ADVERTISEMENT
home / Natural Care
चेहऱ्यावरील फॅट कमी करतील हे पदार्थ

चेहऱ्यावरील फॅट कमी करतील हे पदार्थ

 

शरीराच्या इतर भागाच्या तुलनेत खूप जणांचा चेहरा हा अधिक मोठा असतो. खूप जणांच्या चेहऱ्यावरील फॅट हे इतके जास्त असते की, डबलचीन, लोंबणारे गाल हे नकोसे होऊन जाते. यावर अनेक उपाय आहेत. त्यातील पहिला उपाय म्हणजे वजन कमी करणे. वजन कमी केल्यामुळे आपोआपच चेहऱ्यावरील फॅट कमी होते. ते शक्य नसेल तर फक्त चेहऱ्याचा व्यायाम करणे. पण काही जणांना या गोष्टीचाही मनापासून कंटाळा असतो. अशा लोकांनी चेहऱ्यावरील फॅट कमी करण्यासाठी काही पदार्थांचे सेवन केले तरी चालू शकते. हे असे पदार्थ आहेत जे आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असतात आणि यांच्या सेवनामुळे चेहऱ्यावरील फॅट कमी होण्यासोबत इतरही फायदे मिळण्यास मदत मिळते. जाणून घेऊया असेच काही पदार्थ

काजळ पसरल्यामुळे लुक खराब होत असेल तर वापरा सोपी पद्धत

चेहऱ्यावरील फॅट

Instagram

 

वेलची 

ADVERTISEMENT

कोणत्याही पदार्थात वेलची घातली की, तिचा सुगंध वाढतो. अशी ही वेलची चेहऱ्यावरील फॅट कमी करण्यासाठी फारच फायदेशीर ठरते. वेलची तोंडात टाकून हळुहळू चघळत राहा. त्यामुळे तोंडाचा व्यायाम होतो.त्यामुळे गाल आणि हनुवटीवरील फॅट कमी होण्यास मदत मिळते. याशिवाय त्वचेचा रंग उजळण्यासही वेलची मदत करते. वेलचीमध्ये अँटी एजिंग घटक असतात. जे त्वचेचे तारुण्य राखून ठेवण्यास मदत करतात.

बडीशेप
जेवणानंतर खाल्ली जाणारी बडीशेप ही देखील चेहऱ्यावरील फॅट कमी करण्यासाठी मदत करते. बडीशेपमध्ये अँटी-एजिंग असे गुणधर्म असतात. जे त्वचेचे तारुण्य राखण्यास मदत करते. बडीशेप ही हळुहळू चघळा त्यामुळे तोंडाचा चांगला व्यायाम होतो. त्यामुळे त्वचेचे फॅट कमी होते. बडिशेपचे फायदे अनेक आहेत. बडीशेपेचा रस पोटात गेल्यामुळे पोटाचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत मिळते. त्यामुळे नुसती बडशेप जेवणानंतर नक्कीच खावी.

स्टारफुल
गरम मसाल्यामधील एक पदार्थ म्हणजे स्टारफुल जे जेवणाचा स्वाद वाढवण्यास मदत करते. स्टारफुल हे देखील त्वचेचे फॅट कमी करण्यास मदत करते. याची चव थोडी तिखट आणि साधारण बडीशेपेसारखी लागते. स्टारफुलचा एक छोटा तुकडा चघळत राहा. तो चोखून चोखून खाल्ल्यामुळे त्याचा फायदा चेहऱ्यावरील फॅट कमी करण्यास मदत करतो. स्टारफुलचा रस पोटात गेल्यामुळे पोट साफ होण्यासही मदत मिळते. पण याचे खूप जास्त सेवन करु नका. कारण हा मसाल्याचा प्रकार आहे. 

कलरफुल आयलायनर लावताना लक्षात ठेवा या गोष्टी

ADVERTISEMENT

 

दालचिनी 

गरम मसाल्यातील आणखी एक प्रकार म्हणजे दालचिनी. दालचिनीचा एक तुकडा जर तुम्ही चघळला तर तुम्हाल त्यामुळे चेहऱ्यावरल फॅट कमी होण्यास मदत मिळते. दालचिनीचा उपयोग अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. पण त्याचा अति वापर करणेही चांगले नाही. दालचिनीचा अगदी छोटाच तुकडा तुम्ही चघळा कारण त्याच्या अति सेवनामुळे तोंड येण्याची शक्यता असते. 

ज्येष्ठमध
औषधी असे ज्येष्ठमध देखील चेहऱ्यावरल फॅट कमी करण्यासाठी फारच चांगले आहे. ज्येष्ठमधामध्ये अँटी- फंगल, अँटी एजिंग असे घटक असतात ज्यामुळे त्वचेवरील जखमा बऱ्या होण्यास मदत मिळते. ज्येष्ठमधाचे चाटण खूप जण चाटतात ज्याचा फायदा चेहऱ्यावरील अतिरिक्त फॅट कमी करण्यासाठी होतो.

आलं
आलं हे देखील खूपच फायद्याचे आणि लाभदायी आहे. आल्याचे सेवन केल्यामुळेही चेहऱ्यावरील फॅट कमी होण्यास मदत मिळते.आल्याचा अगदी एक छोटा तुकडा तुम्ही चघळला तरी देखील तुम्हाला  चेहऱ्यावरील फॅट कमी करण्यास मदत मिळते. आल्यामध्ये अनेक असे घटक असतात ज्यामुळे चेहऱ्यावरील सौंदर्य टिकून राहण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

आता व्यायाम करायचा नसेल आणि चेहऱ्यावरील फॅट कमी करायचं असेल तर तुम्ही याचे सेवन नक्की करा.

या डाळींचे सेवन कराल तर मिळवाल सुंदर त्वचा

25 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT