ADVERTISEMENT
home / Weight Loss
लठ्ठपणा (बेरिएट्रिक) शस्त्रक्रियेनंतर जीवनशैलीत करा हे चांगले बदल

लठ्ठपणा (बेरिएट्रिक) शस्त्रक्रियेनंतर जीवनशैलीत करा हे चांगले बदल

लठ्ठपणा म्हणजे एखाद्याच्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणे. जे आरोग्यासाठी हानिकारक ठरते.  कारण यामुळे इतर आजार होतात आणि आरोग्यावर दुष्परिणाम होतात. लठ्ठपणामुळे टाइप 2 मधुमेह इन्शुलिनच्या कमतरतेमुळे रक्तामध्ये व लघवीमध्ये साखर आढळणे, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, पीसीओडी,  वंध्यत्व, स्लीप एप्निया, गाउट, यकृत रोग इत्यादी बर्‍याच आजारांचा धोका वाढतो. याबाबत आम्ही डॉ. अपर्णा गोविल भास्कर लॅपरोस्कोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जन, सैफी हॉस्पिटल, मुंबई यांच्याकडून अधिक जाणून घेतले. 

प्रभावी उपचार

प्रभावी उपचार

Shutterstock

वजन कमी करण्यासाठी आणि  लठ्ठपणा दूर करण्यासाठी रूग्णांमध्ये  बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया एक प्रभावी उपचार आहे. बेरिएट्रिक शस्त्रक्रिया देखील लठ्ठपणाच्या संबंधित रोगांमध्ये, विशेषत: टाइप 2 मधुमेहामध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणते. मात्र लठ्ठपणाच्या उपचारांना देखील दीर्घ-कालावधीसाठी चांगल्या सवयींचे पालन, जीवनशैली सुधारणे आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

निरोगी आहार, जीवनशैली सुधारणे आणि नियमित पौष्टिक आहार घेणे चांगले आरोग्य राखण्यासाठी आणि बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेनंतर निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे. पहिल्या वर्षात शस्त्रक्रिया लक्षणीय वजन कमी करण्यास मदत करते आणि जे रुग्ण या जीवनशैलीतील बदलांना स्वीकारतात त्यांचे वजन कमी होणे, वजन नियंत्रणात राखणे असे चांगले परिणाम पाहायला मिळतात.

अधिक वाचा – लठ्ठपणा ठरतोय कर्करूग्णांच्या मृत्यूला कारणीभूत, तज्ज्ञांचे मत

जीवनशैली सुधारणेच्या काही महत्वाच्या टिप्स

जीवनशैली सुधारणेच्या काही महत्वाच्या टिप्सचे पालन केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. 

  • क्लिअर लिक्वीड फेज: पहिला व दुसरा दिवस
  • फुल लिक्वीड फेज: ३- १५ दिवसांपर्यत
  • मऊ आहाराचा टप्पा: दिवस १६ ते ३० दिवसापर्यत
  • पूर्णत: डाएट आहाराचा टप्पा: 1 महिन्यानंतर

हळूहळू खाणे, घन पदार्थ आणि द्रवपदार्थाचे सेवन करताना त्यात ठराविक अंतर राखा. जर अन्न जास्त वेगाने किंवा जास्त प्रमाणात सेवन केले तर त्याचा परिणाम उलट होण्याची शक्यता अधिक असते.   प्रथिने आणि फायबर समृद्ध असलेल्या खाद्यपदार्थावरही अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि साखर आणि ट्रान्सफॅटसचे प्रमाण अधिक असलेले  पदार्थ टाळले पाहिजेत.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – रात्री भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो का, जाणून घ्या काय आहे सत्य

व्यायामाची आवश्यकता

व्यायामाची आवश्यकता

Shutterstock

बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेनंतर व्यायाम करणे आवश्यक आहे. हे स्नायूंचे नुकसान होण्यापासून रोखते त्याचबरोबर स्नायू बळकट करते.  शरीर सक्रिय असणे आणि शारीरिक हालचाली आवश्यक आहे. पहिल्या महिन्यात अतिरिक्त व्यायाम न करता काही पावले चालणे, फेरफटका मारणे योग्य ठरते. एका महिन्यानंतर, 30-40 मिनिटांसाठी जोरात चालणे सुरू केले जाऊ शकते. 3 महिन्यांनंतर रुग्ण हलके  प्रशिक्षणासह हलके व्यायाम, वजन उचलणे यासारख्या गोष्टींना प्रारंभ करू शकतात आणि कार्डिओ सुरू ठेवू शकतात. शस्त्रक्रियेच्या 6 महिन्यांनंतर कोणतेही बंधन नाही आणि कोणत्याही प्रकारचे व्यायाम केले जाऊ शकतात.

ADVERTISEMENT

 

पाण्याचे सेवन

पाण्याचे सेवन

Shutterstock

पाण्याचे योग्य सेवन करणे ही आणखी एक बाब आहे ज्यावर शस्त्रक्रियेनंतर लक्ष देणे आवश्यक आहे. कमी पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणे, बद्धकोष्ठता, स्नायू अवघडणे आणि थकवा येऊ शकतो. शरीराचे कार्य सहजतेने कार्य करण्यासाठी दिवसाला किमान 1.5-2 लिटर / द्रवपदार्थाचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. दीर्घकालीन द्रवपदार्थाचे सेवन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बॅरिएट्रिक तज्ज्ञांच्या संपर्कात राहणे, नियमितपणे पाठपुरावा रूग्णांनी दर 6 महिन्यात एकदा  बॅरिएट्रिक तज्ञांची भेट घेणे आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

लठ्ठपणा ठरतोय वंधत्वाचे मुख्य कारण, जाणून घ्या तथ्य

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

14 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT