महाशिवरात्री हा महादेवाचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी हिंदू धर्मात मोठ्या प्रमाणात शंकराची उपासना केली जाते. तसंच दिवसभर उपवासही केला जातो. या शुभ दिवसाच्या निमित्ताने आजकाल एकमेकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या जातात. यंदा महाशिवरात्र 2022, 1 मार्चला आहे. मग या निमित्ताने तुम्हीही खास महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा (mahashivratri wishes in marathi), महाशिवरात्रिचे कोट्स (Mahashivratri Quotes In Marathi) आपल्या प्रियजनांना पाठवा आणि तुमच्या सोशल मीडियावरही शिवशंकराचे भक्तीपूर्ण स्टेटस नक्की ठेवा (mahashivratri status in marathi). हर हर महादेव.
Table of Contents
Mahashivratri Wishes In Marathi – महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्रीच्या पावन दिवशी आपण भक्तीरसात तर गुंग असतोच पण यादिवशीही एकमेंकांना आवर्जून शुभेच्छा दिल्या जातात. पाहा महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा (Mahashivratri Chya Hardik Shubhechha).
- शिवाचा महिमा आहे अपरंपार, भगवान शिव करेल सर्वांचा उद्धार, त्याची कृपा आपल्यावर कायम राहो, आपल्या सर्वांवर शंकराचा आशिर्वाद राहो…महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा
- बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड, शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे, भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले…हॅपी महाशिवरात्री
- शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- पिऊन भांग रंग जमेल..आयुष्य भरेल आनंदाने..घेऊन शंकराचे नाव..येऊ दे नसानसात उत्साह..तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- शंकराच्या ज्योतीने येईल तेज, भक्तांच्या हृद्याला मिळेल शांतता,शिवाच्या द्वारी जो येईल,त्याच्यावर नक्कीच होईल देवाची कृपा…शुभ महाशिवरात्री..mahashivratri chya hardik shubhechha
- शिवाच्या ज्योतीने वाढेल प्रकाश..जो येईल शिवाच्या द्वारी..शिव सर्व संकटातून मुक्तता करी..हर हर महादेव…महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा
- ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास..ॐ मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार..ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..जय शिव शंकर..महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा
वाचा – महाशिवरात्रीनिमित्त ट्राय करा उपवासाच्या ‘या’ पौष्टिक रेसिपी
- शिव आहे सत्य , शिव आहे अनंत
शिव आहे अनादी, शिव भगवंत आहे
शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म
शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती
चला शंकराचे करूया नमन
राहो शिवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. - सर्व जग ज्याच्या शरणी आहे..त्या भगवान शंकराला नमन आहे, भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ..चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…हर हर महादेव. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
- भोले बाबाचा आशिर्वाद मिळो तुम्हाला, मिळो प्रार्थनेचा प्रसाद तुम्हाला, आयुष्यात मिळो तुम्हाला खूप यश, प्रत्येकाचं मिळो तुम्हाला प्रेम, जय भोले शिव शंकर बाबाची जय.
- एक पुष्प..एक बेल पत्र..एक तांब्या पाण्याची धार..करेल सर्वांचा उद्धार, जय भोले बम-बम भोले.
- भोलेच्या लीलेत व्हा गुंग
शंकरापुढे करा नमन
आज आहे महाशिवरात्र
आजच्या दिवशी व्हा भक्तीरसात मग्न
mahashivratri chya hardik shubhechha… - बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे प्रिय..भक्तांवर लक्ष ठेवण्याऱ्या हरीचं नाव आहे प्रिय..शंकराची ज्याने केली पूजा मनोभावे..शंकराने त्याच्यावर केली सुखांची सावली..हर हर महादेव
- हर हर महादेवचा होऊ दे गजर….महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा.
- आज आहे शिवरात्र माझ्या भोलेबाबांचा दिवस..आजच्या दिवशी मला गाऊ दे शंकराची भक्तीगीतं..जय महादेव..महाशिवरात्रि शुभेच्छा.
Mahashivratri Quotes In Marathi – महाशिवरात्री कोट्स मराठी
शंकराचे भक्त हे आपल्या भोलेनाथाच्या भक्तीरसात गुंग असतात. त्यामुळे अगदी महाशिवरात्री असो वा महादेवाचं स्मरण करणं असो ते महाकाल शिवाच नेहमीच वंदन करतात. त्यांच्यासाठी काही खास कोट्स.
- खूप सुंदर आहे माझ्या विचारांचं जग
महाकालपासून सुरू आणि महाकालवर समाप्त
जय महाकाल - हे हृदय तुमच्यामुळे
हे जीवन तुमच्यामुळे
तुम्हाला मी कसं विसरू
महाकाल माझं जग
जय श्री महाकाल - आकाशात आहे महाकाल
सगळीकडे आहे त्रिकाल
तेच आहेत माझे महाकाल - मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले
आता मी समजलो माझं मला
जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा - महाकाल महाकाल नावाची किल्ली उघडेल प्रत्येक कुलूप
होतील सर्व कामं, बोला फक्त जय श्री महाकाल - पोहायचं असेल तर समुद्रात उतरा
नदी-नाल्यात काय आहे
प्रेम करायचं असेल शंकरावर करा
बाकीच्या गोष्टीत काय आहे
जय श्री महाकाल - मी झुकणार नाही मी शौर्याचा अखंड भाग आहे
जो जाळेल अधर्माला तो मी, महाकाल भक्त आहे
जय शंभो - मायेच्या मोहातला व्यक्ती विखुरला जातो तर
महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती मात्र उजळून जातो
हर हर महादेव - ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव
त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव
हर हर महादेव - आयुष्य एक लढाई आहे
भोलेनाथ तुमच्या सोबत आहे
हर हर महादेव.
Happy Mahashivratri Wishes In Marathi – शुभ महाशिवरात्री शुभेच्छा मराठी
महाशिवरात्र आहे म्हटल्यावर एकमेकांना एसएमएस पाठवणं तर आलंच. मग तुम्हालाही उपयोगी पडतील हे महाशिवरात्री शुभेच्छा एसएमएस.
- हवेत आला आहे नवा उत्साह.. वाहतो आहे भक्तीचा प्रवाह.. शंकराच्या भक्तीत व्हा धुंद..हर हर महादेव
- जागोजागी आहे शंकराची छाया
वर्तमान आहे शिव, भविष्य आहे शिव
तुम्हा सर्वांना महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा - शिवाची राहो तुमच्यावर कृपा
तुमच्या नशिबाचा होवा कायापालट
तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा - भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख - असं म्हणतात की, श्वास घेतल्याने प्राण येतो
श्वास न घेतल्यास जातो प्राण
कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत
कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने - ॐ नमः शिवाय, सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा
- साजरी करूया महाशिवरात्र धूमधडाक्यात
त्यात मिळाली जर शिवरात्रीची भांग तर क्या बात - हातात आहे डमरू आणि काल नाग आहे सोबत
आहे ज्याची लीला अपरंपार
तो आहे भोलेनाथ - महाकालचा लावा नारा
शत्रू पण म्हणेल पाहा
महाकाळचा भक्त आला
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा - अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव - एक पुष्प
एक बेलपत्र
एक तांब्या पाण्याची धार
करेल सर्वांचा उद्धार
जय भोले बम-बम भोले - शंकराची शक्ती, शंकराची भक्ती
आनंदाची होईल उधळण
महादेवाच्या कृपेने प्रत्येक संकट होईल दूर
प्रत्येक पावलावर मिळेल यश
महाशिवरात्रिच्या शुभेच्छा - महाशिवरात्रिच्या या पवित्र पर्वावर
यशाचा डमरू सदैव तुमच्यावर वाजत राहो - भक्तीत आहे शक्ती बंधू
शक्तीमध्ये संसार आहे
त्रिलोकात ज्याची चर्चा आहे
तो आज शंकराचा सण आहे - बाबाकडे प्रार्थना करत आहे
तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
बाबांचा आशिर्वाद तुमच्यावर कायम राहो
शिवरात्रीच्या शुभेच्छा.
वाचा – महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे
Mahashivratri Status In Marathi – महाशिवरात्री स्टेटस मराठी
भारतात तब्बल 12 ज्योतिर्लिंगाची नावे आणि त्यांची महती आहे. महादेवाचे भक्त म्हटल्यावर महाशिवरात्रिला वॉट्सअप आणि फेसबुक स्टेटस ( Mahashivratri Status In Marathi) ठेवणं ओघाने आलंच. मग पाहा खालील काही स्टेटस जे तुम्ही खास या दिवशी ठेऊ शकता.
- माझ्यात कोणताही छळ नाही, तुझं कोणतंही भविष्य नाही
मृत्यूच्या गर्भातही मी आयुष्याच्या जवळ आहे
अंधकाराचा आकार आहे, प्रकाशाचा प्रकार आहे
मी शंकर आहे मी शंकर आहे. - सौराष्ट्रे सोमनाथंच श्री शैले मल्लिकार्जुनम् ।
उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम् ॥
केदारे हिगवत्पृष्ठे डाकिन्यां भीमशंकरम् ।
वाराणस्यांच विश्वेशं त्र्यम्बंक गौतमी तटे ॥
वैद्यनाथं चिताभूमौ नागेशं दारुकावने ।
सेतुबन्धे च रामेशं घृष्णेशंच शिवालये ॥
एतानि ज्योतिर्लिंगानि प्रातरुत्थाय य: पठेत् ।
जन्मान्तर कृत पापं स्मरणेन विनश्यति ॥
महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा. - भक्तीत आहे शक्ती बंधू
शक्तीमध्ये आहे संसार
त्रिलोकात आहे ज्याची चर्चा
तो आज आहे महादेवाचा सणवार
महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा - माझ्या शंकरा भोले नाथ
देवा तुझ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण कर
आणि तुझा आशिर्वाद आमच्यावर कायम ठेव
जय शिव शंभू भोलेनाथ - वादळाला जे घाबरतात, त्यांच्या मनात प्राण असतात
मृत्यूला बघून जे हसतात त्यांच्या मनात महाकाल असतात - हे कलियुग आहे इथे चांगल्याला नाही वाईटपणाला मान मिळतो
पण आम्ही आहोत महाकालचे भक्त, आम्ही मानाचे नाही
आम्ही रूद्राक्षाचे भक्त आहोत
जय महाकाल - काल पण तूच महाकाल पण तूच
लोक ही तूच त्रिलोकही तूच
शिव पण तूच आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल
हर हर महादेव - जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे
जय महाकाल हर हर महादेव - मला माहीत नाही मी कोण आहे आणि मला कुठे जायचं आहे
महादेवचं माझी ध्येय आहे आणि महाकालच माझा ठिकाणा आहे - जसं हनुमानाच्या हृदयात श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात बाबा महाकाल आहेत
जय श्री महाकाल
तुम्हीही महाशिवरात्री मराठी माहिती पाहण्यासाठी POPxoMarathi वरील इतर लेखही वाचू शकता. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा (Mahashivratri Wishes In Marathi), महाशिवरात्री कोट्स (Mahashivratri Quotes In Marathi), महाशिवरात्री स्टेटस (Mahashivratri Status In Marathi) हे महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा (Mahashivratri Chya Hardik Shubhechha In Marathi) देण्यासाठी आमच्या वेबसाईटवर नक्की वाचा. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. जय शिव शंभो.
हेही वाचा –
महाकाल शायरी (Mahakal Shayri in Hindi)
‘गणेश चतुर्थी’ बद्दलची संपूर्ण माहिती
मकरसंक्रांतीला संपूर्ण भारतात करण्यात येणारे ‘15’पदार्थ
Mahashivratri Shayari in Hindi