ADVERTISEMENT
home / पालकत्व
तुमच्या बाळासाठी अर्थासह श्री गणेशाची नावे | Ganpati Names For Baby Boy In Marathi

तुमच्या बाळासाठी अर्थासह श्री गणेशाची नावे | Ganpati Names For Baby Boy In Marathi

घरात बाळाचा जन्म झाला की घरातले वातावरण पूर्णतः बदलून जाते. त्यातही काही आईवडील आणि आजी आजोबा बाळाचे नाव आधीपासूनच ठरवून ठेवतात तर काही जण बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या नावाचा शोध सुरू करतात. हल्ली तर बाळाची नावे शोधण्यासाठी इंटरनेट आणि गुगल हे चांगले माध्यमही आहे. त्यातही आपल्या बाळाचे नाव कृष्णावरून असावे किंवा श्री गणेशाचे नाव असावे अर्थात मुलांचे नाव मराठी आणि त्यातही ते बाळाचे नाव हे श्रीगणेशाचे असावे, अशी बऱ्याच पालकांची इच्छा असते. मराठी नावे बऱ्याचदा गणपतीची मराठी नावे अशी सुचवलेली अथवा बाळाची ठेवली जातात असेही आपल्याला दिसून येते. अष्टविनायक नावे तर आपल्याला माहीत आहेतच. गणपतीची मराठी नावेही आता बऱ्याच ठिकाणी आपल्या बाळांची ठेवलेली दिसून येतात. 

गणपती तुझे नाव चांगले असं म्हणत मराठी घरांमध्ये बाप्पाची भक्ती करत आपल्या मुलाचे नाव ठेवण्याची पद्धतही आहे. खरं तर मराठी घरांमध्ये आजही गणपतीच्या नावावरून बाळाचं नाव ठेवलं जातं. गणपतीचं नाव हे शुभ मानण्यात येते. गणपती हा सर्वांचा इष्ट देव आहे. त्याची विविध ठिकाणी भक्ती करण्यात येते. इतकेच नाही तर गणपती ही अशी एकमेव देवता आहे ज्याची भक्ती सर्व धर्मांमध्ये केल्याचे दिसून येते. भक्ती असल्यामुळे बऱ्याचदा बाळ झाल्यानंतर गणपतीची मराठी नावे शोधली जातात. मुलांचे नाव मराठी असावे असंही बऱ्याच जणांना वाटते. तसेच लहान मुलांचे नाव आपल्याकडे पहिल्या सव्वा महिन्यात ठेवायचीही पद्धत आहे. शोधण्यासाठी साधारण महिनाभर असतो. त्यामुळे तुमच्या बाळासाठी श्री गणेशाची नावे अर्थात गणपतीची नावे व अर्थ आम्ही या लेखातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत. 

यापैकी काही नावे आधुनिक तर काही नावे ही युनिक आहेत. तुम्हाला यातील जे नाव आवडेल ते तुम्ही तुमच्या बाळासाठी नक्कीच निवडू शकता. खास नामकरण आमंत्रण मेसेज पाठवू शकता. इतकंच नाही हल्ली marathi celebrity baby names काय आहेत याचाही ट्रेंड आला आहे त्यानुसार आपल्या मुलांची नावेही ठेवण्यात येतात. पहिल्यांदा आपण अक्षर गणेश नाव काय आले आहे हे पाहून बाळाचे नाव काय ठेवता येईल आणि ते आधुनिक कसे असेल ते पाहूया.

श्री गणेशाची अर्थासह आधुनिक 25 नावे (Marathi Baby Name Inspired By Lord Ganesha)

Names Of Ganesha In Marathi

Names Of Ganesha In Marathi

ADVERTISEMENT

गणपति तुझे नाव चांगले असं म्हणत अनेक घरामध्ये बाप्पाचं पवित्र नाव आपल्या बाळासाठी ठेवण्यात येतं. पण त्यातही आजकाल मराठी बाळाची नावे ही आधुनिक स्वरूपात ठेवली जातात. र अक्षर असो वा कोणतेही अक्षर गणपतीची नावे अनेक आहेत. पण त्याचेही आता आधुनिकीकरण करून लहान मुलांचे नाव ठेवण्यात येते. पाहूया गणपतीची काही अशीच नावे.

 नावे  अर्थ 
 आराध्य आराध्य अर्थात गणपतीची आराधना. कोणत्याही कामाची सुरुवात ही गणपतीच्या आराधनेने होत असते. त्यामुळे या नावामध्ये पावित्र्य जपले जाते. 
 अथेश अथेश अर्थात राजा. गणपती हा नेहमीच बुद्धीचा देवता अर्थात राजा मानला जातो. त्यामुळे या नावाचा अर्थही राजा असा आहे. 
 अमोद असा देव ज्यामुळे कायम आपल्या अंतर्मनामध्ये आनंद मिळतो. जो कायम आनंद देतो असा व्यक्ती म्हणजे अमोद असा या नावाचा अर्थ आहे.
 अमोघ या नावाचा अर्थ आहे अविश्वसनीय. गपणतीने अशी अनेक अविश्वनिय कामे केली आहेत असे नेहमीच म्हटले जाते. त्यामुळे बाप्पा हा नेहमीच अविश्वसनीय आहे त्यामुळे त्याचे अजून एक हे नाव आहे.
 अथर्व सर्व अडथळ्यांना दूर करणारा असा हा बाप्पा. अथर्व या नावाचा हाच अर्थ आहे.  
 अवनिश संपूर्ण जगाचा तारणहार असा असणारा हा बाप्पा ज्याला अवनिश असं म्हटलं जातं
 अयान जगण्याची योग्य दिशा दाखवणारा हा देव असा अयान या नावाचा अर्थ आहे
 इभान हत्तीच्या मुखासमान दिसणारी देवता अर्थात गणपती बाप्पा असा या नावाचा अर्थ होतो.
 धार्मिक धार्मिक अर्थात बाप्पाची भक्ती करणारा असा 
 प्रथमेश सर्व देवतांचा देवता अर्थात प्रथमेश. प्रथम + ईश अर्थात सर्वांचा देवता
 प्रज्ञेशसर्व ज्ञान असणारा आणि हुशार असणारा देव अर्थात प्रज्ञेश 
 रूद्रांश रूद्राचा अंश असणारा अर्थात शंकराचा अंश असणारा बाप्पा. गणपती हा शंकराचा पुत्र असल्याने त्याचा अर्थ रूद्रांश असा होतो. 
 रिद्धेश सर्वांच्या मनात वसणारा असा रिद्धेश. बाप्पा हा सर्वांच्या मनात असतो त्यामुळे बाप्पाचं नाव रिद्धेश असंही आहे. 
 श्रीजाहे थोडंसं वेगळं नाव आहे. हे नाव मुलासाठी आणि मुलीसाठी दोन्हीसाठी वापरण्यात येतं. प्रत्येकाशी संवाद साधू शकणार आणि मित्रत्व असणारा असा व्यक्ती अर्थात गणपतीचा स्वभाव नेहमी असाच वर्णिला असल्याने त्याला श्रीजा असेही म्हटले जाते. 
 तनुष देवाची बुद्धी असणारा व्यक्ती अर्थात तनुष. गणपती ही बुद्धीची देवता म्हटली जाते. त्यामुळे तनुष हे नावही गणपतीचं नाव म्हणून ठेवता येतं.
 विघ्नेशविघ्न सोडविणारा आणि नेहमी विघ्न आल्यावर त्यातून सुखरूप बाहेर काढणारा देव म्हणजे गणपती म्हणून त्याला विघ्नेश असंही म्हटलं जातं. हे नावही बाळाचे ठेवता येते.
 विकट हे नाव सहसा कोणी ठेवत नाही. पण देवासारखे व्यक्तिमत्व असणारा व्यक्ती अर्थात विकट असा या नावाचा अर्थ आहे. 
 रुदवेद गणपती बाप्पाचं नाव आठवणारा अर्थात रूदवेद.
 प्रवथेश प्रथम देवता म्हणजे गणपती. त्यामुळे प्रवथेश या नावाचा अर्थात सर्वात प्रथम असा आहे
 परीन गणपती बाप्पाचं दुसरं नाव म्हणजे परीन असं म्हटलं जातं.
 लविन गणपती बाप्पाचा सुगंध आपल्या शरीरात असणारा असा म्हणजे लविन.
 शिवसानू सर्व अडथळ्यांवर मात केलेला अर्थात शिवसानू. शिवाचा लहान मुलगा
 गजदंतहत्तीचा दात अर्थात गणपतीचा बाप्पाचा मुखवटा हा हत्तीचा आहे त्यामुळे त्याला गजदंत म्हटलं जातं आणि आपल्या बाळाचं नावही हे ठेवण्यात येते
 गौरीक गौरीचा पुत्र आणि तिचं सुंदर रूप असणारा असा देव म्हणजे गौरीक 
 अयोग गणपती बाप्पाशी अतूट नाते असणारा असा अयोग. 
Ganpati Names For Baby Boy In Marathi

मुलांसाठी दोन अक्षरी नावे

गणेशाची 25 युनिक नावे (Lord Ganesha Names for Baby Boy in Marathi)

Names Of Lord Ganesha In Marathi
Names Of Lord Ganesha In Marathi

श्रीगणेशाची काही युनिक नावेही आहेत जी मराठी मुलांची नावे ठेवण्यात येतात. गणपती मध्ये नाव अर्थात गणपतीच्या नावाशी सम नाव काय ठेवायचे असाही प्रश्न नेहमी बाळाच्या जन्मानंतर बरेच जण विचारतात. काही नावे ही आधुनिक आणि अगदी जुनी वाटतात त्यावेळी गणपतीची नावेही हवीत आणि युनिकही हवीत असा विचार असतो. त्यासाठी काही खास युनिक बाप्पाची नावे आम्ही तुम्हाला इथे सुचवत आहोत. 

नावेअर्थ
अद्वैतदुजाभाव नसणारा असा
आदिदेवकोणत्याही देवाची पूजा करण्याआधी ज्या देवाची पूजा आधी केली जाते असा अर्थात आदिदेव. प्रथम पूजा करण्यात येणारा देव. 
अखुरथउंदीर ज्याचं वाहन आहे असा
अंबिकेयसर्व जगाचा भार वाहणारी अशी देवता म्हणजे अंबिकेय. त्याशिवाय गौरीपुत्र असणारा बाप्पा अर्थात अंबिकेचा पुत्र म्हणून अंबिकेय
बालेशनीडर नेता असा बालेश
भूपतीभू अर्थात धरतीवर राहणाऱ्या सर्वांवर प्रेम करणारा असा बाप्पा अर्थात भूपती
देवव्रतयोग्य न्यायासह सर्वांना सगळ्यांवर प्रेम करणारा असा देव
दुर्जाकोणाहीकडून नष्ट न केला जाणारा असा. हे नाव अगदीच युनिक आहे
इशानपुत्रइशान अर्थात भगवान शंकर, शंकराचा मुलगा म्हणून इशानपुत्र
कपिलगणपती बाप्पाप्रमाणे त्वचा असणारा अर्थात थोडासा सावळा आणि त्वचेमध्ये पिवळपणा असणारा असा कपिल या नावाचा अर्थ होतो
कविशकवितांचा देवता
लंबकर्णलांब कान असलेला असा देवता. हे नाव युनिक आहे पण सहसा कोणी आपल्या बाळाचं नाव असं ठेवत नाही
महामतीबुद्धीचा देवता. अतिशय हुशार असणारा असा याचा अर्थ होतो
मनोमयसर्वांच्या हृदयावर राज्य करणारा असा देव. मनोमय या नावाचा अर्थ हृदयाशी संबंधित जोडण्यात येतो
नित्याहे नाव मुलगा अथवा मुलगी या दोघांचंही ठेवता येतं. नित्या अर्थात कायमस्वरूपी राहणारा
ओजसकायमस्वरूपी तेजस्वी राहणारा. भगवान गणेशाप्रमाणे तेजस्वी आणि बुद्धीमान
स्वोजसबाप्पासप्रमाणे तेजस्वी. तेजोमय असा जो अतिशय खंबीर आणि ताकदवान आहे
यश्वसीनजास्त लोकांचा विश्वास असणारा असा देव.
युनयअधिक शक्ती असणारी देवता
शुभनबुद्धीची देवता अर्थात शुभन. गणपती बाप्पा हा 14 विद्या आणि 64 कलांचा देव आहे असं मानलं जातं. त्यामुळे त्याला सर्वात जास्त बुद्धी असल्याचंही म्हटलं जातं. म्हणून शुभन अर्थात बुद्धीची देवता हे नाव थोडं वेगळं ठरतं.
शार्दुलसर्व देवतांचा राजा अर्थात शार्दुल. बाप्पाचं दुसरं नाव
शुभमघरामध्ये आनंद घेऊन येणारा असा. ज्याच्या येण्यात घरात सर्व काही शुभ होते. बाळ येणं म्हणजे सर्व काही शुभ होणं असंही मानलं जातं.
वरदगणपतीची शक्ती असणारा. आशीर्वाद असाही त्याचा अर्थ होतो
तक्षअतिशय नक्षीदार डोळे असणारा असा देव. गणपतीच्या डोळ्यांकडे बघितल्यावर नेहमीच प्रसन्नदायी वाटतं. असे डोळे ज्या मुलाचे असतात त्याच्यासाठी नाव नक्कीच शोभून दिसेल.
विश्वकसर्व जगाचा खजिनदार असणारी देवता अर्थात विश्वक
Names Of Lord Ganesha In Marathi

गणेशाची 25 संस्कृत नावे (Ganesha Sanskrit Names In Marathi)

Names Of Ganpati In Marathi
Names Of Ganpati In Marathi

काही वेगळी नावं ठेवण्याचा सध्या ट्रेंडही आहे. पुन्हा आता संस्कृत नावे मुलांची ठेवण्याची पद्धत सुरू झाली असल्याचं दिसून येत आहे. तसं तर गणेशाची संस्कृतमध्ये 108 पेक्षाही अधिक नावे आहेत. पण त्यापैकी काही वेगळी आणि युनिक अशी नावे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. अष्टविनायक नावेदेखील सहसा संस्कृत नावेच आहेत. पण सहसा ही नावे बाळाची ठेवण्यात येत नाहीत. गणेशाची अशीच काही छान नाव आपल्या मराठी मुलांसाठी अर्थात बाळांसाठी आम्ही सुचवत आहोत. 

ADVERTISEMENT

गणपती विसर्जन मेसेज

नावेअर्थ
अर्हतसर्वांकडून आदर प्राप्त करणारा असा. गणपती ही अशी देवता आहे जिचा प्रत्येक जण आदर करतो.
विघ्नहरासर्वांची विघ्न दूर करणारा
योगधिपायोग आणि ध्यानधारणेची देवता
स्वरूपसौंदर्याची देवता आणि सत्यतेचा देव असा या नावाचा अर्थ होतो
तरूणकधीही म्हातारपण न येणारा. कायम तारूण्यात राहणारा
यशसकरमकायम नशीबवान ठरणारा
सुमुखकायम सुंदर दिसणारा. कधीही पाहिलं तर प्रसन्न दिसणारा असा चेहरा
रूद्रप्रियमभगवान शंकराला प्रिय असणारा असा
नंदनआनंद देणारी देवता अर्थात नंदन
महमसर्वात मोठा देव. महम म्हणजे सर्वात मोठा असणारा
हेरंबअतिशय शांतताप्रिय असा देव
हरिद्रसोन्यासारखी कांती असणारा देव. सर्व देवतांमध्ये गणेशाची कांती ही तेजस्वी आणि अप्रतिम मानली जाते.
गणेशगण + इश अर्थात गणेश
अजितकोणीही हरवू शकत नाही असा. कायम जिंकत राहणारा
किर्तीहे नाव मुलगा आणि मुलगी दोन्ही बाळांचं ठेवलं जाते. किर्ती अर्थात जगभरात वाहवा मिळवणारा
क्षिप्राहे नावदेखील मुलगा अथवा मुलीचे नाव ठेवण्यात येते. सर्व देवतांकडून कौतुक होणारा देवता असा या नावाचा अर्थ होतो
परूषकाहीही करण्याची क्षमता असणारी व्यक्ती
विघ्नराजेंद्रसर्व अडथळे पार करण्याची क्षमता असणारी देवता
मृत्युंजयमृत्युवर विजय मिळवणारा
ओमकारओम ध्वनी ज्याच्यापासून सुरू होतो
देवव्रतसर्व व्रतांचे सुखाचे फळ देणारा देव
अविघ्नविघ्नांपासून सुटका मिळवून देणारा
गजाननहत्तीमुख असणारी देवता
गुणीनसर्व गुणसंपन्न असा देव 
महेश्वरसर्व जगाचा स्वामी असणारा
Names Of Ganpati For Baby In Marathi


You Might Like This:

Royal Names From “V” With Meaning In Marathi

त वरून मुलांची नावे, रॉयल नावे अर्थासह

ADVERTISEMENT

स अक्षरावरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे अर्थासह (Baby Boy Names Starting With “S”)

व वरून मुलांची नावे, रॉयल नावे अर्थासह

जुळ्या मुलामुलींची नावे (Girl And Boy Twins Baby Name In Marathi)

क वरून मुलांची नावे, ठेवा युनिक आहे रॉयल नावे

ADVERTISEMENT
05 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT