ADVERTISEMENT
home / आरोग्य
जेस्टेशनल डायबिटीस (Gestational Diabetes) असल्यास अशी घ्या काळजी

जेस्टेशनल डायबिटीस (Gestational Diabetes) असल्यास अशी घ्या काळजी

गरोदरपण हे प्रत्येक महिलेसाठी खास असतं. त्यामुळे या काळात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. काही जणींना गरोदरपणाच्या काळात मधुमेहाची समस्या निर्माण होते. गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाला जेस्टेशनल डायबिटीस (Gestational Diabetes) असं म्हणतात. एका संशोधनानुसार भारतीय महिलांना जेस्टेशनल डायबिडीसचा धोका अधिक असतो. बऱ्याचदा गरोदरपणाच्या  24 व्या अथवा 28 व्या आठवड्यामध्ये गरोदरपणातील मधुमेहाची ही समस्या जाणवू शकते. सामान्यपणे प्रेग्नसीमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक असतेच. मात्र जेव्हा हे प्रमाण अती प्रमाणात वाढल्यास त्या महिलेला ‘जेस्टेशनल डायबिडीस’ होऊ शकतो. यासाठीच प्रेगन्सीमध्ये मधुमेह नियंत्रित करणं गरजेचं आहे. जेस्टेशनल डायबिटीस हा फक्त गर्भधारणेच्या काळापुरताच असतो. म्हणजे गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत तो सुरु होतो  आणि प्रसूतीनंतर मधुमेह  आपोआप कमी  होतो. मात्र गर्भारपणाच्या काळात जर तुम्हाला मधुमेह झाला तर याबाबत काही गोष्टींची दक्षता पाळणं गरजेचं आहे. जसं मधुमेहातील योग्य आहार. जेस्टेशनल डायबिटीसमुळे गर्भवती महिला आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी या काळात गर्भवती महिलांनी गर्भारपणात या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

जेस्टेशनल डायबिटिसचा बाळ आणि आईवर काय परिणाम होऊ शकतो-

  • गर्भाची वाढ प्रमाणाबाहेर होते ज्यामुळे प्रसूती होताना समस्या येतात
  • प्रसूती कष्टामुळे बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो.
  • नैसर्गिक प्रसूती होणे कठीण जाते ज्यामुळे सी सेक्शन करावे लागते.
  • प्रसूती दरम्यान आईला आणि बाळाला इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो
  • बाळाला जन्मतःच मधुमेह होऊ शकतो
  • बाळाला श्वसनाच्या समस्या होऊ शकतात
  • बाळाला जन्माला येताना कावीळ होऊ शकते

मधुमेहाच्या लक्षणांबद्दलही वाचा

ADVERTISEMENT

जेस्टेशनल डायबिटिस असल्यास काय काळजी घ्याल-

  • गर्भधारणा झाल्यावर डॉक्टरांच्या सल्लाने लगेच मधुमेहाची टेस्ट करावी. ज्यामुळे तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीस आहे का ते समजेल.
  • गरोदरपणाच्या संपूर्ण काळात नियमित मधुमेहाच्या टेस्ट कराव्या. ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित आहे का हे तुम्हाला समजेल.
  • डॉक्टरांनी नियमित घेण्यासाठी दिलेली औषधे घेण्याचा कंटाळा करू नये.
  • गर्भवती महिलेचा आहार संतुलित आणि पोषक असावा.
  • आहारात फायबरयुक्त अन्न, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं, सुकामेवा, दूध, शुद्ध तूपाचा समावेश अवश्य करावा.
  • जंकफूड, तळलेले पदार्थ, अती जड आहार, चायनीज, शिळे अन्न, मीठ आणि साखरयुक्त पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स असे पदार्थ घेणे टाळावे.
  • वजन नियंत्रित आहे का याची नियमित काळजी घ्यावी
  • गोड पदार्थ अथवा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवणारे पदार्थ कमी प्रमाणात घ्यावे
  • डॉक्टरांच्या सल्लाने गरोदरपणात शारीरिक हालचाल योग्य प्रमाणात करावी ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर अनियंत्रित होणार नाही.
  • या काळात चालणे, प्राणायम, मेडीटेशन केल्याने तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
  • जीवनशैली आणि आहार-विहाराबाबत योग्य काळजी घेतल्यास बाळाची वाढ आणि प्रसूती दरम्यान असलेला धोका कमी होऊ शकतो.
  • शक्य असल्यास घर आणि ऑफिसमधील जबाबदाऱ्या कमी कराव्या ज्यामुळे कामाचा ताण वाढणार नाही. गरोदरपणात अती ताणामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होण्याचा धोका अधिक असतो.

अधिक वाचा

गोड बातमी जाणून घेण्यासाठी करा या प्रेगन्सी टेस्ट

मधुमेहावर करा घरगुती उपचार आणि करा मधुमेहाला दूर (Home Remedies for Diabetes)

नोकरी करणाऱ्या महिलांनी गरोदरपणी अशी घ्यावी स्वतःची काळजी

ADVERTISEMENT

 रक्तदाबासाठी घरगुती उपचार

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

15 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT