logo
ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
लवकरच आई होणार आहे काजल अग्रवाल, चित्रपटाचे शूटिंग केले बंद

लवकरच आई होणार आहे काजल अग्रवाल, चित्रपटाचे शूटिंग केले बंद

अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिचा मित्र गौतम किचलू यांनी 30 ऑक्टोबरला लग्न केलं होतं. कोरोनाचा काळ असल्यामुळे त्यांनी झटपट आणि  अगदी  साधेपणाने विवाह सोहळा पार पाडला होता. काजल आणि गौतम एकमेकांना सात वर्ष डेट करत होते. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक लग्नाचा निर्णय घेतला. आता लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाही तोवर काजल आई होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण तिने सध्या तिच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग या कारणासाठी अर्ध्यावर सोडलं आहे. मात्र याबाबच काजलने अजूनही कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे काजल खरंच आई होणार आहे का हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

कियारा आडवाणी ‘स्मिता पाटील मेमोरिअल ग्लोबल पुरस्कार’ ने सन्मानित

काजलने का अर्ध्यावर सोडलं चित्रपटाचं शूटिंग 

काजल सध्या तिच्या आगामी चित्रपट आचार्य आणि घोस्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. मात्र अचानक तिने या दोन्ही चित्रपटांमधून काढता पाय घेतला आहे. आचार्यसाठी तिला अनेक स्टंट करावे लागणार होते. ज्यासाठी काजलने रितसर ट्रेनिंग घेतलं होतं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिने आता तिच्या चित्रपटाचं शूटिंग थांबवलं आहे. तिने एका पाठोपाठ या दोन्ही चित्रपटात काम करण्यास अचानक नकार दिला आहे. काजलने यासाठी घोस्ट चित्रपटाच्या निर्मात्यांना कल्पना दिली असून त्यासाठी परवानगीदेखील घेतली आहे. मात्र हा निर्णय तिने तिच्या प्रेगनन्सीसाठी घेतला आहे का याबाबत खुलासा केलेला नाही. 

दीपिका आणि रणवीरने अलिबागमध्ये खरेदी केला आलिशान बंगला, किंमत ऐकूल व्हाल थक्क

ADVERTISEMENT

काजल अग्रवाल खरंच  होणार का आई

काजल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. लग्नाआधी आणि लग्नानंतर तिने तिच्या खाजगी आयुष्यातील खूप फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिने कोणताही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेला नाही. कदाचित काही दिवस तिला तिच्या प्रेगनन्सीचे कारण उघड करायचे नसेल. मात्र चाहत्यांना ती गरोदर असेल तर आनंदच होणार आहे. काजलची लव्हस्टोरी आणि लग्नाची बातमी  चांगलीच व्हायरल झाली होती. काजल गेले सोळा वर्ष चित्रपटसृष्टीत आहे. तिने क्यो हो गया ना या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. काजलने हिंदीप्रमाणेच अनेक साऊथ चित्रपटात काम केलं आहे. त्यामुळे ती साऊथची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सहाजिकच काजलचा बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये चांगला फॅन फॉलोइंग आहे. अजय देवगनच्या सिंघममधून काजलला बॉलीवूडमध्ये नवी ओळख मिळाली होती. आता काजलच्या चाहत्यांना तिच्याकडून ती आई होणार आहे हे अधिकृतपणे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. मात्र तोपर्यंत चाहत्यांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

‘परशा’ अर्थात आकाश ठोसरचा नवा लुक करतोय चाहत्यांना घायाळ, फोटो व्हायरल

17 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT