जेव्हा आपण एथनिक वेअर (Ethnic Wear) स्टायलिंगबाबत बोलतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपण साडी आणि ब्लाऊज याबाबतच बोलतो. ब्लाऊजचे डिझाईन्स हे आपल्या साडीला अधिक आकर्षक बनवतात यात नक्कीच कोणाचं दुहेरी मत नसेल. अनेकदा ब्लाऊज शिऊन घेतले जातात. पण सध्या डिझाईनर आणि रेडिमेड ब्लाऊजची (Readymade Blouse) बाजारामध्ये जास्त चलती असल्याचे दिसून येत आहे. आजही ब्लाऊज म्हटलं की, साधारण त्याला हात शिवलेले आपण पाहतोच. पण तुम्ही आता वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्येही स्लिव्हसेल ब्लाऊज (Sleeveless Blouse) डिझाईन्स नक्कीच वापरून पाहू शकता. कितीही पारंपरिक साड्या असल्या तरीही त्यावर स्टायलिश स्लिव्हलेस ब्लाऊज आकर्षक दिसतात. स्लिव्हलेस ब्लाऊजची फॅशन ही कधीच जात नाही. याचे वैशिष्ट्यही आहे की, तुम्ही स्लिव्हलेस ब्लाऊज वेगेवगळ्या पद्धतीने शिवू शकता. डीप नेक ब्लाऊजपासून ते अगदी हॉल्टर नेकलाईनपर्यंत सर्व स्टाईलचे स्लिव्हलेस ब्लाऊज हे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांवर उठावदार दिसतात. अशा कोणत्या स्लिव्हलेस ब्लाऊजच्या डिझाईन्स वा स्टाईल्स आहेत, ज्या तुम्ही करू शकता पाहूया.
फ्लोरल स्लिव्हलेस ब्लाऊज (Floral Sleeveless Blouse)
तुम्हाला तुमच्या ब्लाऊजचा एलिगंट पण अत्यंत रिफ्रेशिंग लुक हवा असेल तर तुम्ही फ्लोरल स्लिव्हलेस ब्लाऊजचा विचार करावा. या स्टाईलिंगचे ब्लाऊज तुम्ही ऑफिसपासून ते पार्टीजपर्यंत सर्व ठिकाणी वापरू शकता. यामध्ये तुम्ही कॅज्युअल प्रिंटेड फ्लोरल फॅब्रिकचा वापर करा. तर पार्टीसाठी तुम्ही फ्लोरल पॅटर्न ब्लाऊजची निवड करू शकता. साडी आणि लेहंगा दोन्हीवर तुम्ही याचा वापर करू शकता. फक्त लेहंग्यासह तुम्ही मॅचिंग फ्लोरल स्लिव्हलेस ब्लाऊज शिवा. तर साडीच्या लुकसाठी तुमची प्लेन साडी असल्यास, असा लुक अधिक सुंदर दिसतो.
हायनेक स्लिव्हलेस ब्लाऊज (High Neck Sleeveless Blouse)
हायनेक गेल्या काही दिवसांपासून अधिक ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही ही स्टाईल केवळ तुमच्या टॉपसह नाही तर ब्लाऊजमध्ये तुम्ही करू शकता. हायनेक स्लिव्हलेस ब्लाऊजचे वैशिष्ट्य असे आही की, प्लेन लुक असला तरीही हे दिसायला उत्तमच दिसते. तुम्ही प्लेन साडीसह असा ब्लाऊज डिझाईन करत असाल तर कलर कॉन्स्ट्रास्ट करून तुम्ही नवा लुक देऊ शकता. तसंच पार्टी लुकसाठी तुम्ही मानेच्या भागाजवळ बीड्स अथवा अन्य डिझाईन्स शिऊन घेऊ शकता. अशा स्टाईलचे ब्लाऊज घातल्यानंतर यासह मोठे कानातले अधिक सुंदर दिसतात.
हॉल्टर नेक स्लीव्हलेस ब्लाऊज (Halter Neck Sleeveless Blouse)
हादेखील स्लिव्हलेस ब्लाऊज डिझाईन करण्याचा एक चांगला पर्याय आहे. हॉल्टर नेकलाईन स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये तुम्ही हायनेकपासून ते स्वीटहार्ट नेकलाईनपर्यंत सगळ्या स्टाईल्सचे ब्लाऊज डिझाईन करून घेऊ शकता. हॉल्टर स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये तुम्ही बॅक डिझाईनपासून ते डीप व्ही पर्यंत आणि बॅकलेस ब्लाऊज डिझाईनही उत्तम कॅरी करू शकता. यामुळे तुमची स्टाईल अधिक स्टनिंग दिसेल.
प्लंजिंग स्लीव्हलेस ब्लाऊज (Plunging Sleeveless Blouse)
तुम्हाला विशेषतः पार्टी लुकसाठी स्लीव्हलेस ब्लाऊज डिझाईन हवे असेल तर तुम्ही या पर्यायाचा वापर करा. प्लंजिंग नेकलाईनमध्ये व्ही नेकलाईनला अधिक पसंती देण्यात येते. पण तुम्हाला यासह अधिक वेगळा लुक ट्राय करायला आवडणार असेल तर तुम्ही स्वीटहार्ट नेकलाईनही निवडू शकता. या स्टाईलच्या ब्लाऊजसह तुम्ही चोकर दागिने घातले तर अधिक आकर्षक दिसतात. याशिवाय तुम्ही चोकरसह लांब हार घातल्यास, अधिक सुंदर दिसतो. तुम्ही तुमचा नेकलाईन एरिया अधिक सुंदर दिसण्यासाठी मोत्याच्या दागिन्यांचाही वापर करू शकता.
अशा वेगवेगळ्या स्टाईल्सचे स्लिव्हलेस ब्लाऊज डिझाईन्स तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी नक्कीच डिझाईन करून घेऊ शकता. तुमची निवड काय आहे हे तुम्हीच ठरवा.