ADVERTISEMENT
home / Care
केसांसाठी योग्य शॅम्पू निवडण्यासाठी सोप्या टिप्स

केसांसाठी योग्य शॅम्पू निवडण्यासाठी सोप्या टिप्स

केसांची योग्य निगा राखण्यासाठी केसांसाठी योग्य असलेल्या शॅम्पूची निवड करणं गरजेचं आहे. बाजारात विविध प्रकारचे शॅम्पू असतात. सर्वोत्तम हर्बल शैम्पूपासून ते केमिकल प्रेरित शाम्पूपर्यंत हे सर्व आपल्याला आढळू शकते. मात्र जर तुम्ही यातील चुकीचा प्रकार केसांसाठी निवडला तर तुमच्या केसांचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते. यासाठी केसांसाठी शॅम्पू निवडताना या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.

तुमच्या केसांचा प्रकार ओळखा –

कोणताही शॅम्पू खरेदी करण्यापूर्वी  त्याचे फायदे, त्यात कोणते घटक आहेत, तो कोणत्या केसांसाठी योग्य आहे आणि तो  कसा वापरावा हे पाहणं गरजेचं असतं. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे तुमच्या केसांचा प्रकार ओळखणं. तुमचे केस ऑईली, ड्राय अथवा कलर केलेले यापैकी कोणत्या प्रकारात मोडतात हे तुम्हाला माहीत असायला हवं. जर तुमचे केस कोरडे आणि स्काल्प तेलकट असेल तर तुमचे केस कॉम्बिनेशन प्रकारात मोडतात हे ओळखा. कारण या सर्व प्रकारांसाठी निरनिराळे शॅम्पू बाजारात उपलब्ध असतात. 

Shutterstock

ADVERTISEMENT

तेलकट केसांसाठी शॅम्पू निवडताना काय काळजी घ्याल –

  • जर तुमचा स्काल्प आणि केस दोन्हीही खूप तेलकट असतील तर तुम्हाला एक दिवस आड केस धुण्याची गरज आहे.
  • तेलकट केस असलेल्या लोकांनी जास्त हायड्रेटिंग, मॉइश्चरराईझिंग आणि स्मूथनिंग अथवा कर्ली केसांसाठी असलेले शॅम्पू निवडू नयेत. कारण यामुळे तुमचे केस जास्त तेलकट होतील
  • शॅम्पू खरेदी करताना त्यावर व्हॉल्युमिंग, स्ट्रेटनिंग  अथवा बॅलसिंग असे इफेक्ट असलेले शॅम्पू निवडा. हे शॅम्पू तुमच्या केसांना अधिक तेलकट करणार नाहीत.
  • केस स्वच्छ करणारे शॅम्पू तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. 
  • जर तुमचा स्काल्प तेलकट आणि केस कोरडे असतील तर या  दोन्ही भागांसाठी निरनिराळे शॅम्पू वापरा
  • केस शॅम्पू केल्यावर कंडिशनर लावताना ते तुमच्या स्काल्पवर लावू नका.

Shutterstock

कोरड्या केसांसाठी शॅम्पू निवडताना काय काळजी घ्याल –

  • कोरडे केस आणि  स्काल्प असलेल्या लोकांनी स्ट्रेटनिंग, फोर्टिफाइिंग आणि व्हॉल्युमिंग इफेक्ट देणारे शॅम्पू निवडू नयेत. कारण यामुळे तुमच्या केसांमधील सर्व मॉइश्चर निघून जाईल आणि केस आणखी निस्तेज होतील.
  • जर तुमचा स्काल्प कोरडा असेल तर तुमच्या केसांना हायड्रेशन, मॉइश्चराई आणि स्मूथिंग इफेक्ट मिळेल असा शॅम्पू निवडा. कारण या शॅम्पूमुळे तुमचा ड्राय स्काल्प मऊ आणि केस मुलायम होतील. 
  • कोरडे केस असलेल्या लोकांनी सल्फेट फ्री शॅम्पू निवडावे ज्यामुळे केस जास्त कोरडे  होणार नाहीत.
  • कोरडे केस असलेल्या लोकांनी शॅम्पू निवडण्यासाठी तज्ञ्जांचा सल्ला घ्यावा.

Shutterstock

ADVERTISEMENT

कोणता शॅम्पू कशासाठी वापरावा –

हायड्रेटिंग मॉइश्चराईझिंग शॅम्पू – यामुळे तुमचे केस मऊ, चमकदार आणि मुलामय होतील. हा शॅम्पू जाड,कुरळ्या आणि कोरड्या केसांसाठी उत्तम आहे

व्हॉल्युमिंग शॅम्पू – ज्यांचे केस फारच पातळ आणि सरळ असतात अशा केसांना एक्स्ट्रा बूस्ट अथवा व्हॉल्युम मिळण्यासाठी असे शॅम्पू फायदेशीर ठरतात

स्ट्रेटनिंग अथवा फोर्टिफाइिंग शॅम्पू – निस्तेज, खराब झालेल्या, जास्त ट्रिटमेंट केलेल्या, हायलाइट केलेल्या कमजोर आणि फाटे फुटलेल्या केसांसाठी उत्तम शॅम्पू. कारण यामुळे तुमच्या केसांना जास्त प्रोटिन्स मिळते आणि त्यांचे पोषण  होते.

बॅलेसिंग शॅम्पू – हा सर्व प्रकारच्या केसांसाठी योग्य प्रकार आहे. कारण यामुळे केस जास्त मॉइश्चराईझ होत नाहीत अथवा अती स्वच्छतेमुळे कोरडेही होत नाहीत.

ADVERTISEMENT

स्मूथनिंग अथतवा स्ट्रेट केसांसाठी शॅम्पू –यामध्ये जास्तीचे मॉइश्च्राईझर आणि स्मूथनिंग घटक असतात. ज्यामुळे तुमच्या केसांचे क्युटिकल्स सील होतात आणि तुमचे केस अधिक सरळ आणि स्मूथ दिसतात.

कर्ली केसांसाठी शॅम्पू – हा प्रकार फक्त कुरळ्या  केसांसाठीच योग्य आहे. कारण यामुळे कुरळ्या केसांमधील गुंता कमी होतो आणि केसांमधील कर्ल्स मऊ आणि सुटसुटीत होतात. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

केसांचे आरोग्य राखण्यासाठी ट्राय करा हे सल्फेट फ्री शॅम्पू (Best Sulphate Free Shampoo)

विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड (Cruelty Free Makeup Brands In Marathi)

कुरळ्या केसांना ब्लो ड्राय करण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स

 

ADVERTISEMENT

 

25 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT