उन्हाळा हा खूप जणांसाठी फारच त्रासदायक असतो. उष्णतेमुळे शरीरात हिट निर्माण होणे त्यामुळे फोडी, घामोळी, उबाळी असे काही त्रास खूप जणांना होऊ लागतात. आधीच उष्मा आणि त्यात झालेला हा त्रास काही केल्या सहन होत नाही. उबाळी येण्याचा त्रासही या दिवसात खूप जणांना होते. शरीरावर मोठे फोड येतात. हे फोड फारच मोठे असतात. यामध्ये पू साचल्यामुळे अशी पुळी ही सतत ठुसठुसत राहते. काखेत, नितंबावर, पाठीवर, चेहऱ्यावर अशा शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर हे फोड येतात. जास्ती करुन खूप जणांना शरीराच्या अवघड जागीच अशी पुळी येण्याचा त्रास होऊ लागतो. जर तुम्हालाही उबाळीचा त्रास असेल तर जाणून घेऊया याची नेमकी कशी काळजी घ्यायची.
केसांसाठी कोणता कंगवा आहे फायदेशीर जाणून घ्या
चंदन
चंदन हे थंड असते. उबाळी आल्यानंतर ती सतत जळजळते. तिचा आकार जसा वाढू लागतो तस तशी त्वचा अधिक सुजलेली दिसू लागते. अशावेळी ती सूज कमी करण्यासाठी आणि पुळीची जळजळ कमी करण्यासाठी चंदन फारच फायद्याचे ठरते. चंदनाची पावडर हल्ली बाजारात अगदी सहज मिळते. तुम्ही अगदी चमचाभर चंदनाची पावडर घेऊन ती गुलाबपाण्यात भिजवून ठेवा आणि भिजवलेला चंदनाचा पॅक त्या पुळीवर लावा तुम्हाला नक्कीच त्यामुळे आराम मिळेल.
हळद
हळद ही सर्वगुणसंपन्न असते. कोणत्याही जखमेवर ती फार उत्तम पद्धतीने काम करते. जर तुम्हाला आलेले उबाळ चांगले टरटरुन फुगले असेल आणि ते फुटेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर अशावेळी तुम्ही त्यावर हळद लावा. हळद थोडी उष्ण असल्यामुळे ती पू बाहेर काढण्याचे काम करते. शिवाय हा पू बाहेर आल्यानंतर ती जखम भरण्यासाठीही मदत मिळते. त्यामुळे तुम्ही त्या पुळीवर हळद लावू शकता. हळद ओली करुन तुम्ही त्यावर लावा. तुम्हाला नक्कीच आराम मिळतो.
प्री ब्रायडल लुकसाठी कोरोना काळात वापरा या सोप्या घरगुती टिप्स
अॅलोवेरा जेल
अॅलोवेरा जेल हा थंडावा देण्याचे काम करतो. पुळी आल्यानंतर ती जास्त फुगू नये आणि त्याचा त्रास होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लगेचच त्यावर बाजारात मिळणारी अॅलोवेरा जेल लावा. त्यामुळे तुम्हाला लगेचच थंडावा मिळतो. अॅलोवेरा जेल हा खूप जणांकडे असतो. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळी पुळी येत आहे असे वाटत असेल अशावेळी लगेचच तुम्ही अॅलोवेरा जेल लावल्यामुळे पुळीच्या आजुबाजूची सूज कमी होण्यास मदत मिळते.
तुळशीचा पाला
तुळशीचा पाला हा देखील या पुळीसाठी फारच चांगला असतो. त्यामुळे पुळीची सूज उतरण्यास मदत मिळते. तुळशीची पाने वाटून या पुळीला लावले तर पुळी मोठी होऊन ती फुटून जाते.त्यातील बी निघण्यासही मदत मिळते. त्यामुळे तुळशीचा पाला तुम्ही त्या पुळीला लावा. किंवा तुळसीचा अर्क काढून लावला तरी चालेल.
तांदुळाचे पीठ
तांदूळाचे पीठ हे देखील पुळीला लावण्याचा सल्ला दिला जातो. तांदूळाचे पीठ घेऊन त्यामध्ये पाणी घालून त्याची एक पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट पुळीवर लावल्यामुळे पुळी फुटण्यास मदत मिळते.
आता उबाळी आली असेल तर सुरुवातीलाच हे काही ईलाज करा. तुम्हाला नक्कीच बरं वाटेल.
चमकदार आणि डागविरहित त्वचेसाठी वापरा दह्याचे फेशियल