नितळ, स्वच्छ, डागविरहीत त्वचा ही सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. पण वयोमानानुसार किंवा काही बदलानुसार शरीरावर वेगवेगळ्या गोष्टी दिसू लागतात. त्वचा काळवंडणे, त्वचेवर वांग येणे. बारीक बारीक चामखीळ येणे असा त्रास होऊ लागतो. चामखीळ येण्याची अशी जागा ठरलेली नसते. शरीराच्या अगदी कोणत्याही भागावर चामखीळ येऊ शकतात. काही जणांना लहान काहींना मोठे असे चामखीळ शरीरावर येतात. चामखीळ आल्यानंतर ते काढून टाकण्यासाठी खूप जण अनेक विचित्र पद्धती सांगतात. त्यातील काही पद्धती या फारच अघोरी असतात. चामखीळ काढण्यासाठी कोणतीही अघोरी पद्धत वापरण्याची गरज नाही. काही सोप्या पद्धतीने त्वचेवरील चामखीळ काढता येतात. जाणून घेऊया या काही सोप्या पद्धती
डी टॅनसाठी वापरा गव्हाचे पीठ, असा करा घरच्या घरी फेसपॅक तयार
केस गुंडाळा
चामखीळ अगदी हळुहळू घालवण्यासाठी त्याच्या अवतीभोवती केस गुंडाळला जातो. खूप जण घोड्याच्या केसाचा उपयोग करुन चामखीळ काढतात असे म्हणतात. पण घोड्याचा केस नसेल तर तुम्ही तुमचाच एखादा केस घ्या आणि तो त्या चामखीळभोवती गुंडाळा. चामखीळच्या मुळावरच घाव केल्यामुळे चामखीळ निघण्यास मदत होते. ही पद्धत स्लो वाटत असली तरी देखील त्यामुळे कोणताही त्रास होत नाही. चामखीळ आपोआप निघून जाण्यास मदत मिळते.त्यामुळे तुमच्या चामखीळांवर केस गुंडाळा.
अॅपल सायडर व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगर चामखीळ घालवण्यासाठी फारच फायद्याचे आहे. त्यामुळेही चामखीळ निघून जाण्यास मदत मिळते. एका कापसावर थोडेसे अॅपल सायडर व्हिनेगर घेऊन ते चामखीळ आलेल्या भागावर अलगद लावा. दिवसातून दोनवेळा ते चामखीळावर लावा. काही काळासाठी तुम्हाला थोडे चुरचुरल्यासारखे वाटेल. पण त्यामुळे चामखीळ सुकण्यात मदत होते. काही दिवसाने तुमचा चामखीळ सुकून जाईल. तो तसाच निघून जाईल.
मेकअप काढण्यासाठी वापरा हे बेस्ट मेकअप वाईप्स
अननसाचा रस
अननसाच्या रसामध्येही काही अॅसिडिक घटक असतात. ज्यामुळे चामखीळ निघून जाण्यास मदत मिळते. कापसावर थोडासा अननसाचा रस घेऊन तो लावा. अननसाच्या रसामुळे चामखीळ गळून जाण्यास मदत मिळते. अननसाचा रस दिवसातून दोनवेळा चामखीळावर लावा. त्यामुळे चामखीळ सुकून जाते आणि ते गळून पडते. त्यामुळे चामखीळावर अननसाचा रस देखील लावू शकता.
बेकिंग सोडा आणि एरडेंल तेल
बेकिंग सोडा आणि एरडेंल तेल एकत्र करुन त्याची एक पेस्ट करुन घ्या. ही पेस्ट चामखीळीला लावल्यामुळे चामखीळ कमी होण्यास मदत मिळते. काही दिवस हा प्रयोग करणे फारच गरजेचे असते. त्यानंतरच तुम्हाला चामखीळावर झालेला फरक जाणवेल.
चेहऱ्याची चमक वाढवतील या क्रिम्स, नक्की करा ट्राय
यामधील कोणताही प्रयोग करताना जर तुम्हाला त्रास होत असेल तर तो प्रयोग करणे थांबवा.