ADVERTISEMENT
home / Recipes
भाकऱ्या नीट होत नसतील तर नक्की ट्राय करा या सोप्या ट्रिक्स

भाकऱ्या नीट होत नसतील तर नक्की ट्राय करा या सोप्या ट्रिक्स

भाकरी हा असा पदार्थ आहे जो कोणाला आवडत नसेल. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात बनला जाणारा हा पदार्थ भाजी, पिठलं, चटणी कशासोबतही खाता येतो. भाकरी ही वेगवेगळ्या धान्यांपासून बनवण्यात येते. तांदूळ, नाचणी, बाजरीची भाकरी चवीला फारच चांगली असते आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही त्याचे चांगलेच फायदे आहेत. भाकरी पदार्थ दिसायला सुंदर आणि सोपा वाटत असाल तरी देखील भाकरी करणे ही एक कला आहे. जी तुम्हाला थोडा सराव करुन नक्कीच करता येऊ शकते. भाकरी करण्याचा तुमचा प्रयत्न फोल ठरत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची भाकरीही टम्म फुगू शकेल.

आहारात असा करा उडीदाचा समावेश, होईल फायदा

तांदुळाची भाकरी

अगदी सहज मिळणारी आणि स्वादिष्ट अशी भाकरी म्हणजे तांदूळाची भाकरी. ही भाकरी छान पांढरी शुभ्र आणि मऊसुत लागते. पण ही भाकरी करणे अनेकांना जमत नाही. कारण या भाकरीच्या पिठाला उकड काढून मग ही भाकरी केली जाते. उकड न काढता ही भाकरी करता येत नाही. भाकरीसाठी उकड काढणे हे फार महत्वाचे असते. खूप जणांना उकड काढताना पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे त्यांच्या तांदूळाच्या पिठामध्ये जास्त पाणी घातले जाते. ज्यामुळे पीठ चिकट होते. त्यामुळे उकडमध्ये पाणी घालताना त्याचे प्रमाण योग्य असावे.असे केले तर उकड चांगली निघेल. त्यानंतर ते पीठ चांगले मळून घ्यावे. असे केल्यामुळे भाकरी नरम आणि छान होते. 

नाचणी आणि बाजरीची भाकरी

अशी बनवा भाकरी

ADVERTISEMENT

Instagram

तांदूळाची भाकरी करताना त्याची उकड काढणे गरजेचे असते. पण नाचणी आणि बाजरीची भाकरी करताना उकड काढणे गरजेचे नाही. या भाकरी करताना तुम्ही याचे पीठ खूप छान मळून घ्यायला हवे. हलक्या हाताने भाकरीचे पीठ मळून चालत नाही. हे पीठ अगदी छान मळून घ्या. त्यानंतरच या भाकऱ्या थापायला घ्या. या भाकऱ्या लाटता येत नाही. या थापाव्याच लागतात. त्यामुळे तुम्ही या भाकऱ्या थापूनच करा. या भाकऱ्या फार पातळ थापता येत नाही. त्यामुळे त्या योग्य पद्धतीने थापा. त्यामुळे या भाकऱ्या सुरुवातीला जमणार नाही. पण सतत केल्यामुळे नक्कीच येतील.

खमंग चिवडा रेसिपी, बनवा घरच्या घरी (Chivda Recipe In Marathi)

तवा हवा गरम

कोणताही पदार्थ करताना आच कशी असावी ते माहीत हवे. भाकरी करताना आच ही मध्यम आकाराची हवी आणि तवा हा थोडा खोलगट असावा. जर तवा गरम आणि खोल असेल तर भाकऱ्या छान भाजल्या जातात. भाकरीच्या वरच्या भागाला लागले जाणारे पाणी ही मुरते त्यामुळे तवा जाड, खोलगट आणि गरम असावा. ही आच कमी जास्त करता यायला हवी. त्यामुळे या गोष्टीकडेही लक्ष द्या. 

ADVERTISEMENT

चमचमीत वेगवेगळ्या चवीच्या नुडल्स बनवा घरच्या घरी (Noodles Recipe In Marathi)

भाजण्याची पद्धत

वर सांगितल्याप्रमाणे भाकरी करताना आच महत्वाची असते. अगदी तशीच भाकरी कशी भाजावी हे माहीत असणेही गरजेचे असते. यासाठीच तुम्ही भाजण्याची पद्धत जाणून घ्यायला हवी. भाकरी भाजताना जी बाजू आचेच्या बाजूने असते ती खूप वेळ भाजायला नको.  वर लावलेले पाणी आटल्यासारखे दिसले की, मग तुम्ही ती उलटवा. त्यानंतर दुसरी बाजू पूर्ण शिजू द्या. तसे झाल्यानंतर दुसरी बाजू उलटवा आणि तुमची भाकरी टम्म फुगेल.

आता अशा पद्धतीने भाकरी करा आणि मिळवा टुम्म भाकरी

16 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT