ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
स्टार असूनही या प्रसिद्ध अभिनेत्रीला द्यावी लागली ऑडिशन, शेअर केला अनुभव

स्टार असूनही या प्रसिद्ध अभिनेत्रीला द्यावी लागली ऑडिशन, शेअर केला अनुभव

कोणत्याही स्टारला एखाद्या चित्रपटासाठी इतक्या वर्षानंतर ऑडिशन द्यावी लागली तर? ऐकूनच थोडं विचित्र वाटतं ना? पण हे घडलं आहे. बॉलीवूडची दिवा बेबो अर्थात करिना कपूर खानला आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच ऑडिशन द्यावं लागलं आहे. तुम्हाला नक्कीच हे ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. करिनानेच आपल्या एका मुलाखतीमध्ये ही गोष्ट सांगितली आहे. करिना कपूर खानने गेले वीस वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करून नाव कमावलं आहे. पण असा कोणता चित्रपट आहे ज्यासाठी करिना कपूरला ऑडिशन द्यावी लागली हे जाणून घ्यायची उत्सुकताही तुम्हाला लागली असेल ना? तर इतके वर्ष काम करूनही करिना कपूरला आमिर खानच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटासाठी ऑडिशन द्यावी लागली. तुम्हालाही वाटलं ना आश्चर्य?

Good News: करिना कपूर पुन्हा होणार आई, घरात येणार पाहुणा

आमिर खानने घेतली वेगळ्या पद्धतीने ऑडिशन

लाल सिंह चढ्ढा या चित्रपटासाठी आमिर खानने करिना कपूरला फोन केला आणि तिला सांगितले की, तू चित्रपटाची स्टोरी ऐक आणि करिनाने त्यावर होकारही दिला. त्यानंतर जेव्हा करिनाने कथा ऐकली तेव्हा आमिर तिला म्हणाला की, चल आपण काही सीन वाचूया. आमिर खानने तिला वेगळ्या तऱ्हेने सांगितले की आपण एक काम करू आपण यातील काही सीन वाचू. त्यानंतर दोघांनी  मिळून यातील काही सीन्सचे वाचन केले. करिना कपूरला पहिल्यादा काहीच समजलं नाही. मात्र काही वेळानंतर तिच्या लक्षात आलं की, परफेक्शनिस्ट आमिर खानने बोलता बोलता अगदी सहज तऱ्हेने तिची एक प्रकारे ऑडिशनच घेतली आहे. आपल्या करिअरमध्ये करिनाने पहिल्यांदाच अशी तऱ्हेने ऑडिशन दिल्याचं कबूल केलं. करिनाच्या मते आमिर खानला 100 टक्के खात्री करून घ्यायची होती की भूमिकेसाठी मी परफेक्ट आहे की नाही? त्यामुळेच त्याने असे केले. आमिर खानबरोबर करिनाने याआधीही ‘थ्री इडियट्स’ चित्रपटात काम केले आहे. शिवाय आमिर खान हा तिचा आवडता को – स्टार असल्याचंही तिने बऱ्याचदा सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा लवकरच ही जोडी एकत्र दिसणार असल्याचा त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. अजूनही या चित्रपटाचं काही चित्रीकरण शिल्लक आहे. मात्र आता करिना गरोदर असल्याने चित्रीकरण होणार की नाही असा प्रश्न होता. मात्र करिना अत्यंत व्यावसायिक असून या चित्रपटाचं चित्रीकरण सांगितल्याप्रमाणे पूर्ण करणार आहे.  

नेहा कक्करला पुन्हा लागले आहेत लग्नाचे वेध, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

ADVERTISEMENT

फॉरेस्ट गंपचा रिमेक

‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात टॉम हँक्स आणि रॉविन राईट या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी आमिर खानने 20 किलो वजन कमी केलं आहे. आमिर खान प्रत्येक चित्रपटासाठी जीव तोडून काम करतो आणि परफेक्शन आणतो हे तर सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे आता हा चित्रपट नक्की कसा असणार याचीही सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे या चित्रपटाचं चित्रीकरण थांबविण्यात आलं आहे. मात्र लवकरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जोडीला एकत्र पाहण्यासाठी किमान अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 

Masaba Masaba Review:नीना गुप्ता आणि मसाबाचे खासगी आयुष्य उलगडणारी सीरिज

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

01 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT