शाहीद कपूरच्या कबीर सिंग चित्रपटाला देशभरातून वाहवा मिळाली आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही भरपूर कमाई केली. या चित्रपटाचं आणि ओरिजिनल अर्जुन रेड्डीचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या नेक्स्ट प्रोजेक्टबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
कबीर सिंग फेम दिग्दर्शकाच्या पुढच्या प्रोजेक्टची उत्सुकता
कबीर सिंगला अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद बॉलीवूडमध्ये मिळाला. हा चित्रपट त्याच्या ओरिजिनल चित्रपटाइतका प्रभावी नसूनही त्याने चांगलीच कमाई केली. शाहीदचा अभिनय आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा या चित्रपटाच्या यशात मोठा वाटा होता. त्यामुळे नवल नाही की, या दिग्दर्शकाच्या पुढच्या चित्रपटाबद्दलही बॉलीवूड आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता असेल.
रणबीरच्या हाती लागला हा प्रोजेक्ट
सूत्रानुसार, संदीप रेड्डी वांगाने निर्माता भूषण कुमारशी आपल्या पुढच्या प्रोजेक्टबाबत चर्चा केली असून निर्मात्यांना संदीपची आयडिया आवडली आहे. तर या चित्रपटासाठी रणबीर कपूरला अप्रोच करण्यात आलं आहे आणि या प्रोजेक्टबाबत रणबीरसुद्धा खूपच सीरियस आहे. रणबीरने या चित्रपटाची कहाणी वाचली असून त्याला ती खूप आवडली आहे. त्यामुळे आता संदीप रेड्डीच्या पुढच्या चित्रपटाबाबतची उत्सुकता अजूनच वाढली आहे. हा चित्रपट क्राईम थ्रिलर असेल.
रणबीरला गरज आहे हिट चित्रपटाची
रणबीरचा संजू या चित्रपटानंतर कोणताही सिनेमा रिलीज झालेला नाही. पण रणबीरला घेऊन हा चित्रपट करायचं म्हटल्यास शूटींग सुरू व्हायला वेळ लागू शकतो. कारण सध्या रणबीर शमशेरा आणि ब्रम्हास्त्रमध्ये बिझी आहे. बऱ्याच वेळापासून त्याच्या आणि आलियाच्या आगामी ब्रम्हास्त्रबद्दल चर्चा आहे. पण या चित्रपटाच्या रिलीजबाबत कोणतीही बातमी आलेली नाही. अनेक महिन्यांपासून ब्रम्हास्त्रचं शूटिंग चालू आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची भूमिका आहे.
अर्जुन रेड्डीचाही सिक्वल येणार
कबीर सिंग हा चित्रपट अर्जुन रेड्डी या तेलुगू चित्रपटाचा रिमेक होता. या ओरिजिनल चित्रपटाचा सीक्वल आणण्याबाबतही संदीप रेड्डी वांगाचं काम सुरू आहे. संदीपच्या कबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर तब्बल 300 करोडची कमाई केली होती. आता पाहूया त्याचा पुढचा सिनेमा बॉलीवूडच्या फॅन्सना आवडतो की नाही?
हेही वाचा –
जेव्हा मीराने केली ‘कबीर सिंह’ करण्यासाठी शाहिदची मनधरणी
शाहीदच्या ‘कबीर सिंह’ने दबंग खानलाही टाकलं मागे
10 कारणांमुळे साऊथचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंह’ वाटतोय *Intresting