home / Ayurveda
DIY: दिवाळीला घरी स्वतः तयार करा हे ‘आयुर्वेदिक उटणे’

DIY: दिवाळीला घरी स्वतः तयार करा हे ‘आयुर्वेदिक उटणे’

उटणं हे अगदी प्राचीन काळापासून वापरण्यात येणारं सौंदर्यप्रसाधन आहे. भारतात दिवाळीला अभ्यंगस्नान करण्यापूर्वी अंगाला उटणे लावण्याची पद्धत आहे. आजकाल बाजारात अनेक ठिकाणी उटणे विकत मिळतं. बाजारातील विकतच्या उटण्यामध्ये नेमके कोणते घटक आहेत हे समजणं कठीण असतं. जर त्यातील काही पदार्थांची तुम्हाला अॅलर्जी असेल तर त्याचा दुष्परिणाम तुम्हाला भोगावा लागू शकतो. यासाठीच घरी तयार केलेलं आयुर्वेदिक उटणे तुमच्या त्वचेसाठी सुरक्षित ठरू शकतं. दिवाळी नेहमी हिवाळ्यात येते. हिवाळ्यात हवामानातील कोरडेपणा वाढलेला असतो. अशा थंडगार आणि  कोरड्या हवेमुळे थंडीत त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. दिवसेंदिवस वाढत्या प्रदुषणामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. यासाठीच घरी बनविलेले हे आर्युवेदिक उटणं तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरु शकतं. शिवाय घरी स्वत:च्या हाताने तयार केलेल्या या उटण्यामुळे तुमचं अभ्यंगस्नान खासही होऊ शकतं.

आयुर्वेदानुसार उटण्याचा वापर केल्यामुळे शरीरातील वात, पित्त आणि कफ हे दोष सतुंलित राहतात. उटणं हिवाळ्यात नियमित वापरल्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. उटण्यातील बेसन, चंदन, हळद, गुलाब पावडर, पावडरमुळे तुमची त्वचा उजळते. त्वचेवरील पिंगमेंटेशन, काळे डाग, एजिंगच्या खुणा कमी होतात.  दूध आणि तेलामुळे त्वचा मॉश्चराईझ होते. उटणं हे एक प्रकारचं उत्तम फेस स्क्रब आहे. शिवाय उटण्यासाठी लागणारं साहित्य घरात सहज उपलब्ध असतं. घरीच तयार केलेल्या उटण्याला मायेची आणि प्रेमाची ऊब असते. त्यामुळे दिवाळीला जेव्हा तुम्ही हे उटणं तुमच्या प्रिय व्यक्तीला, मुला-बाळांना लावता तेव्हा त्यांच्याशी तुमचं नातं अधिक दृढ होतं. यासाठी या दिवाळीला घरी केलेलं हे सुंगधित आणि आयुर्वेदिक उटणं तुमच्या कुटुंबियांसाठी जरूर वापरा.

Shutterstock

आर्युवेदिक उटण्यासाठी लागणारे साहित्य-

बेसन अर्धी वाटी , मसूर डाळीचे पीठ अर्धी वाटी ,चंदन पावडर दोन चमचे, मुलतानी माती दोन चमचे, अनंत मूळ पावडर एक चमचा, गव्हला कचरा पावडर एक चमचा, आंबेहळद पाव चमचा,स्वयंपाकातील हळद पाव चमचा आणि दारुहळद पाव चमचा, कचोरा पावडर एक चमचा, वाळा पावडर एक चमचा, गुलाबाची पावडर, आवळा पावडर एक चमचा, नागरमोथा पावडर एक चमचा, बावची पावडर एक चमचा, कडुलिंबाची पावडर एक चमचा 

( यातील जे साहित्य तुमच्या घरात  उपलब्ध असेल आणि ज्याची तुम्हाला अॅलर्जी नसेल ते साहित्य तुम्ही उटणं तयार करण्यासाठी घेऊ शकता.)

Shutterstock

उटणे तयार करण्याची पद्धत –

वरील साहित्यातील बेसन,मसूर डाळीचे पीठ व कडूलिंब पावडर हे साहित्य सोडून इतर  सर्व साहित्य एकत्र मिसळून घ्या. मिश्रण जाडसर असल्यास अथवा लहान मुलांना वापरायचे असल्याचे ते वस्त्रगाळ करुन घ्या. चाळून न घेतल्यास त्यापासून नैसर्गिक स्क्रब तयार होतो. अशा पद्धतीने दिवाळीच्या आधीच तुम्ही घरीच उटणं तयार करून ठेऊ शकता. उटणं लावण्यापूर्वी तयार उटण्याच्या मिश्रणात बेसण, मसूर डाळीचे पीठ व कडूलिंब पावडर मिसळा मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन घ्या. मिश्रणात सायीचे कोमट दूध अथवा गुलाबपाणी मिसळून उटणं सर्वांगाला लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील धुळ आणि प्रदूषण निघून जाईल आणि त्वचेची छिद्रे मुळापासून स्वच्छ झाल्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. 

उटणे अंगाला लावण्याची योग्य पद्धत –

सर्व प्रथम कोमट अभ्यंगतेल अथवा शुद्ध नारळाचे तेल संपूर्ण अंगाला लावून त्याने तुमच्या त्वचेवर हळूवार मसाज करा त्यानंतर अंगाला उटणं लावा. तेल लावल्यामुळे कोरडी त्वचा मऊ होईल आणि उटणं लावल्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होईल. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

उटणं हे आयुर्वेदाकडून मिळालेलं उत्कृष्ट मिश्रण

सौंदर्य खुलविण्यासाठी फॉलो करा ’20’ आयुर्वेदिक ब्युटी टीप्स

 

16 Oct 2019

Read More

read more articles like this
good points logo

good points text