खूप जणांना आपल्या ब्युटी किटमध्ये नैसर्गिक घटक असलेल्या गोष्टी वापरायला खूप आवडतात. अनेक जण खास सौंदर्यासाठी हर्बल गोष्टींचा वापर करण्याला अधिक प्राधान्य देतात. तुम्हालाही कोणत्याही केमिकल्सचा वापर न करता सुंदर त्वचा हवी असेल आणि तुम्ही त्यासाठी काही हर्बल प्रॉडक्टसचा वापर करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या ब्युटी किटमध्ये काही हर्बल पावडर ठेवायला काहीच हरकत नाही. या हर्बल पावडर कोणत्याही आर्युवेदिक दुकानात मिळतात आणि त्यामुळे त्वचा सुंदर होण्यास हमखास मदत मिळते. चला तर जाणून घेऊया अशाच काही हर्बल पावडर
अस्सल केशर कसे ओळखावे? जाणून घ्या
गुलाब पावडर
अगदी कोणत्याही त्वचेसाठी वापरता येईल अशी ही हर्बल पावडर आहे. गुलाबाच्या पाकळ्यांचे गुणधर्म यामध्ये उतरलेले असतात. त्यामुळे ही पावडर तुमच्या त्वचेचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. गुलाबाच्या पाकळ्या अंँटी- ऑक्सिडंट आणि अँटी- एजिंग असतात ज्यामुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते. त्वचा स्वच्छ दिसते. त्वचा टवटवीत आणि फ्रेश दिसू लागते. कोणत्याही हर्बल स्टोअरमध्ये तुम्हाला ही पावडर मिळू शकते. ही अगदी बजेटमध्ये मिळते. त्यामुळे तुम्ही गुलाब पावडर नुसती भिजवून ती चेहऱ्याला लावली तरी चालू शकेल. आठवड्यातून केवळ दोन वेळाच तुम्ही ती चेहऱ्याला लावा. कारण ती जास्त लावणे देखील त्वचेसाठी चांगले नाही. गुलाबाचे वेगवेगळे फेसपॅकही तुम्ही ट्राय करु शकता.
चंदन पावडर
चंदन पावडर ही हर्बल पावडरमधील सगळ्यात महाग अशी पावडर आहे. चंदन सा बदन चंचल चितवन…. असे चंदनाबद्दल म्हटले जाते. सुंगधित अशी चंदनाची ओळख आहे. त्वचेसाठी चंदन हे फारच फायदेशीर आहे. अगदी प्राचीन काळापासून चंदन हे सौंदर्यासाठी वापरले जाते.चंदनाचे गुणधर्म केस आणि त्वचेचे सौंदर्य खुलवते. चंदनाच्या वापरामुळे त्वचेचे डाग जातात. नॅचरल ग्लो आणण्यासाठी चंदनाच्या पावडरचा उपयोग केला जातो. चंदन नुसते न लावता त्यामध्ये आंबेहळदीची पावडर घालून जर तुम्ही त्याचा एक पॅक तयार करु शकता. त्यामुळे त्वचेला तजेला मिळण्यास मदत मिळते. जर त्वचा टॅन झाली असेल तर ती पूर्ववत करण्यास चंदन पावडर मदत करते.
सतत एसीमध्ये बसून होतेय त्वचा कोरडी, वापरा घरगुती उपाय
कडुनिंबाची पावडर
कडुनिंबाची पावडर ही देखील अँटी एजिंग आणि अँटी- इन्फ्लेमेटरी आहे. या पावडरचा उपयोग केल्यामुळे त्वचेच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत मिळते. पिंपल्स किंवा त्वचेवर पुरळ आलेले असतील तर तुम्ही कडुनिंबाची पावडर घेऊन त्यामध्ये पाणी घाला आणि ही पेस्ट किंवा पॅक चेहऱ्याला लावा. हा पॅक लावल्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते. त्यामुळे कडुनिंबाची पावडरचा आठवड्यातून दोन वेळाच वापर करा. जर तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर तुम्ही त्याचा वापर थांबवा. कडुनिंबाची पावडर ही बाजारातून विकत घ्यायची नसेल तर तुम्ही ती घरी केली तरी चालू शकेल.
आता या हर्बल पावडर अगदी हमखास खरेदी करा आणि सुंदर दिसा
चेहऱ्यावरील फॅट कमी करतील हे पदार्थ