ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरीच बनवा स्क्रब, मिनिटांमध्ये दिसाल सुंदर

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरीच बनवा स्क्रब, मिनिटांमध्ये दिसाल सुंदर

सुंदर चेहऱ्यावर जर केस असतील तर नक्कीच तुम्हाला दिसायला चांगले दिसत नाहीत. खरं तर चेहऱ्यावर केस चांगले दिसतच नाहीत. विशेषतः महिलांच्या चेहऱ्यावर. त्यामुळे बरेचदा अनेक महिलांना महिन्याला पार्लरमध्ये जाऊन फेशियल रिमूव्हल क्रिम (facial removal cream) अथवा थ्रेडिंग (threading) करून नको असलेले हे चेहऱ्यावरील केस काढून टाकता येतात. पण काही महिलांची त्वचा ही अत्यंत संवेदनशील असते. त्यांना प्लकिंग, शेव्हिंग अथवा थ्रेडिंग या तिन्ही गोष्टींनी त्रास होऊ शकतो. अशा संवेदनशील त्वचा असणाऱ्या महिलांना घरगुती उपाय नेहमीच साथ देतात. असेच काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे तुम्ही चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरीच स्क्रब बनवू शकता. इतकंच नाही तर तुमच्या त्वचेला काहीही नुकसान न होता तुम्हाला मिनिट्समध्ये अधिक आकर्षक दिसण्यासाठी ही स्क्रब उपयुक्त ठरतात.

पिंपल्स हटविण्यासाठी खास ओट्स स्क्रब

पिंपल्स हटविण्यासाठी खास ओट्स स्क्रब

Shutterstock

चेहऱ्यावरील केस हटविण्यासाठी सर्वात पहिला आणि सोपा घरगुती उपाय म्हणजे केळं. एका बाजूला केळं तुमच्या त्वचेला मऊ आणि मुलायमपणा देते तर दुसऱ्या बाजूला ओटमील तुमच्या त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी आणि त्वचा अधिक सुंदर करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसंच ओट्समुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

कसे वापरावे 

  • एक पक्के केळे घ्यावे आणि ते व्यवस्थित मॅश करावे 
  • त्यामध्ये दोन मोठे चमचे ओटमिल मिक्स करा आणि त्याची पेस्ट तयार करा 
  • ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण 15-20 तसंच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा 

काबुली चण्याच्या पिठाचा मास्क

काबुली चण्याच्या पिठाचा मास्क

Shutterstock

हा घरी तयार करण्यात आलेला मास्क चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी उत्तम आहे. काबुली चण्याचे पीठ तुमच्या  चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरते. या पिठाने चेहऱ्याला अधिक मुलायमपणा आणि चमक येते. 

ADVERTISEMENT

कसे वापरावे 

  • अर्धा कप काबुली चण्याचे पीठ, त्यात एक चमचा हळद पावडर, एक चमचा ताजे क्रिम आणि अर्धी वाटी दूध मिक्स करून घ्या
  • हे मिश्रण तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा आणि साधारण अर्धा तास तसंच राहू द्या
  • सुकल्यानंतर तुम्ही केसांंच्या वाढीच्या विरूद्ध दिशेने हा मास्क काढा आणि मग कोमट पाण्याने चेहरा धुवा 

अंडे आणि कॉर्नफ्लोअर मास्क

अंडे आणि कॉर्नफ्लोअर मास्क

Shutterstock

वास्तविक अंड्यामध्ये चिकटण्याचे सातत्य असते. त्यामुळे चेहऱ्यावरील केस घालविण्यासाठी आपल्याला अंड्याची त्वरीत मदत मिळते. चेहऱ्याला अंडे लावल्याने त्वचेलाही योग्य पोषण प्राप्त होते कारण  यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे. 

ADVERTISEMENT

कसे वापरावे 

  • एक चमचा साखर घ्या आणि त्यात अर्धा चमचा कॉर्नस्टार्च आणि एक अंडे मिक्स करून पेस्ट बनवा 
  • ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण अर्धा तास तशीच सुकू द्या 
  • सुकल्यानंतर अगदी हलक्या हाताने काढा आणि मग चेहरा कोमट पाण्याने धुवा
  • चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करा 

केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी ‘अंडे का फंडा’

पपई आणि हळदीचा मास्क

पपई आणि हळदीचा मास्क

Shutterstock

ADVERTISEMENT

या पॅकसाठी पपई आणि हळदी पावडर या दोन्ही पदार्थांची आवश्यकता आहे. या घरगुती उपायामुळे आपल्या त्वचेमध्ये  उजळपणा येतो आणि त्वचेचा टेक्स्चर अधिक चांगला होतो. पपईमध्ये एंजाईम असून केसांचे रोमछिद्र उघडण्यास मदत होते आणि चेहऱ्यावरील केस  गळून पडतात. 

कसे वापरावे 

  • पपईचा पाव भाग मॅश करून घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि तीन चमचे कोरफडची ताजी जेल मिक्स करा आणि पेस्ट बनवा 
  • ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावरील केसांना लावा आणि साधारण अर्धा तास सुकू द्या 
  • केसांची वाढ होते त्याच्या विरुद्ध दिशेने हा मास्क हलक्या हाताने काढा आणि मग कोमट पाण्याने चेहरा धुवा 

फळांचा असा वापर करुन मिळवा तजेलदार त्वचा

मेथी आणि हिरव्या चण्याच्या पावडरचा मास्क

मेथी आणि हिरव्या चण्याच्या पावडरचा मास्क

ADVERTISEMENT

Shutterstock

फेशियल हेअरची समस्या सोडविण्यासाठी मेथी हा चांगला पर्याय आहे.  मेथीमध्ये अँटिइन्फ्लेमेटरी आणि  अँटिऑक्सिडंट गुण असतात, ज्यामुळे त्वचा अधिक चांगली मॉईस्चराईज राहते. तर चण्यामध्ये विटामिन ए, सी आणि मँगनीज असते जे त्वचेवरील सुरकुत्या हटविण्यासाठी मदत करते. 

कसे वापरावे 

  • दोन चमचे मेथीच्या दाण्याची पावडर करून घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे हिरव्या चण्याची पावडर मिक्स करा 
    थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करा
  • ही पेस्ट तुम्ही चेहऱ्याला लावा आणि मग साधारण दहा मिनिट्स तसंच राहू द्या. सुकल्यावर चेहऱ्यावर मुलायम आणि नरम कपडा ओला करून साफ करून घ्या 
  • आठवड्यातून दोन वेळा तुम्ही ही प्रक्रिया करू शकता 

आठवड्यातून केवळ दोन वेळा वापरा अँटिएजिंग फेसमास्क, म्हातारपण ठेवा दूर

ADVERTISEMENT

चेहऱ्यावरील केस काढताना घ्या अशी काळजी

चेहऱ्यावरील केस काढताना घरगुती उपाय (Home Remedies) करत असाल तर काही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

  • जेव्हा चेहऱ्यावरील केस हटवायचे असतात तेव्हा सर्वात महत्वाचे म्हणजे संयम पाळायला हवा. कोणतीही गोष्ट घाईघाईत करू नये 
  • संवेदनशील त्वचा असेल तर चेहऱ्यावरील केस हटविताना घरगुती उपचारामध्ये संत्रे, हळद, लिंबाचा रस यासारख्या  वस्तू वापरू नका. यामुळे अलर्जी व्हायची भीती असते 
  • मास्क लावण्याआधी गरम पाण्याने आंघोळ केली तर तुम्हाला चेहऱ्यावरील छिद्र उघडण्यास मदत मिळते 
  • घरगुती उपाय केल्यानंतर बर्फ रगडून थंड पाण्याने पोर्स धुऊन बंद करणे महत्वाचे आहे
  • तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

24 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT