ADVERTISEMENT
home / आरोग्य
ghasa dukhane upay

घसा दुखणे घरगुती उपाय आणि कारणे | Ghasa Dukhane Gharguti Upay

हल्ली कोणताही संसर्ग झाला की, थोडी भीतीच वाटते. त्यातच वातावरणात बदल झाला की, काही त्रास हे अगदी होतातच. त्यातीलच एक त्रास म्हणजे घसा दुखणे. काही वेळा अचानक आपला घसा दुखणे चा त्रास होऊ लागतो. घसा दुखण्याकडे दुर्लक्षही करुन चालत नाही. कारण त्याकडे अधिक दुर्लक्ष केले तर त्याचा देखील त्रास होऊ शकतो. घसा दुखण्याचा त्रास तुम्हाला होऊ लागला असेल तर घसा दुखणे घरगुती उपाय (Ghasa Dukhane Upay) तुम्हाला माहीत असायला हवे. घसा दुखणे आयुर्वेदिक उपायासोबत तुम्हाला घसा दुखी म्हणजे काय? ते माहीत असायला हवे. त्यामुळेच सगळ्यात आधी घसा दुखी म्हणजे काय? आणि घसा दुखणे घरगुती उपाय (Throat Pain Home Remedies In Marathi) जाणून घेऊया.

घसा दुखणे म्हणजे काय? (What Is Throat Pain)

ghasa dukhane upay
ghasa dukhane upay

घसा दुखणे म्हणजेच डॉक्टरी भाषेत थ्रोट इन्फेक्शन (Throat Infesction In Marathi) होय. घसा दुखी होण्यासाठी एक असे कारण नसते. वेगवेगळ्या कारणांमुळे घशावर ताण आला की, त्यामुळे घसा सुजणे, फुलणे, घशात खवखव होणे असे त्रास होऊ लागतात. आपले तोंड हे सगळ्यात जास्त कार्य करत असते. तोंडाचा वापर करताना अनेकदा जंतूचा शिरकाव हा तोंडातून होत असतो. जर शरीरातील प्रतिकारशक्ती कमी असेल तुम्हाला या इन्फेक्शनचा त्रास अगदी पटकन होऊ शकतो. पण सर्वानुमते घसा दुखण्यासाठी एक असे कारण असू शकत नाही.

घसा दुखणे कारणं (Causes Of Throat Pain)

ghasa dukhane karane
घसादुखीची कारणं

घसा दुखण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. तुम्हाला झालेली घसा दुखी ही कोणत्या कारणांमुळे झाली आहे हे जाणून घेणे गरजेचे असते. त्यासाठीच जाणून घेऊया घसा दुखणे कारणं

टॉन्सिल

टॉन्सिल हा घशामध्ये असलेल्या लसिका ग्रंथीचा समूह आहे. तोंड उघडल्यानंतर एक लंबगोल आकाराची त्वचा लोंबकळताना दिसते त्यालाच टॉन्सिल असे म्हणतात. घशात याचे असण्याचे काम श्वसनसंस्था, पचनसंस्था आणि जंतू संक्रमणाचा त्रास दूर करण्याचे काम टॉन्सिल करते. थंड पाण्याचे अतिरिक्त सेवन, ताप, सर्दी यामुळे देखील टॉन्सिलला सूज येते. या कारणामुळे सुद्धा घसा दुखीचा त्रास होऊ शकतो. जाणून घ्या टॉन्सिल्सची लक्षणे (Tonsil Symptoms In Marathi) आणि घरगुती उपाय.

ADVERTISEMENT

कोरडे तोंड

खूप जणांना कोरड्या तोंडाचा त्रास असतो. म्हणजे ज्यांच्या तोंडात लाळ फार कमी प्रमाणात असते. अशांना कोरड्या तोंडाचा म्हणजेच (Dry mouth) चा त्रास असतो. अशांची जीभ किंवा तोंड हे लाल दिसत नाही तर ते पांढरे दिसते. जर तुम्हालाही हा त्रास असेल तर या कारणामुळे तुम्हाला घसा दुखीचा त्रास उद्धभवण्याची शक्यता ही अधिक असते. तुमच्या तोंडाचे नीट निरिक्षण करा. जर तुम्हाला वरचेवर असा घसा दुखीचा त्रास असेल तर तुम्हाला वरील दोन्ही कारणांमुळे घसा दुखी होऊ शकते.

 सर्दी

सर्दी ही वाटत जरी साधी असली तरी देखील खूप जणांना त्यामुळे चांगलीच दमछाक होते. हल्लीच्या कोरोनाकाळात तर सर्दी होणे म्हणजे एक प्रकारे डोक्याला तापच आहे. सर्दी झाल्यानंतर ती आत ओढण्याची सवय प्रत्येकालाच असते. सर्दी सतत आत ओढली तर त्याचा परिणाम हा घसा दुखीमध्ये होऊ लागतो. त्यामुळे सर्दी दरम्यान झालेल्या घसा दुखीवर योग्यवेळी योग्य उपाय (Ghasa Dukhane Upay) करणे हे कधीही चांगले.

ताप

ताप हा देखील घसा दुखीसाठी कारणीभूत ठरतो. जर तुम्हाला ताप आला असेल अशावेळी  देखील घसा दुखण्याचा त्रास होऊ शकतो. कधी कधी ताप हा बाहेरुन लागत नसला तरी आतून आलेला असतो. जर तुम्हाला वरवर ताप लागत नसेल आणि घसा दुखत असेल तर त्यामागे तुम्हाला आलेला ताप हा देखील असू शकतो. अशा घासदुखीच्या वेळी तुम्ही तुमचा ताप तपासून घ्या म्हणजे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल.

तोंडाचा जास्त वापर

खूप जणांना सतत बोलण्याची सवय असते किंवा मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्या सतत बोलण्याचा ताण हा तुमच्या घशावर होत असतो. घशा दुखण्यामागे हे एक देखील कार असू शकते. जर तुम्ही तोंडाचा सतत वापर करत असाल तर तुम्ही थोडा आराम करणे हे फार गरजेचे असते. घशाचा वापर करताना तुम्हाला घशाचा त्रास होणे हे अगदी स्वाभाविक आहे. 

ADVERTISEMENT

तोंड उघडे ठेवून झोपणे

खूप जणांना तोंड उघडे टाकून झोपण्याची सवय असते. तोंड उघडे टाकून झोपल्यामुळे तोंडातील लाळ सुकते. घशात थेट जंतूचे अतिक्रमण होते. इतकेच नाही. तर तोंड कोरडे झाल्यामुळे घशावर त्याचा ताण येतो. जर तुम्हाला तोंड उघडे टाकून ठेवायची सवय असेल तर तुम्हाला ही सवय घसा दुखीसाठी कारणीभूत ठरु शकते.

घसा दुखणे घरगुती उपाय (Ghasa Dukhane Gharguti Upay In Marathi)

Ghasa Dukhane Gharguti Upay In Marathi

घसा दुखत असेल तर त्यावर काही सोपे आणि परिणामकारक असे घरगुती उपाय करता येतात. आम्ही इथे खास घसा दुखणे घरगुती उपाय (Ghasa Dukhane Upay) आणि घसा दुखणे आयुर्वेदिक उपाय (Ghasa Dukhi Var Upay) शोधून काढले आहेत. ज्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळण्यास मदत मिळेल.

 वाफ

हल्ली कोरोनामुळे खूप जणांना वाफ घेण्याची सवय झालेली आहे. घशात जाऊन बसणारा कोरोनाचा जंतू मारुन टाकायचा असेल तर त्यावर वाफ परिणाम करते. अगदी त्याच पद्धतीने घसा कोणत्याही कारणामुळे दुखत (ghasa dukhane upay in marathi) असेल तर तुुम्ही पाणी गरम करुन त्याची वाफ घ्यावी. ही वाफ तोंड उघडून घशाला लागेल अशा स्वरुपात घ्यावी. डोक्यावर टॉवेल घेतल्यानंतर तोंड उघडून जितके शक्य असेल तितकी वाफ आत ओढावी. त्यामुळे घशाला इन्स्टंट शेक मिळतो जो घशावर आलेल्या इन्फेक्शनचा खात्मा करण्यास मदत करतो. वाफ घेण्याचे फायदे लक्षात घेत तुम्ही घसा दुखीवर उपाय म्हणून वाफ घ्यायला हवी.

गरम पाणी

गरम पाण्याचे सेवन हा देखील घसा दुखणे उपाय यांपैकी एक आहे. हा उपाय फारच सोपा आणि परिणामकारक असा आहे. तुमचा घसा खूपच दुखत असेल तर (Ghasa Dukhi Var Upay) हा करुन पाहा. एका ग्लासात गरम पाणी घेऊन ते अगदी थोडे थोडे घशाला शेक मिळेल अशा स्वरुपात पित राहा. थंड प्यायल्यामुळे जर घशाला सूज आली असेल तर घशाची ही सूज उतरवून घसा बरा करते. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही गरम पाणी काही काळासाठी प्या. तुम्हाला नक्कीत आराम मिळेल.  

ADVERTISEMENT

पाण्याचे सेवन

कमी पाणी पिणे हे खूप आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगले असते. घसा दुखत असेल तर अशावेळी घसा कोरडा पडत असतो. घसा कोरडा पडला असेल आणि त्यात तुम्ही सतत बोलत राहाल किंवा आपले रोजचे काम करत राहाल तर तुमच्या घशावर त्याचा ताण नक्कीच पडणार. त्यामुळे घसा दुखत असेल तर घसा कोरडा पडू ठेवू नका. त्यापेक्षा तुम्ही सतत पाणी पित राहा. त्यामुळे तुम्हाला बरे वाटेल.

मध

मधामध्ये बॅक्टेरीयाशी लढणारे गुणधर्म असतात. त्यामुळे घसा दुखी बरे होण्यास मदत मिळते. मधाचा उपयोग करुन तुमच्या घशाला नक्कीच आराम मिळू शकतो. एक ग्लासभर गरम पाणी घ्या त्यामध्ये एक चमच मध घाला आणि हे पाणी दिवसातून 2 ते 3 वेळा प्या. त्यामुळे तुमच्या घशाला आराम मिळतो. इतकेच नाही तर मध आणि आलं एकत्र करुन त्याच्या गोळ्याही बनवल्या जातात ज्याला हनी ड्रॉप असे म्हटले जाते. ते चघळल्यामुळेही घशाला आराम मिळण्यास मदत मिळते. मध हे फारच फायदेशीर आहे.

मिठाचे पाणी

मिठाच्या पाण्यामध्येसुदधा बॅक्टेरियाशी लढण्याचे गुणधर्म असतात. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या या खूप वेळा तापामध्ये घेतलेल्या तुम्हाला आठवत असतील. तापामध्येही अनेकदा घसा फुलण्याचा त्रास होतो. जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे घसा दुखी होत असेल तर तुम्ही पाणी गरम करुन त्यामध्ये एक मोठा चमचा मीठ घाला. मिठाचे पाणी गरम असताना जमेल तितके पाणी घेऊन त्याच्या गुळण्या करा. काळे मीठ घातले तरी देखील चालू शकते. ग्लासभर पाण्याच्या गुळण्या करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

पेपरमिंट

पेपरमिंटच्या गोळ्या या देखील तुमच्या घशाला आराम देण्यास मदत करतात. बाजारात रेडिमेड पेपरमिंटच्या गोळ्या मिळतात. त्या गोळ्यांमुळे घशाला थंडावा मिळण्यास मदत मिळते. पेपरमिंटच्या गोळ्या या जास्तही खाऊ नका. दिवसातून दोन ते तीनवेळाच तुम्ही पेपरमिंटच्या गोळ्या खाऊ शकता. त्याहून अधिकवेळा गोळ्या खाल्ल्या तर त्यामुळे जीभ फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे पेपरमिंटच्या गोळ्या तुमच्या पाकिटात ठेवून द्या.

ADVERTISEMENT

लिंबू

लिंबामध्येही अनेक अँटीबॅक्टेरिअल घटक असतात. घशामध्ये जर तुम्हाला खवखव जाणवत असेल किंवा सूज जाणवत असेल, आवंढा गिळायला त्रास होत असेल तर तुम्ही गरम पाण्यात लिंबू पिळून त्याच्याही गुळण्या घेऊ शकता. त्यामुळेही तुम्हाला आराम मिळेल. याशिवाय तुम्ही मध, लिंबाचा रस आणि काळेमीठ एकत्र करुन त्याचे चाटण करुनही चाटू शकता. त्यामुळेही तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. 

लसूण

लसणीचे सेवनही घशासाठी फारच फायद्याचे असते. जर घास खवखवत असेल घशामध्ये ताण जाणवत असेल तर काही लसणीच्या पाकळ्या घेऊन त्या चांगल्या किसाव्यात त्याचा अर्क काढून मग तो  घशात घालावा. त्यामुळे घशाची सूज कमी होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला लसणीचा त्रास होत नसेल तर तुम्ही लसणीचा वापर करु शकता.

मेथी

मेथी दाण्यामध्येही अनेक औषधी गुणधर्म असतात. जर तुम्हाला छातीत कफ झाला असेल तर तो बाहेर काढण्यासाठी घसा दुखणे घरगुती उपाय यामधील हा एक उत्तम उपाय आहे. जर तुम्हाला मेथीची कोणतीही अॅलर्जी नसेल तर तुम्ही मेथी दाणे पाण्यात भिजत घालून ठेवा. मेथी चांगली फुगली की, मग ते पाणी गरम करुन हे गरम पाणी प्या त्यामुळे छातीतील कफ निघून जाण्यास मदत मिळते. त्यामुळे मेथीदाण्याचा उपयोगही तुम्ही करु शकता.

लवंग

गरम मसाल्यामधील लवंग हा असा पदार्थ आहे जो जेवणात चव वाढवतोच पण त्याचे अनेक आरोग्यवर्धक असे फायदे आहेत. लवंगामुळे घसा दुखी बरी होण्यास मदत मिळते. घसा खवखवत असेल किंवा घसा सुजला असेल तर लवंगचा उपयोग हा घशासाठी फारच फायद्याचा ठरतो. लवंगाची पूड घेऊन ती एक ग्लासभर पाण्यात घाला. हे पाणी उकळा. या पाण्याचे सेवन करा त्यामुळे तुमच्या घशाची सूज कमी होण्यास मदत मिळते.

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. घसा दुखणे ही गंभीर समस्या आहे का?

घसा दुखणे वरवर असेल तर ती समस्या गंभीर नाही. कारण कालांतराने घसा दुखण्याचा त्रास बरा होऊ शकतो. पण जर तुम्हाला झालेेली घसा दुखी ही बरी होत नसेल आणि त्याचा परिणाम हा तुमच्या आरोग्यावर होऊ लागला असेल तर मात्र ती गंभीर समस्या आहे असे समजावे. घसा दुखीच्या त्रासाचा नेमका परिणाम तुमच्या शरीरावर कसा होतो त्यावर तो गंभीर आहे की नाही हे सांगता येते.

 2. घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाच सगळ्यात सोपा आणि जलद असा उपाय कोणता?

गरम पाण्याचे सेवन हा घसा दुखीपासून आराम मिळवून देण्यास एकदम फायद्याचा ठरतो. यामुळे घसा शेकला जातो. याशिवाय घसा दुखीसाठी मिळणाऱ्या खास गोळ्या या देखील त्यावर परिणामकारक पद्धतीने काम करतात. कोणताही उपाय हा सोपा आणि जलद नसतो त्याला थोडासा वेळ हा द्यावाच लागतो.

3. घसादुखी किती काळासाठी राहते?

घसा दुखी ही साधारण एक ते दोन दिवसांसाठी राहते. पण त्याचे ठोस असे प्रमाण नाही. तुम्हाला सुरु झालेला घसा दुखी नेमकी कोणत्या कारणामुळे सुरु झालेली आहे. त्यावर ती किती काळासाठी राहणार हे अवलंबून असते. उदा. जर तुम्हाला टॉनसिलमुळे घसा दुखी लागला असेल तर त्याचा त्रास टॉनसिलच्या बरे होण्यावर अवलंबून असते.

09 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT