ADVERTISEMENT
home / Hair Removal
घरीच करा स्वतःचे वॅक्सिंग, स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींचा करा वापर

घरीच करा स्वतःचे वॅक्सिंग, स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींचा करा वापर

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सध्या जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. ज्यामुळे सध्या ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद आहेत. वास्तविक सौंदर्य खुलवण्यासाठी महिन्यातून एकदा तरी प्रत्येकीला पार्लरमध्ये जावंच लागतं. अगदी फेशिअल, अथवा इतर ब्युटी ट्रिटमेंट नाही केल्या तरी नॉर्मल थ्रेडिंग, वॅक्सिंग वेळच्या वेळी करणं गरजेचं असतं. मात्र आता लॉकडाऊनमुळे घरात अडकून पडलेल्या प्रत्येकीची यामुळे पंचाईत झालेली आहे. शिवाय रेझर अथवा हेअर रिमूव्हल क्रीम प्रत्येकीला सूट होतीलच असं नाही. ज्यामुळे सध्या प्रत्येकीलाच आपल्या अंगावरील अनावश्यक केस अगदी नकोसे झाले आहेत. यासाठी आम्ही तुम्हाला घरीच वॅक्सिंग करण्याच्या काही सोप्या टिप्स आणि वॅक्स तयार करण्याच्या काही पद्धत सांगत आहोत. ज्या तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर आहेत. तुम्ही हा प्रयोग यापूर्वी कधीही  केला नसला तरी विश्वास ठेवा अगदी नैसर्गिक पद्धतीने आणि सहज तुम्ही घरात वॅक्स तयार करू शकता. शिवाय या नैसर्गिक वॅक्समुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम देखील होईल. 

shutterstock

वॅक्सिंग करण्यासाठी ट्राय करा ही सोपी युक्ती –

एका पॅनमध्ये एक कप साखर, अर्धा कप मध आणि एका लिंबाचा रस घ्या. गॅसवर ही पॅन ठेवा आणि मंद आचेवर हे मिश्रण गरम करा. साखर विरघळ्यानंतर आणि मिश्रणाचा रंग बदलू लागल्यावर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर ते एका वाटीत काढून घ्या. या मिश्रणाने तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने वॅक्सिंग करू शकता. तुम्ही हे मिश्रण इतर वॅक्स प्रमाणे वापरू शकता. ज्या भागावर तुम्हाला वॅक्स करायचे आहे त्या भागावर थोडा मैदा अथवा कॉर्नफ्लॉवर लावा. चाकू अथवा चमच्याच्या मदतीने वॅक्स त्वचेवर पसरवा. वॅक्स स्ट्रिप त्या भागावर लावून प्रेस करा आणि उलट दिशेने ती स्ट्रिप ओढा. या वॅक्समुळे तुमच्या अंगावर कोणतीही खाज अथवा पुरळ येणार नाही. वॅक्स स्ट्रिपसोबत तुमच्या त्वचेवरील अनावश्यक केस निघून जातील. आणि घरीच अगदी सोप्या पद्धतीने तुमची त्वचा मऊ  आणि मुलायम होईल. हे मिश्रण तुम्ही काही दिवस टिकवून ठेवू शकता. प्रत्येकवेळी वापरण्यापूर्वी ते परत थोडं गरम करा.

ADVERTISEMENT

या पद्धतीने दूर करा तुमच्या अंगावरील अनावश्यक केस –

वॅक्स करण्यासाठी तुम्ही आणखी एक सोपी युक्ती वापरू शकता. यासाठी चार कप साखर, अर्धा कप पाणी आणि अर्धा कप लिंबाचा रस एक पॅनमध्ये टाकून साखर विरघळेपर्यंत गरम करा. हे  मिश्रण सतत ढवळत रहा कारण असे न केल्यास साखर पॅनला चिकटू शकते. मिश्रण उकळू लागल्यावर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर त्याचा घट्टपणा चेक करा. मिश्रण अती पातळ अथवा अती घट्ट असता कामा नये. मधाप्रमाणे त्याची Consistency असल्यास ते व्यवस्थित झालं आहे असं समजा.  हे मिश्रणदेखील तुम्ही काही दिवस फ्रिजमध्ये साठवून ठेऊ शकता. वापरण्यापूर्वी ते मायक्रोवेव्ह अथवा गॅसवर पुन्हा गरम करा.

वॅक्स करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करा. कारण त्यावर जर एखादे क्रीम अथवा सिरम असेल तर केस निघणार नाहीत. त्वचेवर एखादी बेबी पावडर लावा. कोमट मिश्रण त्वचेवर लावा. केसांच्या ग्रोथच्या उलट्या दिशेने ते ओढून काढा. ज्यामुळे तुमचे अनावश्यक केस निघून जातील. या मिश्रणामुळेदेखील तुम्हाला मऊ आणि मुलायम त्वचा मिळू शकते. लक्षात ठेवा नेहमी वॅक्स करताना केसांच्या वाढीच्या उलट्या दिशेने वॅक्स स्ट्रिप ओढा ज्यामुळे तुम्हाला फार त्रास होणार नाही. वॅक्स केल्यावर त्वचेवर गुलाबपाणी अथवा बर्फ लावा ज्यामुळे त्वचेची मोकळी झालेली छिद्रं पुन्हा बंद होतील. असे न केल्यास त्या छिद्रांमध्ये धुळ जाऊन तुम्हाला त्वचा समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

01 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT