Advertisement

बॉलीवूड

सूर्यवंशीमध्ये ‘बॅडमॅन’ साकारणार व्हिलनची भूमिका

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jun 5, 2019
सूर्यवंशीमध्ये ‘बॅडमॅन’ साकारणार व्हिलनची भूमिका

सिंघम आणि सिंबाच्या यशानंतर आता रोहित शेट्टी ‘सूर्यवंशी’मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे शुटींग सध्या सुरु आहे. आता या चित्रपटासंदर्भातील एक महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे या चित्रपटाला व्हिलन मिळाला आहे. बॅडमॅन म्हणजेच गुलशन ग्रोवर या चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमुळे हा खुलासा झाला असून बॅडमॅनच्या या कॅरेक्टरबाबत अजूनही कोणता खुलासा करण्यात आला नाही.

भर कार्यक्रमात अर्पिता खानने दिला जॉर्जियाला ओढणी सावरण्याचा सल्ला

sooryavanshi fi

भूमिका गुलदस्त्यात

गुलशन ग्रोवर हा बॉलीवूडमध्ये बॅडमॅन  म्हणून प्रसिद्ध आहेच. त्याने अनेक निगेटिव्ह भूमिका साकारल्या आहेत. पण या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे ती यासाठी कारण या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. गुलशन ग्रोवरला त्याच्या भूमिकेसंदर्भात विचारल्यानंतर त्याने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. त्याने त्याची भूमिका सिक्रेट ठेवली आहे. त्यामुळे जो पर्यंत या चित्रपटाचा ट्रेलर किंवा टीझर येत नाही तो पर्यंत गुलशन ग्रोवरची भूमिका स्पष्ट होणार नाही.

मी आहे रोहितचा फॅन

gulshan gover

गुलशन ग्रोवरने अनेक चित्रपट दिग्दर्शकांसोबत काम केलेले आहे. पण त्याने सध्या त्याच्या आवडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टी असल्याचे सांगितले आहे. त्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार रोहितचे चित्रपट हे फारच वेगळे असतात. कुटुंबासोबत पाहण्यासारखे त्याचे चित्रपट असतात. शिवाय त्यात नेहमी काहीतरी वेगळेपणा पाहायला मिळतो. त्यामुळे मी नशीबवान समजतो की, मला रोहितच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळतेय.

दीपिकालाही वाटते की झोप महत्वाची आहे

भूमिका अशी असण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुलशन ग्रोवरचे हे कॅरेक्ट गुड आणि बॅड असे कॉम्बिनेशन असणार आहे असे कळत आहे.  तुम्हाला त्याने साकारलेली ही भूमिका बॅडमॅनची आहे असे वाटेल. पण त्याच्यासाठी मात्र ही भूमिका चांगल्या माणसाची आहे. त्यामुळे आता हे कॉम्बिनेशन असलेले असे कॅरेक्टर आहे.

करण जोहरसोबतही करणार काम

रोहित शेट्टी, अक्षय कुमार आणि गुलशन कुमार हा ट्रायो तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात हे दिसणार आहे. आता तिघे म्हणजे रोहित शेट्टी दिग्दर्शकाच्या भूमिकेत आणि अक्षय, गुलशन या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.

gulshan gover 1

अजय-काजोलची निसा होत आहे या कारणामुळे ट्रोल

Hatestory4 मध्ये दिसला होता गुलशन

2018 साली आलेल्या Hatestory4 मध्ये गुलशनकुमार दिसला होता. यात त्याची भूमिका निगेटिव्ह नसली तरी त्याने या चित्रपटात गुन्हेगार मुलांच्या वडिलांची भूमिका साकारली होती.त्याला या भूमिकेत पाहून अनेकांना आश्चर्य वाटले होते. गुलशनच्या करिअरचा विचार केला तर त्याने आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिका लक्षात राहिल्या आहेत. त्याने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये फारच कमी केला चांगल्या माणसाचे काम केले असेल कारण निगेटिव्ह रोलमध्येच त्याला अनेकांनी पसंद केले आहे. ‘राजा की आयेगी बारात’, ‘शेरा’, ‘जीगर’, ‘पाप’, ‘यस बॉस’, ‘बूम’, ‘एक खिलाडी एक हसीना’, ‘जिस्म’, ‘हेटस्टोरी 4’ या काही चित्रपटातून त्याने काम केले आहे. 

(फोटो सौजन्य- Instagram)