ADVERTISEMENT
home / आरोग्य
Home Remedies For Eczema In Marathi

इसब त्वचारोग वर घरगुती उपाय (Eczema Home Remedies In Marathi)

त्वचेच्या समस्येपैकी एक असलेला इसब हा प्रकार वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. एक्झिमा (Eczema) असे त्याला इंग्रजीमध्ये म्हटले जाते. त्वचेच्या त्रासामुळे जगभरातील अनेक लोक त्रस्त आहेत. पण योग्य इलाजानिशी हा त्रास बरा होऊ शकतो.त्वचेच्या अनेक समस्यांपैकी असलेली ही समस्या अनेकांना फारशी नीट माहीत नाही. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केले जाते. पण याचे भयावह परिणाम होऊ शकता. तुम्ही देखील या त्वचा रोगाबद्दल ऐकले नसेल तर तुम्हाला या त्वचारोगाविषयी अत्यंत महत्वाची माहिती जाणून घ्यायला हवी. इसब म्हणजे काय ?, त्याची लक्षणे कोणती? आणि त्यावर नेमका काय घरगुती इलाज करायचा ते आता आपण जाणून घेऊया. चला करुया सुरुवात

इसब म्हणजे काय? (What Is Eczema?)

इसब म्हणजे काय

Instagram

इसब हा त्वचा रोगाचा एक प्रकार असून या त्रासामध्ये शरीरावरील काही भागात खूप खाज येऊ लागते. ही खाज इतकी असह्य असते की, यामुळे तुमच्या त्वचेवर जखमा होऊ लागतात. ही जखम नखांमुळे होत असली तरी ती खाज खोलवर असल्यामुळे त्यातून रक्त येण्याचीही शक्यता असते. इसब होण्याची अनेक कारणे आहेत. त्वचेच्या स्वच्छतेसोबतच काही अनुवंशिक कारणांमुळेही इसब होण्याची शक्यता असते. त्यामुळे इसब हा एक त्वचारोगाचा प्रकार असून यामध्ये त्वचेवर चट्टे येणे,खरपुड्या निघणे आणि त्वचा सुजणे अशी काही लक्षणे दिसू लागतात. 

ADVERTISEMENT

वाचा – सुरमा त्वचा रोगावरील उपाय

इसबची लक्षणे (Symptoms Of Eczema In Marathi)

इसबची लक्षणे

Instagram

इसब म्हणजे काय हे जाणून घेताना इसबसंदर्भातील अनेक लक्षण लक्षात आली असेल. पण आता ही लक्षण अगदी योग्य पद्धतीने जाणून घेऊया. 

कोरडी त्वचा (Dry Skin)

कोरडी त्वचा हा त्रास आपल्याला वातावरण बदलल्यानंतरही होतो. पण हा बदल शरीराच्या संपूर्ण भागाला होतो. जरासे मॉईश्चरायझर लावले की, तुमची त्वचा पुन्हा चांगली दिसू लागते. पण जर तुम्हाला इसब झाले असेल तर तुम्ही त्वचा फार वेगळी दिसते. त्वचेच्या काहीच भागावर अशाप्रकारे कोरड्या त्वचेचे चट्टे दिसू लागतात. हे चट्टे इतके स्पष्ट असतात की, तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. पाय, हात, पाठ, गाल अशा शरीराच्या कोणत्याही भागावर हे चट्टे दिसू लागतात. या कोरड्या त्वचेला सतत खाज येत राहते. सतत खाजवल्यामुळे ही त्वचा अधिक खराब दिसते. ती अधिक पांढरी आणि खराब दिसू लागते. 

ADVERTISEMENT

त्वचेचा रंग जाणे (Inflamed And Discolored Skin)

इसब झाल्यानंतर जे चट्टे उठतात. त्याला सतत खाजवल्यामुळे त्वचा दुखावली जाते. त्वचेला सतत त्या जागेमध्ये जखमा झाल्यामुळे तो भाग काळा पडू लागतो.  त्यातच त्यातून रक्त येत असेल तर त्या ठिकाणी जखम तयार होते. अनेकदा या जखमांमधून पाणीही येते. त्यामुळे एखादी जखम झाल्यानंतर त्वचेचा रंग ज्या पद्धतीने बदलतो. अगदी त्याच पद्धतीने तुमच्या त्वचेचा रंग बदलत जातो. कधी कधी ती जागा काळा पडण्याऐवजी पांढरी पडत जाते. त्वचेची जळजळ वाढत राहते. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते

सूज येणे (Swelling)

 

शरीराला कधी खूप खाज सुटली की, खूप खाजवूनही शरीराला सूज आलेली तुम्ही पाहिली असेल. जर तुम्हाला इसब झाले असेल तर ज्या ठिकाणी चट्टे उठले आहेत त्या ठिकाणी तुमच्या त्वचेला चट्टे येऊ लागतात. त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी त्वचा लालसर पडते आणि सुजू लागते. जर तुम्हाला शरीराच्या काही भागात सतत खाजवून सूज येत असेल तर तुम्हाला इसब असण्याची शक्यता आहे. त्याकडे वेळीच लक्ष द्या.

शरीरावरील चट्टे (Leathery Patches)

इसबचे अगदी सुरुवातीचे लक्षण हे अशापद्धतीचे असते असे म्हणायला काहीच हरकत नाही. कधीकधी आपल्या शरीरावर अचानक काही चट्टे दिसू लागतात. हे चट्टे सर्वसामान्य नसतात. तर या चट्ट्यांना भयंकर खाजही येते. हा चट्टा उन्हाच्या जरासा जरी संपर्कात आला तरी देखील तो भाग फार जळू लागतो. शरीरावर येणारे चट्टे हे इसबचेच असतील असे ठामपणे सांगता येत नाही. पण तुम्ही त्याचा योग्य सल्ला घेतला तर हे नेमके काय आहे ते कळू शकेल. त्यामुळे शरीरावरील चट्ट्यांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

त्वचेवरुन खरपुडया निघणे (Crusting)

 शरीरावर जखमा झाल्यानंतर या जखमा सुकताना त्याची खवल तयार होतात. इसबमध्ये सतत त्वचा खाजवल्यामुळे त्याभागी त्वचेवर खड्डे पडू लागतात. ही जखम खाजवून अधिक खोलवर गेली की, त्यातून पाणी येऊ लागते.ही जखम पुन्हा सुकते. त्यामुळे त्याच्या खवल्या पडत राहतात. त्वचेवर अशा प्रकारे सतत खरपुड्या निघत राहिल्यामुळे त्या त्वचेचा थर अधिक जाड होत राहतो आणि त्वचा खराब दिसू लागते. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या बाबतीत असे होत असेल तर तुम्ही त्याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. 

ADVERTISEMENT

नागीण रोग घरगुती उपाय (Nagin Disease In Marathi)

इसबवर घरगुती इलाज (Eczema Treatment In Marathi)

इसबची काही लक्षणे जाणून घेतल्यानंतर आता पाहुयात घरच्या घरी याची नेमकी कशापद्धतीने काळजी घ्यायची ते. म्हणजे तुमची त्यातून लवकर सुटका होईल.

कोरफड जेल (Aloe Vera Gel)

कोरफडीच्या गरापासून तयार करण्यात आलेली कोरफड जेल ही अनेक बाबतीत फायदेशीर असते. त्वचेची जळजळ कमी करुन त्याला मॉईश्चर करण्यास कोरफड जेल मदत करते. इसबमध्येही सतत येणाऱ्या खाजेला थंड करुन ती नियंत्रित करण्याचे काम करते. त्यामुळे थोडासा आराम देखील मिळतो.

असा करा वापर :  कोरफड जेल हातात घेऊन तुम्हाला ज्या भागात इसब झाले आहे. त्यावर पसरवून लावा. असे करताना तुम्ही त्याचा जाड थर लावा. ही जेल लावल्यानंतर नक्कीच तुम्हाला काही काळ खाज येईल. पण कालांतराने ही खाज नक्कीच कमी होईल. 

ADVERTISEMENT

नारळाचे तेल (Coconut Oil)

नारळाच्या तेलाचा करा उपयोग

Instagram

त्वचेच्या अनेक समस्यांसाठी नारळाचे तेल हा देखील एक उत्तम पर्याय आहे. नारळाच्या तेलामुळे जखमेला आलेली सूज किंवा जळजळ कमी होते. त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते. पायांवरील सूज कमी करायची असेल आणि त्वचेला झालेल्या जखमांची तोंड बंद करायची असतील तर तुम्हीसोबत नारळाचे तेल ठेवा. नारळाच्या तेलामुळे तुम्हाला बराच आराम मिळतो. 

असा करा वापर : हातावर थोडे नारळाचे तेल घेऊन तुम्ही नारळाच्या तेलाने त्या जखमेवर मालिश करा. जर तुमची जखम उघडी पडली असेल तर त्यामध्येही तुम्ही नारळाचे तेल घालू शकता. त्यामुळे जखम बंद होण्यास मदत मिळते. 

ओट्स (Oatmeal)

ओट्सचा करा वापर

Instagram

ADVERTISEMENT

उत्तम आहार म्हणून ओट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. ओट्समधील स्निग्ध घटक त्वचेतील तजेला कायम ठेवण्यास मदत करतात. इसबमध्येही ओट्स फारच फायदेशीर ठरतात. ओट्स भिजवून इसबला लावल्यानंतर तेथील भागाला थंडावा मिळतो. त्वचा कोरडी झालेली असेल तर त्या भागाला थोडासा थंडावा मिळतो. त्यामुळे तुम्ही ओट्सचा वापरही करु शकता 

असा करा वापर : एका भांड्यात एक ते दोन चमचे ओट्स घेऊन ते छान भिजवून ठेवा. ते नरम पडले की, हाताने ते चांगले मळून घ्या. त्याची पेस्ट तयार करा आणि ती त्या भागाला लावून ठेवा. ती वाळेपर्यंत ठेवा. म्हणजे तुम्हाला आराम मिळेल. वाळल्यानंतर तुम्ही स्वच्छ कपड्याने थंड किंवा कोमट पाण्याने धुवून घ्या.

गरम आणि थंड पाण्याची आंघोळ (Hot Or Cold Bath)

गरम किंवा थंड पाण्याची करा आंघोळ

Instagram

जळजळ किंवा शरीरावर खूप सूज असेल अशावेळी गरम आणि थंड अशा दोन्ही पाण्याचा वापर खूप चांगला ठरतो. थंड पाण्याने तुमच्या शरीरालाच दाह कमी होतो. तर गरम पाण्यामुले तुमच्या शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत मिळते. तुम्ही सातत्याने  असे करु नका. 

ADVERTISEMENT

असा करा वापर : जर तुमच्या शरीराला सूज आली असेल तर तुम्ही गरम पाण्याच्या टबमध्ये बसून राहा तुम्हाला थोडासा आराम मिळेल. 

आणि जर तुम्हाला सतत जळजळ होत असेल तर तुम्ही छान थंड पाण्यात पडून राहा तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. 

मध (Honey)

मधाचा करा उपयोग

Instagram

मध हे उष्ण असते. शरीरातील अतिरिक्त उष्णता काढून टाकत आराम देण्याचे काम मध करते. मधाचा उपयोग करुन तुम्हाला थोडासा आराम मिळू शकतो. अनेक जण मध लावण्याचा मुळीच सल्ला देत नाही. कारण त्यामुळे अनेकांना त्रास होतो. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार जर तुम्हाला याचा त्रास होत असेल तर तुम्ही याचा वापर मुळीच करु नका. 

ADVERTISEMENT

असा करा वापर : बोटावर शुद्ध मध घेऊन ते जखमेला किंवा खाज येत असलेल्या भागाला लावा तुम्हाला नक्कीच त्यामुळे आराम मिळल. 

टी ट्री ऑईल (Tea Tree Oil)

टी ट्री ऑईल

Instagram

 

त्वचेच्या अनेक समस्यांसाठी टी ट्री ऑईल फारच फायद्याचे असते. या तेलाच्या वापरामुळे तुमची त्वचा अधिक चांगली राहते. जर तुम्हाला शुद्ध असे टी ट्री ऑईल मिळाले तर याचा फायदा तुम्हाला जास्त लवकर मिळेल.

असा करा वापर : कापसाचा बोळा किंवा इयर बड घऊन त्यावर टी ट्री ऑईल घ्या आणि तो जखमेवर लावा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

ADVERTISEMENT

उष्णता टाळा (Avoid Strong Heat)

 

इसब झाल्यानंतर अनेकदा गरमी सबन होत नाही. ज्या ठिकाणी उष्णता असते. तिथे जास्त खाज जाणवू लागते. शरीराच्या इसब झालेल्या भागाला वेदना होऊ लागतात. त्यामुळे तुम्हाला उष्णता लागणार नाही असे पाहा.

अशी घ्या काळजी : उष्णतेपासून वाचण्यासाठी तुम्ही कॉटनचे आणि सैल कपडे घाला. कारण या कपड्यांमुळे हवा खेळती राहते आणि झालेल्या जखमा बऱ्या होण्यासही मदत मिळते. 

योग्य आणि पोषक आहार (Proper Diet)

हेल्दी आरोग्यासाठी योग्य आणि पोषक आहार असायला हवा.जर तुम्हाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर तुम्ही आहारात बदल करायला हवा.म्हणजे तुम्हाला हा फरक झालेला नक्की जाणवेल. तुमच्या आहारातून काही काळासाठी तेलकट, तिखट आणि तळलेले पदार्थ काढून टाका आणि त्याऐवजी सकस- पौष्टिक असा आहार घ्या. म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. 

आहारात करा याचा समावेश (Food To Eat): फळ, कडधान्य, भाज्या अशा गोष्टींचा तुम्ही यामध्ये समावेश करा. तुम्हाला आराम मिळेल.

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. इसबचे प्रमुख कारण कोणते?

इसब हा अनेक कारणांमुळे होतो. पण सर्वाथाने इसबचा त्रास हा अस्वच्छतेमुळे आणि चुकीच्या आहारामुळे होते. तुमच्या आहारात जर तेलकट आणि तिखट पदार्थ असेल तर तुम्हाला देखील हा त्रास होऊ शकतो.  जर तुमची त्वचा फारच संवेदनशील असेल तरीदेखील तुमच्या त्वचेला पटकन कशाचीही अॅलर्जी होऊ शकते. परिणामी असा त्रास हा खरुज, नायटा, इसब अशा प्रकारातील असू शकतो.

2. पेट्रोलिअम जेली इसबवर काम करते का?

प्रेटोलिअम जेली ही अनेक प्रकारे उपयुक्त आहे. जर तुम्ही तुमच्या खाज येणाऱ्या भागाला  जर पेट्रोलिअम जेली लावली तर ती जेली तुम्हाला थोडासा आराम देते. ही पूर्णत: बरी करते असे सांगू शकत नाही. पण त्यामुळे तुमच्या त्वचेचा दाह हा नक्कीच कमी होतो. त्यामुळे जर इसब झाल्यावर तुम्हाला जळजळ होत आहे असे वाटत असेल तर तुम्ही त्यावर पेट्रोलिअम जेलीचा वापर करा.

3. इसब पसरु नये यासाठी काय करावे?

इसब झाल्यानंतर सतत खाजवल्यामुळे त्याचा दाह पुढे पुढे पसरत राहतो.जर तो योग्यवेळी थांबवता आला नाही तर याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे इसब झाले की आहे नाही याची खात्री डॉक्टरांकडून करु घ्या तेच योग्य ठरेल. 

आता त्वचेसंदर्भात इसबचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही या उपयुक्त माहितीचा उपयोग करा आणि त्वचेची काळजी घ्या.

17 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT