ADVERTISEMENT
home / आरोग्य
anti-tobacco-day-in-marathi

जागतिक तंबाखू विरोधी दिन | तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय

जगभरात होणाऱ्या लाखोंच्या मृत्यूमागील एक कारण आहे तंबाखूचं वाढतं सेवन. या निमित्ताने 31 मे ला जगभरात दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश आहे तंबाखू सेवनाचा प्रसार रोखणं आणि त्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधणं. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या सदस्य देशांनी 1987 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला. गेल्या काही वर्षात जगभरात सरकारी, सार्वजनिक आरोग्य संघटना आणि धूम्रपानाचा निषेध करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा केला जातो. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि याबाबतीले अनेक कार्यक्रम या दिवसाच्या निमित्ताने आयोजित करून लोकांमध्ये जनजागृती केली जाते. दरवर्षी या दिवसाची एक थीमही ठरवली जाते. या लेखात आपण तंबाखू सेवनाचे शरीरावरील दुष्परिणाम आणि त्यापासून कसं मुक्त होता येईल याबाबत माहिती घेणार आहोत.

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम – Tobacco Side Effects In Marathi

Tobacco Side Effects In Marathi
तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम

तंबाखूमध्ये अनेक प्रकारची केमिकल असतात. जसं निकोटीन, टार आणि कार्बन मोनोऑक्साइड जी हानीकारक असतात. तंबाखूचा फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर जास्त प्रमाणात परिणाम होतो. चला जाणून घेऊया शरीरावर होणारे तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम.

फुफ्फुसांवर (On The Lungs)

तंबाखूमधील निकोटीन महाधमनीला कडक बनवून टाकते. महाधमनी ही मोठी धमनी असते जी आपल्या पूर्ण शरीराला रक्ताचा पुरवठा करत असते. धुम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांना सर्वात जास्त नुकसान होते. त्यामुळे तंबाखूचा उपयोग करणाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यांना खोकल्यासोबतच कफची समस्याही होते. तंबाखूचा फुफ्फुसांवर सर्वात वाईट परिणाम म्हणजे वातस्फिती (फुफ्फुसांचा आजार) आणि फुफ्फुसांचा कॅन्सर आहे.

मेंदूवर (On The Brain)

तंबाखूच्या सेवनाचं व्यसन लागतं आणि ते आवडूही लागतं. या व्यसनामुळे कधी खूप उत्सुकता, मूडी, नर्व्हसनेस आणि उदासही वाटू शकतं. नियमित तंबाखू सेवन करत असल्यास डोकेदुखी आणि चक्कर येण्यासारख्या समस्याही जाणवू शकतात. एका रिसर्चनुसार ब्रेन मेटाबॉलिटीज आणि निकोटीनवर अवलंबून राहणं यामध्ये गंभीर सबंध आहे.

ADVERTISEMENT

तोंडावर (Bad For Mouth)

तंबाखूमध्ये आढळणारं कार्बन मोनोऑक्साइड आणि निकोटीन हे तुमच्या तोंडासाठी अनेक प्रकारे नुकसानदायक ठरू शकते. तंबाखूच्या सेवनाने दातांवर डाग पडणे, तोंडाला दुर्गंधी येणे, दात पिवळे पडणे असे दुष्परिणाम होतात. याशिवाय तंबाखूचा वारंवार उपयोग केल्याने गळा, तोंड आणि एसोफंगल कॅन्सर होण्याचा धोकाही जास्त असतो.

हृदयावर (On The Heart)

तंबाखूच्या सेवनाने हृदयावरही वाईट परिणाम होतो. यामधील केमिकल्स हे तुमच्या हृदयाचे ठोके वाढवतात आणि पूर्ण शरीरातील रक्तवाहिन्या घट्ट करून हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका वाढवतात. याशिवाय खराब रक्तभिसरणामुळेही अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात.

त्वचेवर (On The Skin)

तंबाखू उत्पादनांचा उपयोग कोणत्याही परिस्थितीत शरीरावर नकारात्मक परिणामच करतो. हे त्वचेवर परिणाम करून सुरकुत्यांसाठी कारणीभूत ठरतात. कोरडी आणि पिवळी त्वचा तंबाखू खाणाऱ्यांमध्ये दिसून येते. याशिवाय तंबाखूयुक्त उत्पादनांनी तुमच्या त्वचेला एक प्रकारची दुर्गंधीही येते.

केसांवर (On The Hair)

तंबाखूच्या सेवनाने तुमचे केस पातळ आणि नाजूक होतात. तुमच्या केसांच्या निर्मितीवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. काहीवेळा जास्त प्रमाणात तंबाखूचं सेवन केल्यास केस गळून टक्कलही पडू शकते.

ADVERTISEMENT

रक्ताच्या पेशींवर (On Blood Cells)

नियमित रूपाने तंबाखूचं सेवन केल्यास तुमच्या मांसपेशींवर परिणाम होऊन रक्तपुरवठा आणि ऑक्सीजनच्या प्रवाहावर परिणाम होऊ लागतो. परिणामी, व्यायाम, खेळणं किंवा शारीरिक हालचालींमध्ये सामील झाल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो.

पचनावर (On Digestion)

तंबाखूच्या वापराने आणि विशेषतः धुम्रपानामुळे संपूर्ण पचनतंत्र खराब आणि उच्च एसिडचं उत्पादनास उत्तेजना मिळते. यामुळे अल्पकाळ आणि दीर्घकाळाचा हार्टबर्न होऊ शकतं. सर्वात खराब परिस्थितीत धुम्रपानमुळे कॅन्सर आणि पेप्टिक अल्सर होण्याचा धोकाही वाढतो.

मानसिक आरोग्यावर (On Mental Health)

धुम्रपानातील तंबाखू हे तुमच्या मानसिक आरोग्यावर अनेक प्रकारे दुष्परिणाम करू शकतात. यामुळे तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतं. तोंडाला चव नसते आणि शरीराचं तापमान कमी होतं. खासकरून हात आणि पायाला ही तापमानाची समस्या जाणवते.

तंबाखू सोडण्याचे उपाय (How To Quit Smoking In Marathi)

How To Quit Smoking In Marathi

Instagram

ADVERTISEMENT

धूम्रपान हाही अन्य अंमली पदार्थांसारखाच एक नशा आहे. पण दृढ निश्चय केल्यास तुम्ही धूम्रपानाची सवय नेहमीसाठी सोडू शकता. धूम्रपान थांबवण्यासाठी काही सोपे उपाय आणि टिप्स. 

  • सर्वात आधी एक डायरी किंवा चार्टमध्ये लिस्ट बनवा. अशा गोष्टींची ज्यामुळे तुम्हाला धूम्रपान थांबवण्याची प्रेरणा मिळेल किंवा मार्ग सापडेल. 
  • धुम्रपान तुम्ही काही एका दिवसात सोडू शकत नाही. यासाठी सुरूवातीला तुम्ही महिन्यातील प्रत्येक आठवड्याचा एक दिवस निवडा. जेव्हा तुम्ही अजिबात स्मोकिंग करणार नाही. मग त्यादिवशी काहीही झालं तरी स्मोक करायचं नाही. 
  • जेव्हा सिगरेट घेण्यासाठी जाल तेव्हा पूर्ण पाकिट न घेता एक दोनच सुट्या सिगरेट घ्या. 
  • जेव्हा तुम्हाला सिगरेट प्यायची इच्छा होईल तेव्हा घरातच राहा किंवा इतर कामात स्वतःला गुंतवून घ्या. पण तुमचं मन धूम्रपानापासून दूर ठेवा. 
  • अशी कोणतीही वस्तू खोलीत ठेवू नका जी तुम्हाला स्मोक करण्याची आठवण करून देईल. 
  • सिगरेट न प्यायल्यामुळे वाचवलेले पैसे जमा करा. ते पैसे पाहूनही तुम्हाला अंदाज येईल आणि प्रेरणा मिळेल की, तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे कसे वाचवताय. 
  • कॅफीनयुक्त पदार्थ जसं चहा, चॉकलेट, आईसक्रिम किंवा कॉफीचं सेवन करणं टाळा. 
  • आपल्या घरी, गाडीवर आणि ऑफिसमध्ये नो स्मोकिंग लिहीलेले स्टीकर्स लावून घ्या. 
  • तुमच्या घरच्यांशी किंवा मित्रांशी बोला की, तुम्हाला धूम्रपान सोडल्यावर कसं वाटत आहे.

तंबाखू सोडण्याचे फायदे (Benefits Of Quitting Tobacco In Marathi)

Benefits Of Quitting Tobacco In Marathi
तंबाखू सोडण्याचे उपाय

तंबाखू असलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन टाळणं किंवा व्यसन सोडणं हे तुमच्यासाठी कधीही आरोग्यदायकच आहे. जाणून घ्या तंबाखू सोडण्याचे फायदे. 

  • जर तुम्हाला धूम्रपानाचं व्यसन असेल तर तुम्हाल श्वास घेण्यास त्रास होतो. पण ते सोडल्यावर श्वास घेण्यास त्रास होणार नाही व त्वरित आराम मिळेल. 
  • धूम्रपान थांबवल्याने तुमच्या शरीराला शक्ती मिळते. 
  • मनातील सर्व चिंता दूर होतात. 
  • तुम्हाला चांगल्या पद्धतीने सेक्सचा आनंद घेता येईल. 
  • महिलांमधील प्रजनन शक्तीत सुधारणा होते. 
  • नेहमी गरम सिगरेटच्या धुरामुळे स्मोकर्सची वास घेण्याची आणि चव घेण्याची ताकद कमी होतो. पण धुम्रपान सोडल्यावर तुम्हाला जेवणाचा योग्य आस्वाद घेता येईल. 
  • जास्त धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीची त्वचा कोरडी आणि काळी पडते. धूम्रपान सोडल्यावर ती पुन्हा एकदा सुंदर होईल. 
  • तंबाखू सोडल्याने तुमचं मरणही नक्कीच टळेल.

तंबाखूबाबत विचारण्यात येणारे प्रश्न आणि उत्तरं (FAQ’s)

तंबाखूचे आरोग्यासाठी असणारे घातक परिणाम माहीत असूनही लोकं याचं सेवन करतात. तर काही लोकांच्या मनात आजही उत्सुकता आढळते. तंबाखूबाबत विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं. 

1. तंबाखूपासून बनवलेल्या उत्पादनांचं व्यसन का लागतं ?
निकोटीन हे अंमली पदार्थप्रमाणे आहे. कॅफीनसारखं असलं तरी जास्त परिणामकारक आहे आणि याचमुळे लोकांना याचं व्यसन लागतं. 

ADVERTISEMENT

2. निकोटीन आणि तंबाखूमध्ये काय फरक आहे ?
निकोटीन हे घातक रसायन तंबाखूमध्ये आढळतं. हे तुम्हाला व्यसनाधीन करतं आणि  तुम्हाला धूम्रपान किंवा तंबाखू खाण्याची सवय लागते. निकोटीन हा तंबाखूमधील सर्वात घातक घटक आहे.

3. हुक्का पिणंसुद्धा घातक आहे ?
जर तुम्ही फक्त फ्लेवर्ड हुक्का पित असाल तर तो पूर्णतः घातक नाही. पण जर त्यात तुम्ही तंबाखू किंवा मद्य टाकल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. 

आम्हाला आशा आहे की, POPxoMarathi ची ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल आणि यातून उपयुक्त माहितीही मिळाली असेल. ही पोस्ट आवडल्यास लाईक करा आणि सोशल मीडियावर शेअरही करा.

हेही वाचा –

ADVERTISEMENT

धरणीमातेचा उत्सव जागतिक वसुंधरा दिन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घोषवाक्य

जागतिक जल दिवसानिमित्त ’50’ पाणी वाचवा घोषवाक्य

27 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT