ADVERTISEMENT
home / Care
स्किन ग्लो क्रिम

चेहऱ्याची चमक वाढवतील या क्रिम्स, नक्की करा ट्राय

 चेहरा नितळ असावा त्यावर एक छान चमक असावी असे सगळ्यांनाच वाटते. चेहऱ्यावर चमक असेल तर तो चेहरा अधिक सुंदर आणि चांगला दिसू लागतो. तुमची त्वचा सुंदर असेल पण त्यावर अजिबात चमक नसेल तर तुम्ही काही क्रिम्स ट्राय करायला हव्यात ज्या तुमच्या त्वचेच्या आत जाऊन तुमच्या त्वचेला आवश्यक असलेली चमक मिळण्यास मदत मिळेल. आम्ही असे काही क्रिम्स किंवा सीरम निवडले आहेत ज्याच्या उपयोगाने तुमची त्वचा अधिक चमकदार दिसू लागेल.

Hyaluronic Acid

 सध्याच्या काळात तुम्ही हायल्युरोनिक अॅसिड बद्दल आतापर्यंत अनेकदा ऐकले असेल. हाताला जाड असे लागणारे हे सीरममधील सोल्युशन तुमच्या त्वचेला ग्लो देण्याचे काम देखील करते. हे एक प्रकारचे सीरम आहे जे क्रिम्समध्ये असते. हे वापरल्यामुळे त्वचेवर एक वेगळीच चमक येऊ लागते. याचा रोज वापर करा. त्यामुळे तुमच्या त्वचेवर झालेला फरक तुम्हाला नक्की जाणवेल. क्रिम्समध्ये हे हायल्युरोनिक अॅसिड घेत असाल तर त्याचे प्रमाण नीट तपासा म्हणजे तुम्ही याचा वापर करु शकता.

Vitamin C सीरम

व्हिटॅमिन C हे त्वचेसाठी फारच चांगले असते. त्यामुळे त्वचेला ग्लो मिळण्यास मदत मिळते. त्वचा अधिक चमकदार आणि नितळ दिसू लागते. व्हिटॅमिन c असलेले कोणतेही क्रिम किंवा सीरम तुम्ही लावू शकत. त्यामुळे तुमची त्वचा नक्कीच चांगली दिसायला मदत मिळते. व्हिटॅमिन c च्या वापरामुळ त्वचा आतून चांगली होऊ लागते. त्वचेवरील टॅन निघण्यास मदत मिळते. त्यामुळे या सीरमचा वापर अगदी हमखास करा. 

बदाम तेलापासून अशी बनवा नाईट क्रिम, त्वचा दिसेल चमकदार

ADVERTISEMENT

व्हिटॅमिन E सीरम

 व्हिटॅमिन E असलेल्या कोणत्याही क्रिम्स तुमच्या चेहऱ्यासाठी फारच चांगले असते.  एखादी क्रिम्स विकत घेताना त्यामध्ये कोणते घटक आहेत ते तपासा व्हिटॅमिन E हे चेहऱ्यासाठी फारच फायद्याचे असते. त्यामुळे त्वचा नरिश होते शिवाय ती मॉश्चराईज व्हायला मदत मिळते.  त्यामुळे सीरम किंवा क्रिम या दोन्हीचा वापर तुम्ही करु शकता. 

पौगंडावस्थेतील मुलींचे प्युबिक हेअर काढताना

असा करा या क्रिम्सचा वापर 

जर तुम्ही या क्रिम्स किंवा सीरमचा उपयोग करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्याचा वापर कसा करायचा ते देखील जाणून घ्या. त्याचा उपयोग नेमका कसा करायचा ते जाणून घ्या. 

  1. आंघोळीनंतर एकदा तरी तुम्ही या क्रिमचा वापर करा. हातावर अगदी थोडीशी क्रिम घेऊन ती संपूर्ण चेहऱ्याला लावा.
  2. दिवसातून जास्तीत जास्त दोन वेळा याचा उपयोग करा. बाहेर जाताना शक्य नसेल तर तुम्ही रात्री झोपताना याचा वापर  केला तरी देखील चालू शकेल. 
  3. या क्रिम्स चमक देताता म्हणून  याचा जास्त वापर करु नका. असे केल्यामुळेही त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येणार नाही. 

आता हे घटक असलेल्या क्रिम्स वापरा आणि चेहऱ्यावरील चमक वाढवा.

ADVERTISEMENT

या क्रिम कॉम्बिनेशनचा वापर चेहऱ्यासाठी ठरु शकतो घातक


05 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT