ADVERTISEMENT
home / Recipes
गुलाबजाम अथवा मिठाईसाठी असा तयार करा घरीच हलवाई स्टाईल खवा

गुलाबजाम अथवा मिठाईसाठी असा तयार करा घरीच हलवाई स्टाईल खवा

गुलाबजाम,पेढे, मिठाईसाठी खवा अथवा मावा गरजेचा असतो. मात्र बाजारात मिळणारा खवा आणून मिठाई करणं हे सध्या नक्कीच सुरक्षेचं नाही. यासाठीच तुम्हाला घरच्या घरी खवा तयार करता यायला हवा. एकदा घरी खवा तयार करता आला की तुम्ही घरी कोणतीही तुमच्या आवडीची मिठाई सहज तयार करू शकता. खवा म्हणजे दुधाचं घट्ट रूप जे तुम्ही अगदी सहज घरी तयार करू शकता. मिठाई केल्यावर उरलेला खवा तुम्ही खव्याची पोळी अथवा भाजीच्या ग्रेव्हीसाठीदेखील वापरू शकता. यासाठी जाणून घ्या घरच्या घरी कसा तयार करावा खवा. आम्ही तुम्हाला हलवाई स्टाईल पारंपरिक पद्धतीने केलेला खवा आणि झटपट करण्यासारखा इन्स्टंट खवा अशा दोन रेसिपीज शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्हाला दसरा शुभेच्छा मराठी देण्यासोबतच घरगुती गुलाबजामही भेट देता येतील.

हलवाई स्टाईल खवा –

साहित्य –

  • सहा कप फुल क्रिम दूध

हलवाई स्टाईल खवा तयार करण्याची कृती –

  • एका नॉनस्टिक पॅनमध्ये गॅसवर मोठ्या आंचेवर दूध उकळत ठेवा
  • दुधाला उकळी आल्यावर अधुनमधुन चमच्याने ढवळा ज्यामुळे दूध ओतू जाणार नाही अथवा पातेल्याला लागणार नाही
  • पाच ते सहा मिनीटांनी गॅस मध्यम आंचेवर ठेवा
  • अर्धा तास दूर या मध्यम आंचेवर उकळू द्या
  • अर्धा तासाने दूधाचा पाऊण भाग आटून फक्त पाव भाग उरेल
  • घट्ट झालेले दूध पॅनला चिकटू लागेल ते चमच्याने काढून पुन्हा दूधात टाका
  • दूध पूर्णपणे आटल्यावर ते एका प्लेटमध्ये काढा आणि चमच्याने एकसमान करा
  • थंड झाल्यावर गरजेनुसार या खव्याचा वापर करा, उरलेला खवा तुम्ही फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता

Instagram

ADVERTISEMENT

मिल्क पावडरचा इन्स्टंट खवा –

साहित्य – 

  • एक कप दूधाची पावडर
  • अर्धा कप दूध
  • एक चमचा शुद्ध तूप

इन्स्टंट खवा कृती –

तुम्ही या खव्यासाठी जितकी दूधाची पावडर घ्याल त्याच्या निमपट म्हणजेच अर्धे प्रमाण दुधाचे असेल हे नेहमी लक्षात ठेवा. 

  • नॉनस्टिक पॅनमध्ये तूप घ्या मंद आंचेवर गरम करा. त्यात दूध टाका आणि चांगले एकजीव करा. त्यानंतर त्यात दूधाची पावडर टाका. दूध अथवा मिल्क पावडर टाकताना  एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पॅन जास्त गरम होणार नाही. नाहीतर हे दोन्ही पदार्थ पॅनला चिकटून जातील. मंद गॅसवर सर्व मिश्रण गरम होऊ द्या. अधुनमधुन चमच्याने चांगले ढवळा ज्यामुळे ते पॅनला चिकटणार नाही. फक्त पाच ते सात मिनीटांमध्ये तुम्हाला हे मिश्रण घट्ट होऊन खवा तयार झालेला दिसेल. मंद आंचेवर तो घट्ट होऊ द्या. हा खवा तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त दहा ते पंधरा मिनीटे लागतील आणि तुमचा इन्स्टंट खवा तयार होईल. 
  • याची चव तुम्ही घरी केलेल्या पारंपरिक अथवा हलवाईस्टाईल खव्यासारखीच लागते. फक्त हा खवा त्या खव्यापेक्षा थोडा जास्त गोड असतो. कारण यामध्ये आपण दूधासोबत दूधाची पावडर वापरली आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही या खव्यापासून मिठाई तयार कराल तेव्हा साखरेचा वापर बेतानेच करा.

Instagram

ADVERTISEMENT

आम्ही शेअर केलेल्या या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या. त्या तुम्ही केल्या का आणि त्यापासून कोणते गोड पदार्थ तुम्ही तयार केले हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

स्वादिष्ट रेसिपीजसाठी घरीच असं तयार करा पनीर

ADVERTISEMENT

घट्ट दही तयार करण्याची घरगुती पद्धत ( How To Make Curd At Home In Marathi)

नारळाची इन्स्टंट बर्फी बनवा घरच्या घरी, सोपी रेसिपी

19 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT