ADVERTISEMENT
home / सौंदर्य
लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी 10 घरगुती उपाय (Home Remedies For Hair Growth In Marathi)

लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी 10 घरगुती उपाय (Home Remedies For Hair Growth In Marathi)

सुंदर आणि घनदाट काळे केस कोणाला नाही आवडत. सर्वांनाच मोठे केस खूप आवडतात. पण केस तसेच नीट आणि सुंदर ठेवण्यासाठी तितकेच कष्ट घ्यावे लागतात. केस कसे चांगले ठेवायचे आहेत यासाठी वेगवेगळे लोक वेगवेगळा सल्ला देत असतात. पण आपले केस कसे आहेत याची आपल्याला पूर्ण कल्पना असते. पण केस सांभाळताना, केस पांढरे होणं, केसगळती अशा अनेक समस्या आपल्यापुढे येतात. तुम्ही सतत बाहेर असता, त्यामुळे प्रदूषण आणि धुळीमुळे तुमच्या केसांवर फारच वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे त्यांची काळजी कशी घ्यायची आणि काळे, सुंदर – मजबूत आणि घनदाट केस कसे मिळवायचे यासाठी केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय आहेत. या उपायांमुळे तुम्हाला घट्ट आणि मजबूत केस राखण्यासाठी मदत होईल. आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे काळे आणि घनदाट केस मिळवण्यासाठी नक्की काय करावं लागतं याच्या काही खास टीप्स सांगणार आहोत.

Table Of Contents

1. केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय (Home Remedies For Hair Growth)

2. केसांच्या वाढीसाठी विटामिन्स (Vitamin For Hair Growth)

ADVERTISEMENT

3. केसांच्या वाढीसाठी रोझमेरी ऑईल (Rosemary Oil)

4. केसांच्या वाढीसाठी अंडे (Egg For Hair Growth)

केसांची वाढ होऊ न देण्यासाठी सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते (Important Factors To Influence Hair Growth)

तुमचे केस कसे वाढवायचे आहेत आणि घनदाट कसे बनवायचे आहेत यासाठी काही मुद्दे महत्त्वाचे आहेत. केस चांगले वाढवण्यासाठी मध्ये कोणत्या समस्या येतात आणि नक्की हे कोणते मुद्दे आहेत ते पाहूया –

  • वाढतं वय
  • विटामिन्स, मिनरल्स आणि प्रोटीनची कमतरता
  • कमकुवत प्रतिकारशक्ती
  • हार्मोनल असमतोल
  • केसांवर ताण, उदा. केसांची अति स्टाईल करणं, केसांच्या उत्पादनांचा अति वापर
  • वातावरणातील बदल उदा. हंगामी बदल, प्रदूषण
  • ताण, तणाव अशा प्रकारच्या शारीरिक समस्या
  • अचानक वजन कमी होणं
  • पीसीओएस

अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे केसवाढ होण्यामध्ये समस्या उद्भवते. यापैकी बऱ्याच समस्या या नियंत्रणाबाहेरील असतात. पण तरीही तुम्ही तुमच्या केसांची काळजी नैसर्गिक उपाचर घेऊन आणि योग्य डाएट करून नक्की करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरगुती उपाय करत असताना तुमचे जास्त पैसे खर्च होत नाहीत आणि तुम्ही तुमच्या घरातल्या वस्तूंचा उपयोग करून केसांची योग्यरित्या काळजी घेऊ शकता. जाणून घेऊया आपण कशा प्रकारे घरच्या घरी केसांची काळजी घेऊ शकतो आणि घनदाट केस घरच्या उपायांमुळे मिळवू शकतो.

ADVERTISEMENT

वाचा – #DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय (Home Remedies For Hair Growth In Marathi)

1. बायोटिन्स

2. विटामिन्स

3. उत्कृष्ट तेल

ADVERTISEMENT

4. कांद्याचा रस

5. कोरफड जेल

6. मध

7. चहा पावडर

ADVERTISEMENT

8. मेंदी

9. अंडे

10. हळद

वरील घरगुती गोष्टींचा वापर करून कसे वाढतील केस (How To Use Things For Hair Growth)

आम्ही तुम्हाला वर काही गोष्टी दिल्या आहेत आणि त्याचा वापर करून तुम्ही केस वाढवू शकता.  कसा वापर करायचा ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

ADVERTISEMENT

1. केसांच्या वाढीसाठी बायोटिन्स (Biotin For Hair Growth)

काय गरेजेचं आहे

  • 2-3 बायोटिन्सच्या गोळ्या
  • ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाचं तेल

तुम्ही काय करायला हवं?

  1. गोळ्यांची पावडर करून घ्या आणि असलेल्या तेलामध्ये मिक्स करा
  2. हे मिक्स केलेलं मिश्रण तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांपासून लावा आणि रात्रभर हे तसंच लावून ठेवा
    सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे तुमचे केस धुऊन टाका

किती वेळा करू शकता?

आठवड्यातून दोन वेळा तुमच्या केसांवर हा प्रयोग तुम्ही करू शकता.

ADVERTISEMENT

याचा उपयोग कसा होतो?

बायोटिन्समध्ये हिरव्या पालेभाज्यांमधील विटामिन बी चं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे केसगळती थांबवण्यासाठी याची मदत होते. याचा वापर केल्यामुळे तुमचे केस अधिक जाड आणि निरोगी होतात. तसंच केसगळतीची समस्या असल्यास, निघून जाते. 

काळ्या केसांवर घरगुती उपचारांबद्दल देखील वाचा

2. केसांच्या वाढीसाठी विटामिन्स (Vitamin For Hair Growth)

%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 %E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8 - Home Remedies For Hair Growth In Marathi

बायोटिन्स हा विटामिन्सचा एक प्रकार आहे, ज्यामुळे केसगळती थांबते अशीच अनेक विटामिन्स आहेत ज्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी मदत होते. तुमच्या केसांचा निरोगीपणा जपण्यासाठी ही विटामिन्स मदत करतात. तुमच्या केसांचा ताण विटामिन्स ई कमी करण्यासाठी मदत करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विटामिन ई मुळे केसांवर खूप चांगला परिणाम होतो. दाट केस हवे असल्यास तुम्ही डाएट फॉलो करू शकता. इतकंच नाही तर हे ट्रॉपिकल लाईफ सायन्सेस रिसर्च जर्नलने केलेल्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे. दुसरं विटामिन जे केसांसाठी सर्वात चांगलं काम करतं ते म्हणजे विटामिन सी. केसांच्या मुळांमध्ये होत असणारे डेड सेल्स संपवण्याचं काम हे विटामिन सी करतं. यामुळेदेखील केसांच्या वाढीला मदत होते. तर विटामिन्स सी च्या गोळ्या घेतल्यामुळे केसांचे मूळ मजबूत होण्यास मदत मिळते.

ADVERTISEMENT

वाचा – तुमचेही केस गळतायत? ‘या’ गोष्टी खाल तर थांबेल तुमची केसगळती

3. केसांच्या वाढीसाठी उत्कृष्ट तेल (Hair Growth Oil In Marathi)

केसांच्या वाढीसाठी आपण नेहमी नारळाचे तेल वापरतो. पण त्यासाठी अन्य कोणते तेल वापरता येते आणि कसे वापरायचे ते आपण जाणून घेऊया. 

a) केसांच्या वाढीसाठी नारळाचं तेल (Coconut Oil)

%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82 %E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2 - Home Remedies For Hair Growth In Marathi

काय गरेजेचं आहे

  • नारळाचं तेल

तुम्ही काय करायला हवं?

ADVERTISEMENT
  1. तेल गरम करून तुम्ही त्याने मुळापासून केसांना मसाज करा
  2. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे केस धुऊन घ्या

किती वेळा करू शकता?

तुम्ही केस धुणार असाल त्याच्या आदल्या रात्री नेहमी तेलाचा असा मसाज करून ठेवा. पण आठवड्यातून दोन वेळा असं केल्यास केसांवर जास्त चांगला परिणाम होतो.

याचा उपयोग कसा होतो?

नारळाचं तेल हा सर्वात चांगला नैसर्गिक घरगुती उपाय आहे. नारळाचं तेल तुमचे केस मुळापासून चांगलं राखण्यासस मदत करतं. शिवाय केसांमधील कोंडा होण्यासाठी रोख लावतं, केस तुटण्यापासून नारळाचं तेल वाचवतं. नारळाचं तेल म्हणजे केसांसाठी प्रिकंडिशनिंग आहे.

ADVERTISEMENT

वाचा – हेअर स्पा चे फायदे

b) केसांच्या वाढीसाठी विटामिन ई तेल (Vitamin E Oil)

%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8 %E0%A4%88 %E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2 - Home Remedies For Hair Growth In Marathi

काय गरेजेचं आहे

  • 7-8 विटामिन ई कॅप्सुल्स

तुम्ही काय करायला हवं?

  1. एका वाटीत काळजीपूर्वक कॅप्सूल फोडून त्यातील तेल काढून घ्या
  2. तुमच्या केसांना मुळापासून या तेलाने मसाज करा
  3. रात्रभर हे तेल केसांना असंच राहू द्या
  4. दुसऱ्या दिवशी मऊ आणि सुंदर केसांसाठी शँपू लावून केस धुऊन टाका

किती वेळा करू शकता?

ADVERTISEMENT

आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग करू शकता

याचा उपयोग कसा होतो?

विटामिन ई चा केस वाढवण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून उपयोग होत आहे. विटामिन ई च्या तेलामध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्याचा रॅडिकल्सशी लढण्यासाठी उपयोग होतो. तुमच्या शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि तुमच्या केसांतील ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासही हे मदत करतं. याचा नियमित वापर केल्यास, हे तेल केसांच्या वाढीसाठी आणि केसगळती थांबवण्यासाठी उपयोगी ठरतं. शिवाय तुमचे केस या तेलामुळे अधिक मऊ आणि मुलायम होतात.

c) केसांच्या वाढीसाठी रोझमेरी ऑईल (Rosemary Oil)

%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80 %E0%A4%91%E0%A4%88%E0%A4%B2 - Hair Growth Oil In Marathi

वाचा – सुंदर केसांसाठी या 8 क्लुप्त्या वापरा

ADVERTISEMENT

काय गरेजेचं आहे

  • 1 चमचा रोझमेरी ऑईल
  • 2 चमचे नारळाचं तेल

तुम्ही काय करायला हवं?

  1. एका वाटीत रोझमेरी आणि नारळाचं तेल मिक्स करून घ्या आणि हे मिक्स्चर केसाला मुळापासून लावा
  2. रात्रभर हे असंच केसांना लाऊन ठेवा आणि सकाळी केस धुवा
  3. तुम्ही रोझमेरी ऑईलसह तुमचा शँपू आणि कंडिशनरदेखील मिक्स करू शकता हे लक्षात ठेवा

किती वेळा करू शकता?

चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा रोझमेरी ऑईलचा वापर करू शकता

ADVERTISEMENT

याचा उपयोग कसा होतो?

रोझमेरी हर्बपासून हे ऑईल बनवण्यात येतं. या तेलामुळे तुमच्या डोक्यातील नसा विस्तारण्यास मदत होते. शिवाय ब्लड सर्क्युलेशनही चांगलं होतं. केस वाढीसाठी आणि केसांना टॉनिक म्हणून हे खूपच उपयुक्त आहे.

वाचा – पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय

d) केसांच्या वाढीसाठी आर्गन ऑईल (Argan Oil)

काय गरेजेचं आहे

ADVERTISEMENT
  • आर्गन ऑईल

तुम्ही काय करायला हवं?

  1. हे तेल घेऊन तुम्ही तुमच्या मुळांपासून लाऊन मसाज करा
  2. एक तास ते तेल मुरण्यासाठी वाट बघा
  3. तुम्ही संपूर्ण रात्रदेखील तेल लाऊन ठेऊ शकता. त्यानंतर आंघोळ करून केस धुऊन टाका

किती वेळा करू शकता?

मऊ, मुलायम आणि चमकदार केसांसाठी आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग तुम्ही करू शकता.

याचा उपयोग कसा होतो?

ADVERTISEMENT

घट्ट आणि मजबूत घनदाट केसांसाठी आर्गन ऑईल हे एक नैसर्गिक वरदान आहे. याला ‘लिक्विड गोल्ड’ असंही म्हटलं जातं. केसांची वाढ होण्यासाठी हे तेल खूपच उपयुक्त असून केसांना हे चांगलं मॉईस्चराईज करतं. तसंच तुटायला आलेले केसांची हे तेल दुरुस्तीही करतं. केसांमधील नैसर्गिक तेल जपण्याचा प्रयत्न हे ऑईल करतं.

e) केसांच्या वाढीसाठी सेज ऑईल (Sage Oil)

काय गरेजेचं आहे

  • 1 चमचा सेज ऑईल
  • 2 चमचे नारळाचं तेल वा ऑलिव्ह ऑईल

तुम्ही काय करायला हवं?

  1. नारळाचं तेल वा ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यात सेज ऑईल मिक्स करा आणि ते तुमच्या केसांना मुळापासून लावा
  2. रात्रभर तसंच ठेऊन सकाळी धुऊन टाका

किती वेळा करू शकता?

ADVERTISEMENT

चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करू शकता

याचा उपयोग कसा होतो?

निरोगी राहण्यासाठी या ऑईलचा उपयोग होतो. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स केसांची वाढ होण्यासाठी मदत करतात.

f) केसांच्या वाढीसाठी लव्हेंडर ऑईल (Lavender Oil)

काय गरेजेचं आहे

ADVERTISEMENT
  • 3-4 थेंब लव्हेंडर ऑईल
  • 2 चमचे नारळाचं तेल वा ऑलिव्ह ऑईल
  • शॉवर कॅप

तुम्ही काय करायला हवं?

  1. वरीलपैकी तुमच्या आवडीच्या तेलामध्ये लव्हेंडर ऑईलचे थेंब टाका.
  2. तुमच्या केसांच्या मुळांपासून हे तेल लावा आणि नंतर शॉवर कॅपने केस झाकून टाका
  3. तासाभर हे असंच ठेऊन द्या
  4. तासाभराने तुमचे केस धुऊन टाका

किती वेळा करू शकता?

तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करू शकता

याचा उपयोग कसा होतो?

ADVERTISEMENT

लव्हेंडर ऑईलची ओळख ब्युटी ऑईल अशी आहे. पण याचा उपयोग केसांच्या वाढीसाठीदेखील होतो. शिवाय कोणताही ताणतणाव असल्यास या तेलाचा वापर केल्यास, त्याचा परिणाम चांगला होतो.

g) केसांच्या वाढीसाठी जोजोबा ऑईल (Jojoba Oil)

%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE %E0%A4%91%E0%A4%88%E0%A4%B2 - Hair Growth Oil In Marathi

काय गरेजेचं आहे

  • 1 चमचा जोजोबा ऑईल
  • 2 चमचे नारळाचं तेल वा ऑलिव्ह ऑईल

तुम्ही काय करायला हवं?

  1. एका वाटीमध्ये नारळाचं तेल (अथवा ऑलिव्ह ऑईल) आणि जोजोबा ऑईल मिक्स करून घ्या आणि त्यानंतर
  2. योग्य ब्लेंड करून तुमच्या केसांना लावा
  3. रात्रभर हे केसांना लाऊन ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका

किती वेळा करू शकता?

ADVERTISEMENT

चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करू शकता

याचा उपयोग कसा होतो?

मॉईस्चराईज आणि हायड्रेट करण्यासाठी जोजोबा ऑईलचा उपयोग होतो याची सर्वांनाच माहिती आहे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी आणि मॉईस्चराईज करण्यासाठी याचा केसांमध्ये चांगला उपयोग होतो. कोरडे आणि हानीकारक केसांना पुन्हा चांगलं बनवण्यासाठी या तेलाचा चांगला उपयोग होतो.

h) केसांच्या वाढीसाठी फ्लॅक्स्ड ऑईल (Flax Seed Oil)

काय गरेजेचं आहे

ADVERTISEMENT
  • 1 चमचा फ्लॅक्स्ड ऑईल
  • 2 चमचे नारळाचं तेल वा ऑलिव्ह ऑईल

तुम्ही काय करायला हवं?

  1. दोन्ही तेल मिक्स करून घ्या आणि व्यवस्थित ब्लेंड करून केसांना लावा
  2. रात्रभर तसंच राहू द्या
  3. दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका

किती वेळा करू शकता?

चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा या तेलाचा वापर करू शकता

याचा उपयोग कसा होतो?

ADVERTISEMENT

फॅटी अॅसिडचा फ्लॅक्सच्या बी हा चांगला स्रोत आहे. कोरडे केस मऊ आणि मुलायम करण्यामध्ये या तेलाचा चांगला हातभार लागतो. निरोगी केसांसाठी यामध्ये असलेलं ओमेगा – 3 फॅटी अॅसिड मदत करतं.

i) केसांच्या वाढीसाठी ऑलिव्ह ऑईल (Olive Oil)

%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9 %E0%A4%91%E0%A4%88%E0%A4%B2 - Home Remedies For Hair Growth In Marathi

काय गरेजेचं आहे

  • नुसतं ऑलिव्ह ऑईल
  • टॉवेल
  • गरम पाणी

तुम्ही काय करायला हवं?

  1. तेल गरम करून घ्या आणि त्या तेलाने केसाला मुळापासून मसाज करा
  2. गरम पाण्यात टॉवेल भिजवून घ्या आणि त्यातील जादा पाणी काढून टाका
  3. हा भिजलेला टॉवेल तुमच्या केसांभोवती लपेटून घ्या आणि साधारण 15-20 मिनिट्स ठेवा
  4. त्यानंतर नेहमीप्रमाणे केस धुऊन टाका

किती वेळा करू शकता?

ADVERTISEMENT

हा गरम टॉवेलचा प्रयोग तुम्ही चार ते पाच दिवसांनी एकदा नक्की करा

याचा उपयोग कसा होतो?

केसगळती तशीच केसांची काळजी घेण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा चांगला उपयोग होतो. केसांची नवी वाढ होण्यास यामुळे मदत होते. तुमच्या डीटीएच हार्मोनची काळजी आणि केसांच्या वाढीसाठी हे ऑलिव्ह ऑईल उपयुक्त आहे. तुमचे केस मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी याची मदत होते. या तेलामध्ये असणारं अँटीऑक्सिडंट हे तुमच्या केसांची वाढ होण्यासाठी उत्कृष्ट आहे.

j) केसांच्या वाढीसाठी कॅस्टर ऑईल (Castor Oil)

काय गरेजेचं आहे

ADVERTISEMENT
  • कॅस्टर ऑईल
  • गरम टॉवेल

तुम्ही काय करायला हवं?

  1. कॅस्टर ऑईल गरम करून घ्या
  2. केसांच्या मुळापासून लाऊन नीट मसाज करा
  3. साधारण 20 मिनिट्ससाठी कोमट टॉवेल तुम्ही तुमच्या केसांना गुंडाळून ठेवा
  4. हे तेल अतिशय तेलकट असल्यामुळे तुम्ही त्यामध्ये लिंबाचा रसही घालू शकता. यामुळे तुम्हाला कोंड्याचा त्रास असल्यास, तोदेखील कमी होऊ शकतो.

किती वेळा करू शकता?

चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करू शकता

याचा उपयोग कसा होतो?

ADVERTISEMENT

तुमचे केस लवकर वाढावे, घनदाट आणि सुंदर व्हावे यासाठी कॅस्टर ऑईलसारखा दुसरा पर्याय नाही. केसांच्या वाढीसाठी हा उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे. तुम्हाला टक्कल पडत असेल तर या तेलाचा वापर करा. तुमच्या केसाला हे चांगलं मॉईस्चराईज करतं आणि केसांना फाटे फुटत असतील तर त्यावरही याचा चांगला उपयोग होतो.

k) केसांच्या वाढीसाठी बदाम तेल (Almond Oil)

काय गरेजेचं आहे

  • बदाम तेल

तुम्ही काय करायला हवं?

  1. बदामाच्या तेलाने केसांना मुळापासून चांगला मसाज करून घ्या
  2. रात्रभर हे तेल लाऊन ठेऊन द्या आणि सकाळी केस धुवा

किती वेळा करू शकता?

ADVERTISEMENT

बदामाचं तेल आठवड्यातून दोन वेळा वापरा

याचा उपयोग कसा होतो?

केस आणि मुळांमधील समतोल बदामाचं तेल राखतं. तसंच तुमच्या केसांमध्ये येत असलेली खाज, कोरडेपणा या गोष्टी कमी करण्यास या तेलाचा उपयोग होतो. तुमच्या केसांना मजबूती देण्याचं कामही हे तेल करतं. शिवाय केस चमकदार करण्यासाठी याची मदत होते.

4. केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस (Onion Juice)

%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%B0%E0%A4%B8 - Home Remedies For Hair Growth In Marathi

काय गरेजेचं आहे

ADVERTISEMENT
  • 2 लाल कांदे
  • कापूस

तुम्ही काय करायला हवं?

  1. कांदे व्यवस्थित कापून घ्या
  2. कापलेल्या कांद्याचा मिक्सरमधून ज्युस काढून घ्या
  3. अतिशय काळजीपूर्वक कांद्याचा रस तुमच्या केसांना मुळापासून लावा तेही कापसाच्या सहाय्याने. अजिबात केसावर रस थापू नका आणि साधारण 15 मिनिट्स लावून ठेऊन द्या
  4. शँपूने त्यानंतर केस धुवा

किती वेळा करू शकता?

याचा निकाल नक्की कसा लागतोय ते पाहून आठवड्यातून एक वेळ तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता.

याचा उपयोग कसा होतो?

ADVERTISEMENT

कांद्याच्या रसामध्ये असलेल्या सल्फरमुळे केसांच्या वाढीला वेग येतो. केस वाढवण्यासाठी हा सर्वात जुना आणि अगदी योग्य उपाय आहे.

5. केसांच्या वाढीसाठी कोरफड जेल (Aloe-Vera Gel)

%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%A1 %E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2 - Home Remedies For Hair Growth In Marathi

काय गरेजेचं आहे

कोरफड

तुम्ही काय करायला हवं?

ADVERTISEMENT
  1. कोरफड फाडून घेतल्यानंतर त्यातील जेल काढा
  2. त्यातील जेल तुमच्या केसांना मुळापासून लावा
  3. एक तास हे असंच राहू द्या आणि नंतर शँपूने तुमचे केस धुवा

किती वेळा करू शकता?

आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता.

याचा उपयोग कसा होतो?

तुमच्या मुळातील डेड सेल्स काढून टाकण्यात कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. कोरफडीमध्ये केसांसाठी आवश्यक अनेक पोषक तत्व असतात आणि त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

ADVERTISEMENT

6. केसांच्या वाढीसाठी मध (Honey For Hair Growth)

%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 %E0%A4%AE%E0%A4%A7 - Home Remedies For Hair Growth In Marathi

काय गरेजेचं आहे

  • 1 चमचा मध
  • 2 चमचे शँपू

तुम्ही काय करायला हवं?

मध आणि शँपू एकत्र करून घ्या आणि तुमचे केस नेहमीप्रमाणे धुवा

किती वेळा करू शकता?

ADVERTISEMENT

आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हे करा

याचा उपयोग कसा होतो?

तुमचे केस बळकट आणि मजबूत होण्यासाठी मध हा चांगला पर्याय आहे. तुमच्या केसांना पोषक तत्व मधामुळे मिळतात. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या केसांना हानी पोहचवण्यापासून संरक्षण देतात.

7. केसांच्या वाढीसाठी चहा पावडर (Tea Powder)

%E0%A4%9A%E0%A4%B9%E0%A4%BE %E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%B0 - Home Remedies For Hair Growth In Marathi

काय गरेजेचं आहे

ADVERTISEMENT
  • 1 ग्रीन टी बॅग
  • 2 कप गरम पाणी

तुम्ही काय करायला हवं?

  1. गरम पाण्यामध्ये 7-8 मिनिट्स ग्रीन टी बॅग ठेऊन द्या
  2. हे पाणी तुमच्या केसांना मुळांपासून लावा
  3. एका तासासाठी केस तसेच ठेवा
  4. गार पाण्याने केस धुवा

किती वेळा करू शकता?

जेव्हा जेव्हा तुम्ही केस धुणार असाल तेव्हा तुम्ही हे करू शकता

याचा उपयोग कसा होतो?

ADVERTISEMENT

केसगळती थांबवण्यासाठी ग्रीन टीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स मदत करतात. शिवाय बऱ्याच हर्बल टी मध्ये तुमच्या केसांच्या वाढीसाठी असणारी पोषक तत्व असतात. याचा परिणाम केसांवर खूप चांगला आणि सकारात्मक होतो. यासाठी तुम्ही बँबू टी, नेटल टी, सेज टी अथवा नेहमीच्या वापरातील चहा पावडरचादेखील उपयोग करू शकता.

8. केसांच्या वाढीसाठी मेंदी (Henna For Hair Growth)

काय गरेजेचं आहे

  • 1 कप कोरडी मेंदी
  • अर्धा कप दही

तुम्ही काय करायला हवं?

  1. मेंदी आणि दही एकत्र करून भिजवून घ्या
  2. तुमच्या केसांच्या मुळांपासून हे मिश्रण लावा
  3. हे मिश्रण सुकेपर्यंत तसंच केसांमध्ये राहू द्या
  4. नंतर शँपूने धुवा

किती वेळा करू शकता?

ADVERTISEMENT

महिन्यातून एकदा तुमच्या केसांना मेंदी लावा

याचा उपयोग कसा होतो?

नैसर्गिक कंडिशनर म्हणून मेंदीचा वापर होतो शिवाय मेंदीमुळे तुमचे कोरडे केस मऊ मुलायम होतात. त्याशिवाय तुमच्या केसांना एक वेगळा रंगही मेंदीमुळे येतो. तुमच्या केसांचे मूळ मेंदीमुळे चांगले राहते.

9. केसांच्या वाढीसाठी अंडे (Egg For Hair Growth)

egg

काय गरेजेचं आहे

ADVERTISEMENT
  • 1 अंडे
  • 1 चमचा ऑलिव्ह ऑईल
  • 1 चमचा मध

तुम्ही काय करायला हवं?

  1. एका भांड्यात अंडं फोडा आणि त्यामध्ये ऑलिव्ह ऑईल आणि मध मिक्स करा
  2. नीट मिक्स करून त्याची पेस्ट बनवा
  3. काळजीपूर्वक तुमच्या केसांना हे मिश्रण लावा. साधारणतः 20 मिनिट्स हे तसंच केसांना लावून ठेवा
  4. थंड पाण्याने शँपू लावून केस धुवा

किती वेळा करू शकता?

लांब आणि चमकदार केसांसाठी आठवड्यातून एकदा हे नक्की करा

याचा उपयोग कसा होतो?

ADVERTISEMENT

अंड्यामध्ये प्रोटीन्स, सल्फर, झिंक, लोह, सिलेनियम, फॉस्फरस आणि आयोडिन या सर्व गोष्टी असतात. केसांच्या वाढीसाठी अंड्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पोषक तत्व असतात. नैसर्गिकरित्या केसांची वाढ होण्यासाठी अंडं हे उपयुक्त असून हे चांगल्या प्रकारे केसांना मॉईस्चराईज करून पोषण देतं. यामध्ये विटामिन ए, ई आणि डी असल्यामुळे केसगळती थांबते. तुमच्या केसांचं टेक्स्चर चांगलं होतं आणि तुमच्या केसांना चमक मिळते.

10. केसांच्या वाढीसाठी हळद (Turmeric)

turmeric

काय गरेजेचं आहे

  • 3-4 चमचे हळद पावडर
  • एक कप कच्चं दूध
  • 2 चमचे मध

तुम्ही काय करायला हवं?

  1. दुधामध्ये हळद आणि मध मिक्स करून घ्या
  2. हे तुम्ही तुमच्या केसांना लावा
  3. साधारण अर्धा तास तसंच ठेवा. नंतर शँपू आणि कोमट पाण्याने केस धुवा

किती वेळा करू शकता?

ADVERTISEMENT

आठवड्यातून एक वा दोन वेळा हे करून पाहा

याचा उपयोग कसा होतो?

हळद ही बऱ्याच आजारांवरही गुणकारी असते. त्याचप्रमाणे केसांसाठीदेखील गुणाकारी आहे. यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे तुमच्या केसांची त्वचा चांगली राहते आणि यामधील अँटीऑक्सिडंट, अँटीसेप्टीक आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणांमुळे केसांची वाढ चांगली होते.

आपण कोणत्या घरगुती वस्तू काळे आणि घनदाट केस मिळवण्यासाठी उपयोगी पडतात हे पाहिलं. पण केसांची वाढ चांगली होण्यासाठी काही डाएट पाळणंही आवश्यक आहे. नक्की काय आहे हे डाएट पाहूया –

ADVERTISEMENT

केसांच्या वाढीसाठी डाएट (Diet For Hair Growth)

जंक फूट आणि प्रोसेस्ड फूड टाळा
कोल्डड्रिंक्स जास्त प्रमाणात पिऊ नका
दारू पिणं टाळा
तुमच्या रोजच्या जेवणात विटामिन्स, मिनरल्स, फळं आणि भाज्या तसंच धान्य, कार्बोहायड्रेट्स, फॅटी अॅसिड्स आणि प्रोटीन्सचा समावेश करा.

फोटो सौजन्य – Instagram

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

केस लवकर वाढवण्यासाठी घरगुती उपाय

ADVERTISEMENT

Essential Oils To Get Rid Of White Hair In Marathi

23 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT