केसांना पहिल्यांदाच हेअर डाय (Hairdye) करायचा असेल तर मनात कितीतरी विचार येतात. तुम्हाला हवं तर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन डाय करा अथवा घरी. पण त्यासाठी काही बेसिक गोष्टी तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असणं आवश्यक आहे. तुम्ही या गोष्टी जाणून घेतल्या तर तुम्हाला हेअर डाय करताना नक्कीच फायदेशीर ठरू शकतात आणि तुम्हाला कोणत्याही त्रासाचा सामना करावा लागणार नाही. पण त्याआधी हेअरडाय म्हणजे नक्की काय ते जाणून घेऊया.
हेअर डाय काय असतं?
हेअर डाय अर्थात केसांना रंग देणं. बऱ्याचदा केसांना रंग अर्थात हेअरडाय तेव्हाच केलं जातं जेव्हा केस पांढरे होऊ लागतात. केसांना वेगवेगळा रंग देणं हल्ली खूपच ट्रेंडमध्ये आहे. तुम्हीदेखील केसांवर वेगळा हेअरडाय नक्कीच करू शकता. तर कधी कधी हेअरडाय हा केसांचा नैसर्गिक रंग तसाच दिसावा यासाठीही करण्यात येतो, जो अन्य हेअर ट्रिटमेंटमुळे खराब झालेला असतो. पहिले केवळ काळ्या रंगानेच हेअरडाय करण्यात यायचा. पण आता अनेकविध रंगांनी हेअर डाय अर्थात हेअर कलर मिक्स करून लावता येतो. हायलायटिंगमध्ये केसांचा काही भाग हा लायटनर्सच्या मदतीने कलर करण्यात येऊ शकतो. तर लो लाईटनिंगमध्ये केसांचा काही भाग हा अधिक गडद रंगाने कलर करण्यात येतो.
हेअरडाय करण्याचे फायदे
एजिंगची लक्षणं लपविण्यासाठी हेअरडाय करण्यात येतो हे तर सर्वानाच माहीत आहे. पण याचे इतरही अनेक फायदे आहेत. केसांना रंग दिल्याने केसांचा व्हॉल्युम वाढतो. तसंच तुमच्या केसांना घनदाट करण्यासाठी याचा फायदा मिळतो. हेअरडाय केल्याने केस घनदाट दिसतात आणि केसगळती होणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. केसांना रंग दिल्याने केसांना एक वेगळी चमक येते. अशा तऱ्हेने केसांना व्हायब्रंट लुक देता येऊ शकतो. तुमचा नैसर्गिक केसांचा रंग जर तुमच्या त्वचेला मॅच करत नसेल तर तुम्ही कोणताही रंग आपल्या केसांना देऊ शकता. पण हा रंग तुमच्या व्यक्तीमत्वाला सूट होतो की नाही ते पाहा. सर्व नैसर्गिक रंग हे चांगले सतात कारण यामुळे नुकसान होत नाही.
हेअरडाय पहिल्यांदाच करत असाल तर जाणून घ्या या गोष्टी
हेअरडाय करण्यापूर्वी आपण काही गोष्टींची माहिती करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
1. रिसर्च गरजेचा आहे
केसांना कोणताही रंग लावण्यापूर्वी त्याची माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. वेगवेगळ्या साईट्स आहेत ज्यावर तुम्हाला याबद्दल योग्य माहिती मिळू शकते. हेअरडाय करण्यापूर्वी आपल्या केसांसाठी योग्य रंग कोणता आणि योग्य कलरिस्ट कोणता याबद्दल माहिती करून घ्या. तुम्ही जर पार्लर अथवा सलॉनमध्ये जाऊन करणार असलात तर हे काम कोणत्या तरी स्पेशालिस्टकडूनच करून घ्या. हे स्पेशालिस्ट अनुभवी आहेत की नाही हे जाणून घ्या. केसांना कलर करण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्या आणि कलरिस्टशी याबाबत चर्चा करा की तुम्हाला कोणत्या प्रकारचा हेअरडाय करून हवा आहे.
कलर हेअरची स्टाईल टिकवण्यासाठी वापरा ‘हे’ 15 बेस्ट शॅम्पू (Best Shampoo For Colored Hair)
2. हायलाईट्स करा ट्राय
आपल्या त्वचेच्या रंगानुसार तुम्हाला परफेक्ट रंगाची निवड करणं कठीण होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला ट्रायल अँड एरर मेथडची गरज आहे. त्यासाठी तुम्ही आधी सगळ्या केसांना हेअरडाय करण्यापेक्षा केवळ हायलाईट्स करून घ्या. तुमची त्वचा गुलाबी अंडरटोन असेल तर वॉर्म्थ हायलाईट करू नका. तुमची त्वचा वॉर्म स्किन टोन असेल तर कूल टोन्स निवडा उदाहरणार्थ बीन्ज ब्लॉन्ड. न्यूट्रल स्किन टोनसाठी तुम्ही कूल अथवा वॉर्म ब्लॉन्ड रंगाची निवड करा.
3. फ्लेक्सिबल ठेवा
जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच हेअरडाय करणार असाल तेव्हा स्वतःला थोडं फ्लेक्सिबल ठेवा. तुम्ही जो विचार केला आहे तसाच रिझल्ट तुम्हाला पहिल्यांदा मिळेल असं नाही. त्यामुळे हेअर स्टायलिस्टची निवड नीट करा. हेअरडाय करण्यापूर्वी तुमच्या कलरिस्टबरोबर नीट संवाद साधा. तुम्हाला नक्की काय हवंय हे त्याना नीट सांगा.
Hair color जास्त काळ टिकण्यासाठी सोप्या टिप्स (How To Make Hair Color Last Longer)
4. केसांचे स्ट्रक्चर बदलू शकते
डाय केल्यानंतर तुमच्या केसांंचे स्ट्रक्चर बदलू शकते. तुमचे केस अगदी सहज मॅनेज होतील असं नेहमीच सलोनमधून सांगण्यात येतं. एका सिंगल कलर प्रोसेसनंतर केसांचे क्यूटिकल्स उघडतात आणि त्यामुळे केसांची स्टाईल करणं सोपं होतं. तसंच केसांचा व्हॉल्युमही चांगला वाढतो.
5. कोरडी त्वचा तुम्हाला त्रासदायक ठरू शकते
हेअर कलर प्रॉडक्ट्समध्ये अनेक तऱ्हेचे केमिकल्स असतात जे त्वचेला नुकसान पोहचवात. हेअरडाय करण्यापूर्वी तुम्हाला पॅच टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे या उत्पादनाने तुम्हाला काही नुकसान तर होत नाही ना याची खबरदारी घेता येते. तसंच तुम्हाला अलर्जी तर नाही ना हेदेखील यातून कळतं. बऱ्याचदा यातील पॅराफेनिलेनेडिमाईनच्या मुळे त्वचेवर अलर्जी अथवा रॅशेस येण्याची शक्यता असते.
केसांना करा कलर आणि हायलाईट घरी (How To Highlight Hair At Home In Marathi)
6. शँपूचा वापर
हेअरडाय केल्यानंतर केसांवर केस कोरडे करणाऱ्या शँपूचा वापर करू नका. वेळोवेळी केसांना कंडिशनिंग करत राहा. केसांना लवकर लवकर डाय करू नका. काही महिन्यानंतरच हेअरडाय करा. तोपर्यंत माईल्ड शँपूचा वापर करा. केस सतत धुणे योग्य नाही.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.