ADVERTISEMENT
home / Recipes
क्रिस्पी जिरा आलू बनविण्याची सोपी पद्धत, रेसिपी घ्या जाणून

क्रिस्पी जिरा आलू बनविण्याची सोपी पद्धत, रेसिपी घ्या जाणून

रोज जेवणामध्ये भाजी काय करायची असा प्रश्न निर्माण होतो. कधी कधी अचानक घरी पाहुणे येतात. मग अशावेळी आपल्याकडे नेहमीची पटकन होणारी बटाट्याची भाजी करण्यात येते. पण तुम्ही त्याऐवजी क्रिस्पी आलू ही सोपी रेसिपी बनवू शकता. क्रिस्पी जिरा आलू बनवणे सोपेदेखील आहे आणि चवीलाही हे अप्रतिम लागतात. शिवाय ही रेसिपी झटपट होते. त्याशिवाय नेहमीच्या बटाट्याच्या भाजीच्या चवीपासून थोडी वेगळी चवही तुम्हाला चाखता येते. आता जर कोणी पाहुणे आले तर पटकन होणारी ही क्रिस्पी जिरा आलू (Crispy Jeera Aloo) रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. मराठीत याची सोपी रेसिपी खास तुमच्यासाठी. 

जेवणात मीठ जास्त झालंय का, मग करा या सोप्या ट्रिक्स

क्रिस्पी जिरा आलूसाठी लागणारे साहित्य

क्रिस्पी जिरा आलू बनविण्यासाठी तुम्हाला बाजारातून काही वेगळे सामान आणण्याची गरज भासत नाही. तुम्ही अगदी घरातील काही उपलब्ध असणाऱ्या पदार्थांमध्येच हे तयार करू शकता 

  • पाव किलो बटाटे
  • जिरे 
  • हळद पावडर अर्धा चमचा
  • लाल तिखट एक चमचा
  • कडिपत्ता 
  • गरम मसाला अर्धा चमचा 
  • तेल
  • चिरलेली कोथिंबीर

स्वयंपाकघरात करायच्या असतील स्वादिष्ट रेसिपीज तर वापरा सोप्या टिप्स

ADVERTISEMENT

सोपी पद्धत आणि ट्रिक्स

बटाट्याची भाजी करताना आपण बऱ्याचदा बटाटे कुकरमध्ये शिजवून घेतो. पण जेव्हा क्रिस्पी आलू करायचे असतात तेव्हा ते तळावे लागतात. मग अशावेळी काही सोप्या ट्रिक्सदेखील वापराव्या लागतात. तुम्हाला आम्ही कशा सोप्या पद्धतीने आणि ट्रिक्स वापरून क्रिस्पी जिरा आलू बनवायचे ते या लेखातून सांगत आहोत. 

  • बटाट्यामध्ये जास्त प्रमाणात स्टार्च असते. त्यामुळे तुम्ही बटाट्याची साले काढून याचे तुकडे करून घ्या आणि हे तुकडे काही वेळ थंड पाण्यात ठेवा. थंड पाण्यात ठेवल्यामुळे याचा स्टार्च निघून जाईल. स्टार्च निघून गेल्यानंतर तुम्ही जेव्हा हे तुकडे तेलात तळता तेव्हा अधिक कुरकुरीत अर्थात क्रिस्पी होतात. ही ट्रिक तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तसंच याचे उभे तुकडे कापा. जेणेकरून तुम्हाला याचा कुरकुरीतपणा अधिक चांगला अनुभवता येईल
  • तुम्हाला बटाट्याचे उभे तुकडे नको असतील तर तुम्ही तुकडे करताना लहान तुकडे कराल याकडे लक्ष द्या. बटाट्याचे लहान तुकडे केल्यास, त्याला तेलामध्ये चांगला कुरकुरीतपणा मिळतो. त्यामुळे जिरा आलू करताना बटाट्याचे तुकडे लहान कापणे अत्यंत गरजेचे आहे
  • काही जणांना बटाटे उकडलेले आवडतात. या भाजीसाठी तुम्ही बटाटे उकडू शकता. पण ते अति उकडले जाणार नाहीत, याकडे लक्ष द्या. उकडलेले बटाटे हे कढईत खाली चिकटतात. त्यामुळे उकडून न घेतल्यास अधिक चांगले
  • क्रिस्पी जिरा आलू बनवताना कढईत पहिले तेल घाला. त्यावर जास्त प्रमाणात जिरे घाला. कडिपत्त्याची पाने हवी असल्यास, तुम्ही त्यामध्ये घाला. जिरे तडतडल्यानंतर पाण्यात भिजवलेले बटाट्याचे तुकडे घाला आणि व्यवस्थित परता
    त्यावर झाकण ठेवा आणि मग त्याला व्यवस्थित वाफ देत हे बटाटे कुरकुरीत करा. पाण्याचा हबका मारून मग त्यावर लाल तिखट, हळद,गरम मसाला अगदी अर्धा चमचा, मीठ, हवा असल्यास चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा. वरून लिंबू रस पिळा (तुम्हाल आंबटपणा आवडत असल्यास) आणि चिरलेली कोथिंबीर घाला. तुमचे क्रिस्पी जिरा आलू तयार आहे. गरमागरम पुऱ्यांसह तुम्ही जिरा आलू सर्व्ह करू शकता अथवा तुम्हाला रोटी वा पोळी आवडत असल्यास, क्रिस्पी जिरा आलूचा आस्वाद तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. 

कोणत्याही भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी सोप्या कुकिंग टिप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

16 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT