अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच आपल्या हॉट इमेज आणि फिटनेससाठी ओळखली जाते. आपल्या स्टायलिश लुकने नेहीच सर्वांना घायाळ करणारी मलायका आपल्या त्वचेची आणि केसांचीही तितकीच काळजी घेते. तुम्हाला जर वाटत असेल की, इतके पैसे कमावते तर सलॉनमध्ये जाऊन केसांची काळजी घेतली तर काय झालं? पण मलायका घरगुती उपाय करून आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेते. आपण नक्की कशी काळजी घेतो हे मलायका नेहमी सोशल मीडियावर पोस्ट टाकून शेअर करत असते. तिच्या या टिप्स फॉलो करून तुम्हीही केसगळती थांबविण्यासाठी प्रयत्न करू शकता. मलायकाने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये केसगळती थांबविण्यासाठी तिने टिप्स दिल्या आहेत. ‘केसगळती होणं हे अत्यंत भयावह असून, आपल्याला आयुष्यात कधी ना कधी याचा सामना करावा लागतोच, पण याने घाबरून जाण्याची गरज नाही’ असं कॅप्शन देत मलायकाने आपल्या टिप्स शेअर केल्या आहेत. तुम्हालाही मलायकाच्या टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर नक्की वाचा.
केसगळती रोखण्यासाठी घरच्या घरी बनवा शँपू, करा नैसर्गिक उपचार
हेल्दी डाएटही आहे गरजेचे
मलायकेने आपल्या केसांसाठी नक्की काय करायला हवे हे सांगणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने सर्वात पहिल्यांदा या गोष्टीवर भर दिलाय की, केसांचे आरोग्य नीट राखण्यसाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला हेल्दी डाएट फॉलो करणं अत्यंत गरजेचे आहे. वेळोवेळी केसांची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी मलायकने आपल्या डाएटमध्ये विटामिनचा समावेश करून घेतला आहे. तसंच तिने आपल्या डाएटमध्ये खूपच सुधारणा केली असल्याचंही सांगितलं. मलायकाने घरातल्या घरातच केसांची मजबूती वाढविण्यासाठी थेरपी सुरू केली आहे. ही थेरपी तुम्हीही घरच्या घरी आरामात करू शकता. जाणून घेऊया कशी घ्यायची केसांची काळजी –
- सर्वात पहिल्यांदा कांद्याचा रस काढून घ्या
- त्यानंतर हा रस तुम्ही कापसाच्या मदतीने केसांना स्काल्पपासून लावा
- काही काळ हे तसंच राहू द्या. तुम्हाला कांद्याच्या रसाने कदाचित डोळ्यांमध्ये पाणी आल्यासारखं वाटेल. पण तरीही तुम्ही काही वेळ अर्थात किमान अर्धा तास तरी हा कांद्याचा रस केसांवर तसाच राहू द्या
- त्यानंतर तुम्ही तुमच्या नियमित शँपूने केस धुवा. यामुळे केसगळती कमी होते आणि केसांना कांद्यामुळे अधिक मजबूती मिळते.
आजकाल सलॉनमध्येही कांद्याच्या रसाशी निगडीत असणारे सिस्टिन आणि अशा प्रकारच्या थेरपी केल्या जातात. या थेरपीसाठी वेळही लागतो आणि पैसेही जास्त घेण्यात येतात. पण तुम्ही हीच थेरपी घरी केल्यास, तुम्हाला याचा अत्यंत चांगला परिणाम पाहायला मिळेल असंही मलायकाने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. मलायका आपल्या स्टाईलप्रमाणेच आपल्या केसांंचीही तितकीच काळजी घेते.
केसगळती रोखण्यासाठी वापरा घरगुती 5 सोपे हेअर मास्क
नुकतीच कोविड – 19 शी लढा देऊन झाली बरी
मलायका अरोराला काही दिवसांपूर्वीच कोविड – 19 झाला होता. व्यवस्थित उपचार घेऊन मलायका कोरोनाशी दोन हात करून पुन्हा एकदा कामासाठी तयार झाली आहे. मलायका सध्या एका डान्सिंग रियालिटी शो ची परीक्षक म्हणून काम पाहात आहे. चार आठवड्यांच्या गॅपनंतर मलायका पुन्हा एकदा सेटवर येऊ लागली आहे आणि स्पर्धकांनीही तिचं खूपच उत्साहात स्वागत केलं आहे. तर मलायका सोशल मीडियावरही नेहमी आपल्या ब्युटी टीप्सचे व्हिडिओ शेअर करत असते.
केसगळती रोखण्यासाठी फायदेशीर आहेत ‘हे’ अँटी हेअर फॉल शॅम्पू (How To Control Hair Fall In Marathi)
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक