हॉटेलमध्ये गेल्यानंतर पावभाजी आणि मसाला पाव हे दोन पदार्थ असे आहेत जे जास्त प्रमाणात खाल्ले जातात. हॉटेलमध्ये गेल्यानंतर मसाला पावाचा घमघमाट तुम्हाला त्याची ऑर्डर द्यायला नक्कीच भाग पाडतो. पण असाच चमचमीत आणि हाताची बोटं चाटत राहाल असा मसाला पाव तुम्ही घरीही करू शकता. आश्चर्य वाटलं ना? पण हो तुम्ही घरच्या घरी अगदी कमी वेळात हा मसाला पाव तुम्ही करू शकता. त्याची रेसिपी आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. साधारण अर्ध्या ते पाऊण तासात तुम्ही हा झणझणीत आणि चमचमीत मसाला पाव नक्कीच तयार करून खाऊ शकता. मुळात या मसाला पावला लालभडक रंग येण्यासाठी तुम्ही अगदी लाल टॉमेटो घ्या. पण तिखट घालताना काश्मिरी तिखट अथवा काश्मिरी मिरची वापरा.
चिकनपासून तयार करा हे टेस्टी स्टाटर्स (Chicken Starters Recipe In Marathi)
मसाला पावासाठी लागणारे साहित्य
- पाव
- कापलेला कांदा
- बारीक कापलेला टॉमेटो
- 5-6 पाकळ्या लसूण
- आलं – लसूण पेस्ट
- लाल तिखट (काश्मिरी तिखट)
- बटर
- पाव भाजी मसाला
- चीज
- चवीनुसार मीठ
टीप – मसाला बनवताना जर मसाल्याचा रंग तुम्हाला हॉटेलसारखा लाल दिसायला हवा असेल तर तुम्ही काश्मिरी मिरची रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची मिक्सरमधून पेस्ट करून घ्या. ही पेस्ट तुम्हाला भाजी अर्थात मसाला करताना तुम्ही घाला. जेणेकरून तुमच्या मसालापावला अप्रतिम रंग येईल. तुम्हाला हा मसालापाव एकदम रेस्टॉरंट अथवा बाहेरील स्टॉलप्रमाणे तुम्हाला चविष्ट आणि चटकदार लागेल.
उपवासाचे पदार्थ बनवा घरी, खमंग पदार्थ रेसिपी मराठीत (Upvasache Recipes In Marathi)
बनविण्याची पद्धत
- एका पॅनमध्ये बटर घ्या. त्यामध्ये आलं – लसूण पेस्ट आणि लसूण ठेचून घाला
- त्यानंतर कांदा आणि टॉमेटो घालून तो शिजताना मॅश करा
- कांदा आणि टॉमेटो शिजत आल्यानंतर पाव भाजी मसाला घाला, लाल तिखट, मीठ घाला आणि कोथिंबीर चिरून घाला
मस्त पावभाजीच्या भाजीसारखा वास सुटल्यानंतर वरून चीज किसून घाला. अर्धे चीज तसेच ठेवा आणि मिक्स करा
कांदा आणि टॉमेटो पूर्ण मॅश करू नका. कारण पावावर हे मिश्रण घातल्यानंतर तुम्हाला त्याची चव लागली पाहिजे
पॅनवर बटर सोडून त्यावर पाव गरम करून घ्या जर तुम्हाला हवं असेल तर. नुसता पाव पण तुम्ही घेऊ शकता. पण अधिक मसालेदार चव हवी असेल तर तुम्ही पाव भाजून घ्या - त्यानंतर एका डिशमध्ये पाव घ्या. त्यावर तयार केलेला मसाला अर्थात हे मिश्रण वरून घाला आणि त्यावर कापलेली कोथिंबीर, किसलेले चीज त्यावर घाला. त्यानंतर तुम्ही लिंबू पिळा अथवा तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही लिंंबू त्याबरोबर द्या. तुम्हाला जर बटर जास्त आवडत असेल तर तुम्ही पावावर गरम असातना अधिक बटर घाला. कारण त्याची चव अधिक चांगली आणि चवदार लागते.
टीप – बटरमध्ये मीठ असल्याने मसाला तयार करताना त्या अंदाजाने तुम्ही मीठ घाला. तसंच चीजचे तुकडे घालण्यापेक्षा तुम्ही चीज किसून घातले तर त्याची चव अधिक चांगली लागते हे नेहमी लक्षात ठेवा. तर लिंबाचा रस हा वरूनच तुमच्या आवडीनुसार घाला. मसाला तयार करताना लिंबू पिळू नका. अन्यथा भाजी लवकर खराब होण्याची शक्यता असते. काही जणांना लिंबाची चव आवडत नाही. त्यामुळे आवडीप्रमाणे लिंबू वरूनच तुम्ही मसाला पावसह द्या.
मुंबईत पावभाजीचा ठिकाणांना भेट (Best Pav Bhaji In Mumbai In Marathi)
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक