ADVERTISEMENT
home / फॅशन
लांब वेणीची फॅशन आली परतून

लांब वेणी पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये, कधी करावी हेअरस्टाईल

जुनी फॅशन नव्या रुपाने परतत असते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. बेलबॉटम पँट्स, फिश कट स्कर्ट,केसांचा बनपासून वेगवेगळे फॅशन ट्रेंड जे जुने होते ते आता पुन्हा एकदा दिसू लागले आहेत. सध्या लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. या सीझनमध्ये शॉपिंग आणि आलेल्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स पटकन कळून येतात. ज्यांची लग्न साधारण 20 वर्षांपूर्वी झाले असेल त्यांना लांब वेणीचा लुक नक्कीच माहीत असेल. हल्ली पुन्हा एकदा केसांची लांब वेणी घालण्याचा ट्रेंड आलेला आहे.  लग्नातील कोणत्या लुकवर तुम्हाला ही लांबवेणी चांगली दिसेल ते जाणून घेऊया.

वाचा- या सीझनमध्ये होणाऱ्या लग्नांसाठी निवडा हे रंग, आहेत खूपच ट्रेंडमध्ये

ट्रेडिशनल लांब वेणी

ट्रेडिशनल लांब वेणी

साऊथ इंडियन लग्नामध्ये लांब वेणी आणि त्यावर विशिष्ट हेअर ॲसेसरीज लावली जाते. त्यामुळे या वेणी खूपच छान दिसतात. तुमचे केस लांब नसले तरी देखील तुम्हाला केसांची सप्लिमेंट लावून मग छान वेणी घातली जाते. ट्रेडिशनल वेणी दिसायला खूपच सुंदर दिसते. जर तुमचा लेहंगा एकदम ट्रेडिशनल असेल आणि तुम्हाला थोडी ट्रेडिशनल हेअरस्टाईल हवी असेल तर तुम्ही मस्त ट्रेडिशनल लांब वेणी बांधू शकता. त्यावर तुम्ही गजरा जरी गुंडाळला तरी देखील ती हेअरस्टाईल भरलेली दिसते.

परांदा लावलेली वेणी

परांदा वेणी

पंजाबी वेणी असेल तर त्याच्या खाली परांदा अगदी हमखास लावला जातो. जर तुम्हाला वेणीच्या शेवटी थ्रेड आलेले आवडत असेल तर तुमच्यासाठी ही वेणी खूपच सुंदर आहे. इंडो-वेस्टर्न कपड्यांवर म्हणजेच शरारा किंवा गरारा पँट्सवर तुम्हाला अगदी हमखास अशा प्रकारे वेणी घालता येतात. परांदा लावलेली वेणी बांधताना तुम्हाला पाच पेढ्यांची वेणी किंवा सात पेढ्यांची वेणी असे देखील तुम्हाला करता येऊ शकते. तुमच्या आवडीच्या ड्रेसनुसार तुम्हाला त्यावर परांद्याचा रंग निवडता येतो.

ADVERTISEMENT

ट्विस्टिंग वेणी

ट्विस्टिंग वेणी

केसांची वेणी न घालता जर तुम्हाला नुसता केसांना पीळ देऊन वेणी घालायची असेल तर तुम्ही ट्विस्टिंग वेणी प्रकारातील वेणीही बांधू शकता. अशी हेअरस्टाईल खूप जास्त उठून आणि खुलून दिसते. काही जण याला जास्मिन हेअर स्टाईल असे देखील म्हणतात. ट्विस्टिंग वेणी दिसायला खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसते. त्याला तुम्हाला गजरे देखील गुंडाळता येतात. हल्ली अशा काही हेअर ॲसेसरीज मिळतात. त्या केसांना गुंडाळल्या की खूप चांगले दिसतात. त्यामुळे तुम्हाला असे हेअरस्टाईल करता येतात.

ब्रायडल ब्रेड

ब्रायडल ब्रेड

 ब्रायडल ब्रेड हा प्रकार देखील सध्या खूपच जास्त प्रसिद्ध आहे. ब्रायडल ब्रेड हे थोडे जाड असतात. म्हणजे तुमचे केस पातळ असले तरी देखील यामध्ये ते नक्कीच वेगळे दिसतात. थोडी पसरलेली अशी ही वेणी असल्यामुळे तुम्ही ब्रायडल ब्रेड करुन घेऊ शकता. यामध्ये  तुम्हाला खरी आणि खोटी अशी दोन्ही फुलं लावता येतात. ज्यामुळे त्याचा लुक अधिक वाढतो. 

आता केस लांब असो वा शॉर्ट तुम्ही अगदी कोणत्याही केसांवर अशी वेणी हेअरस्टाईल करु शकता.

Wedding Season: नऊवारी साडीवर असे निवडा फुटवेअर

ADVERTISEMENT
06 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT