाठी केला जातो. मसूर डाळीने तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो. धुळ, माती, मेकअप, वातावरणातील बदल आणि प्रदूषणाचा परिणाम झाल्यामुळे जर तुमची त्वचा काळवंडली असेल  तर त्वचा उजळण्यासाठी मसूर डाळ(Masoor Dal For Skin Whitening) तुम्ही नक्कीच वापरू शकता. यासाठीच जाणून घ्या मसूर डाळीचे फेसपॅक (Masoor Dal Face Pack In Marathi) कसे तयार करायचे.

मसूर डाळीचा फेसपॅक (Plain Masoor Dal Face Pack In Marathi)

Masoor Dal Face Packs In Marathi

Instagram

ADVERTISEMENT

मसूर डाळीपासून बनवलेला फेसपॅक (Masoor Dal Face Pack In Marathi) कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर परिणामकारक आहे. शिवाय त्यासाठी जास्त साहित्याची गरज नाही. 

साहित्य –

  • एक चमचा मसूर डाळ पावडर
  • गुलाबपाणी

कसा तयार कराल – 
मसूर डाळीची पावडर भिजेल इतपत गुलाबपाणी त्यामध्ये मिसळा. मिश्रणाचा जाडसप फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक तुमचा चेहरा आणि मानेवर लावा. अर्धा तासाने तुमचा चेहरा आणि मान साध्या पाण्याने धुवून टाका. मसूर डाळ तुमच्या त्वचेवर एखाद्या स्क्रबप्रमाणे काम करते. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील धुळ, माती, प्रदूषण, मेकअपचे कण, डेड स्किन निघून जाते. त्वचेला छान फ्रेशनेस येतो. त्याचप्रमाणे कडूलिंबापासून तयार करा हे घरगुती फेस पॅक (Homemade Neem Face Packs)

बेसन आणि मसूर डाळीचा फेसपॅक (Besan And Masoor Dal Face Pack In Marathi)

Masoor Dal Face Packs In Marathi

ADVERTISEMENT

Masoor Dal Face Packs In Marathi

बेसन आणि मसूर डाळीच्या फेसपॅकमुळे तुमची त्वचा उजळण्यास मदत होते. त्यामुळे जर तुमच्याकडे एखादा खास कार्यक्रम अथवा सणसमारंभ असेल तर त्याआधी एक दिवस तुम्ही हा फेसपॅक नक्कीच वापरू शकता.

साहित्य –

  • एक चमचा मसूर डाळ
  • एक चमचा बेसन
  • एक चमचा दही
  • एक चिमूट हळद

कसा तयार कराल –
चमचा मसूर दाळ पावडर,  बेसन,  दही आणि हळद हे मिश्रण चांगलं मिक्स करून चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. चेहरा संपूर्ण सुकल्यावर ओल्या हाताने हळू हळू चेहरा साफ करा. फेस पॅक काढल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. गव्हाच्या कोंड्यापासून बनवा फेस आणि बॉडी स्क्रब, त्वचा होईल चमकदार.

ADVERTISEMENT

चंदन आणि मसूर डाळीचा फेसपॅक (Sandalwood And Masoor Dal Face Pack In Marathi)

Masoor Dal Face Pack In Marathi

Sandalwood And Masoor Dal Face Pack In Marathi

चंदन पावडर अनेक वर्षांपासून त्वचेला उजळपणा  देण्यासाठी वापरण्यात येते. चंदन पावडर आणि मसूर डाळीच्या मिश्रणाचा फेसपॅक चेहऱ्याला लावण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, पिगमेंटेशन नक्कीच कमी होते. एवंढच नाही तर मसूर डाळीमुळे तुमच्या चेहऱ्यावरील अनावश्यक केसही कमी होतात.

साहित्य –

ADVERTISEMENT
  • एक चमचा मसूर डाळ
  • एक चमचा चंदन पावडर
  • एक चमचा कच्चे दूध

कसा तयार कराल –
एका भांड्यात दूध आणि मसूर डाळ रात्रभर भिजत ठेवा. सकाळी दोन्ही घटक मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. या मिश्रणात चंदन पावडर टाका आणि पेस्ट तयार करण्यासाठी गरजेनुसार दूध टाका. फेसपॅक चांगला मिक्स करा आणि चेहरा, मानेवर लावा. अर्ध्या तासाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. 

मध आणि मसूर डाळीचा फेसपॅक (Honey And Masoor Dal Pack In Marathi)

Masoor Dal Pack In Marathi

Honey And Masoor Dal Pack In Marathi

ADVERTISEMENT

मधामध्ये त्वचेचे नैसर्गिक पोषण करणारे घटक असतात. शिवाय मध अॅंटि बॅक्टेरिअल असल्यामुळे तुमच्या त्वचेचे पिंपल्सपासून संरक्षण होते. मध मसूर डाळीसोबत त्वचेवर लावण्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेवर छान ग्लो येतो.

साहित्य –

  • एक चमचा मसूर डाळीचे पीठ
  • एक चमचा मध

कसा तयार कराल –
एका भांड्यात मध आणि मसूर डाळीचे पीठ एकत्र करा. मिश्रण तुमच्या चेहरा आणि मानेवर व्यवस्थित लावा. वीस मिनीटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. तुम्ही हा फेसपॅक दर दोन दिवसांनी वापरू शकता. घरच्या घरी फेसपॅक करण्याआधी तयार करा या फेसपॅक पावडर.

मसूर डाळ आणि कच्चे दूध फेसपॅक (Masoor Dal And Raw Milk Face Pack)

Masoor Dal Face Packs In Marathi

ADVERTISEMENT

मसूर डाळीचा फेसपॅक

मसूर डाळीमध्ये त्वचा उजळवणारे गुणधर्म असतात. (Masoor Dal For Skin Whitening In Marathi) ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन आणि  धुळ, माती सहज निघून जाते. दूधामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेला योग्य पोषण मिळते आणि त्वचा मऊ होते.

साहित्य –

  • एक चमचा मसूर डाळ
  • एक चमचा दूध अथवा मलई

कसा तयार कराल –
दूध आणि मसूर डाळ रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या. तयार फेसपॅक तुम्ही सक्युर्लर मोशनमध्ये तुमच्या चेहरा आणि मानेवर लावू शकता. अर्धा तासाने फेसपॅक सुकल्यावर तो बोटाने काढून टाका आणि मग चेहरा थंड पाण्याने धुवून काढा.

ADVERTISEMENT

वाचा – Milk Powder For Face In Marathi

नारळाचे तेल आणि मसूर डाळ फेसपॅक (Coconut Oil And Masoor Dal Pack In Marathi)

Masoor Dal Pack In Marathi

Coconut Oil And Masoor Dal Pack In Marathi

ADVERTISEMENT

मसूर डाळीमध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. शिवाय मसूर डाळ तुमच्या  त्वचेला मुळापासून स्वच्छ करते. या फेसपॅकमधील दूध आणि नारळाचे तेल तुमच्या त्वचेला योग्य पोषण देते.

साहित्य –

  • एक चमचा मसूर डाळ
  • एक चमचा नारळाचे तेल
  • एक चमचा दूध
  • चिमूटभर हळद

कसा तयार कराल –
मसूर डाळीचे पीठ करून घ्या. पिठात दूध, नारळाचे तेल आणि चिमूटभर हळद मिसळा. सर्व साहित्य एकजीव करा आणि चेहऱ्यावर लावा. तीस मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवा आणि टॉवेलने पुसून घ्या.

बदामाचे तेल आणि मसूर डाळ फेसपॅक (Almond Oil And Masoor Dal Pack In Marathi)

Masoor Dal Pack In Marathi

ADVERTISEMENT

Almond Oil And Masoor Dal Pack In Marathi

मसूर डाळीमध्ये क्लिझिंग करणारे गुणधर्म असतात. तर बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते आणि त्वचेचे खोलवर पोषण होते. या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेवरील पोअर्स स्वच्छ होतात आणि त्यांना पुरेसे ऑक्सिजन मिळाल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.

साहित्य –

  • एक चमचा मसूर डाळ
  • एक चमचा बदामाचे तेल
  • एक चमचा दूध
  • चिमूटभर हळद

कसा तयार कराल –
एका भांड्यामध्ये मसूर डाळ रात्रभर भिजत ठेवा. सकाळी डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यामध्ये दूध, हळद आणि बदामाचे तेल मिसळा. मिश्रण एकजीव करा आणि चेहरा आणि मानेवर लावा. वीस ते तीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळे डाग नक्कीच कमी होतील.

ADVERTISEMENT

संत्र्याची साल आणि मसूर डाळ फेसपॅक (Orange Peel And Masoor Dal Pack In Marathi)

Masoor Dal Pack In Marathi

Orange Peel And Masoor Dal Pack In Marathi

संत्र्याच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे संत्र्याची साल अथवा त्याची पावडर त्वचेसाठी अतिशय उत्तम असते. मसूर डाळीच्या पीठासोबत संत्र्याची साल त्वचेला लावण्यामुळे तुमची त्वचा उजळ आणि चमकदार होते.

साहित्य –

ADVERTISEMENT
  • एक चमचा मसूर डाळीचे पीठ
  • एक चमचा दूध 
  • एक चमचा संत्र्याची पावडर

कसा  तयार कराल –
सर्व साहित्य एकत्र करा आणि त्याची छान पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासाने चेहरा पाण्याने स्वच्छ करा. चांगल्या परिणामासाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावू शकता. संत्र्याच्या सालीचे फायदे असा उपयोग करुन मिळवा सुंदर त्वचा (Orange Peel Powder Uses).

मेथीचे दाणे आणि मसूर डाळ फेसपॅक (Fenugreek Seeds And Masoor Dal Face Pack)

Masoor Dal Face Pack In Marathi

Masoor Dal Face Pack In Marathi

मेथी आरोग्याप्रमाणेच तुमच्या सौंदर्यासाठी गुणकारी ठरते. मेथी दाण्याच्या पावडरमुळे तुमचा स्किन टोन एकसमान होण्यास मदत होते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर मेथी दाण्याच्या पावडरसोबत मसूर डाळीचे पीठ त्वचेला लावल्यास चांगला फायदा होऊ शकतो. कारण या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेखाली निर्माण होणाऱ्या तेलाच्या निर्मितीवर नियंत्रण येते.

ADVERTISEMENT

साहित्य –

  • एक चमचा मसूर डाळ
  • एक चमचा मेथीचे दाणे

कसा तयार कराल –
मसूर डाळ आणि मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी दोन्ही साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या. मिश्रण एकत्र करा आणि चेहऱ्यावर सक्युर्लर मोशनमध्ये लावा. सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका.

11 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT