ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
how to clean greasy exhaust fan at home

चिकट झालेला एग्झॉस्ट फॅन असा करा स्वच्छ

घर जितकं स्वच्छ आणि निर्जंतूक असेल तितकंच आजारपण तुमच्या घरापासून दूर राहिल. घर स्वच्छ करण्यासाठी महिला दिवसभर मेहनत करतात. साधारणपणे किचन आणि बाथरूम या दोन ठिकाणी जास्त चिकटपणा निर्माण होतो. स्वयंपाक करताना तेल फोडणी अथवा तळण्यामधून बाहेर फेकलं जातं. स्वयंपाकघरात उकडू नये यासाठी आपण एग्जॉस्ट फॅन लावतो. मात्र सतत गरम हवा बाहेर टाकणं आणि थंड हवा आत घेण्याच्या प्रक्रियेत एग्झॉस्ट फॅन चिकट होतात. वास्तविक किचन असो वा बाथरूम एग्झॉस्ट फॅन थोडे उंचावर असतात. ज्यामुळे ते नियमित स्वच्छ करता येत नाही. पण आठवड्यातून एकदा अथवा महिन्यातून दोन ते तीन वेळा एग्झॉस्ट फॅन स्वच्छ करणं गरजेचं आहे. यासाठी जाणून घ्या या काही सोप्या स्वच्छता टिप्स

एग्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स

एग्झॉस्ट फॅन सिलिंग फॅनप्रमाणे सरळ नसतात. भिंतीत बसवलेले एग्झॉस्ट फॅन स्वच्छ करणं अतिशय अवघड काम असतं. जर तुम्ही एग्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्याचा कंटाळा केला तर ते जास्त चिकट होतात आणि स्वच्छ करणं अधिक कठीण होतं. यासाठी एक ते दोन आठवड्यातून एकदा एग्झॉस्ट फॅन स्वच्छ करायलाच हवे. यासाठीच फॉलो करा काही सोप्या टिप्स

  • सर्वात आधी एग्झॉस्ट फॅन बंद करा आणि त्याचा विद्युत पूरवठा खंडित करा.
  • प्लगपासून तुम्ही जर एग्झॉस्ट फॅन डिस्कनेक्ट केला नाही तर स्वच्छ करताना तुम्हाला शॉक लागण्याची शक्यता असते.
  • बऱ्याचदा एग्झॉस्ट फॅशनवर एक झाकण बसवलेले असते. स्वच्छ करण्यासाठी ते झाकण काढून फॅनची पाती स्वच्छ करा.
  • सर्वात जास्त चिकटपणा हा फॅनच्या पात्यांवर बसलेला असतो. यासाठीच तुम्हाला पाती स्वच्छ करण्यावर जास्त भर द्यावा लागेल.
  • गरम पाणी, व्हिनेगर, बेकिंग सोडा, सौम्य साबण अशा गोष्टी तुम्ही फॅनची पाती स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. 
  • फॅनच्या पात्यांवर एखाद्या स्क्रबरने हळूवार घासून चिकटपणा दूर करा.
  • चिकटपणा जास्त असेल तर लिंबांचा वापरही तुम्ही स्वच्छतेसाठी करू शकता. 
  • शक्य असल्यास फॅनची पाती काढून ती कोमट पाणी आणि साबणाने स्वच्छ करा.
  • धुतलेली फॅनची पाती सर्वात आधी सुकवा आणि मगच पुन्हा फॅनला जोडा.
  • फॅन स्वच्छ केल्यावर तो सुकू द्या मगच विद्युत पूरवठा सुरू करा.
  • वरचेवर जर तुम्ही एग्झॉस्ट फॅन स्वच्छ केला तर तुम्हाला फॅन स्वच्छ करण्यास जास्त त्रास होणार नाही. 

आम्ही शेअर केलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
27 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT