प्रेमात पडणं खूप सोपं आहे पण ते निभावणं खूपच कठीण. हा अनुभव प्रेमात पडलेल्या प्रत्येकानेच घेतलेला असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात हा अनुभव कधी ना कधी येतोच किंवा येणार असतोच. प्रेमात पडणं खरं तर सोपं आहे. पण कायमस्वरूपी हे प्रेम सांभाळून ठेवणं अतिशय कठीण आहे. सांगणारे बरेचदा सांगतात की, नात्यांमध्ये अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. पण तरीही कोणत्याही नात्यामध्ये अपेक्षा येणं हे साहजिकच आहे आणि यामध्ये गैर काहीच नाही. कारण प्रत्येक मुलीला किंवा मुलाला आपल्या पार्टनरकडून प्रेम आणि काळजी याची अपेक्षा असते. पण यामध्ये जर आपल्या बॉयफ्रेंडने जराही दुर्लक्ष केलं तर ते आपल्याला सहन होत नाही. नातं कोणतंंही असो, प्रत्येक नात्यामध्ये अपेक्षा ही असतेच आणि ती पूर्ण करणंही गरजेचं असतं. बॉयफ्रेंड म्हणून नातं जपण्यासाठी तुम्ही जर काळजीत असाल की, आपल्या गर्लफ्रेंडला कसं मजेत आणि खुश ठेवायचं याचे काही सिक्रेट्स आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत. अगदी काहीच नाही तर निदान तिच्या चेहऱ्यावर तरी नक्कीच हसू येईल. आम्ही सांगितलेल्या या लव्ह टीप्स (love tips) तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. यामुळे तुम्ही होऊ शकता जगातले सर्वात बेस्ट बॉयफ्रेंड (best boyfriend) !! आणि डिअर गर्ल्स, तुम्हाला जर कळत नसेल की, तुमच्या बॉयफ्रेंडला याबाबत कसं सांगावं तर, तुम्ही नक्कीच या लव्ह टिप्स (Love Tips For Boyfriend) तुमच्या बॉयफ्रेंडला दिल्यानंतर नक्कीच फायदा होईल. तुमच्या बॉयफ्रेंडला “गाइड टु बिकम अ गुड बॉयफ्रेंड! (Guide To Become A Good Boyfriend)” नक्कीच मिळेल.
1. काळजीने वाढतं प्रेम
प्रत्येक मुलीची इच्छा असते की, तिचा पार्टनर (partner) तिची काळजी घेणारा असावा. तिच्या प्रत्येक लहानसहान गोष्टींची काळजी त्याने घ्यायला हवी. तुम्ही जर मुलींचा त्रास अर्थात टेन्शन कमी करू शकत असाल, तर त्या तुमच्याशी जास्त चांगल्या तऱ्हेने मनाने जोडल्या जातात. तुम्ही त्यांचा त्रास कमी करण्यासाठी योग्य उपाय शोधून काढलात तर तुमचं नातं अधिक दृढ होण्यास मदत होते. तुम्ही जर कुठे चुकत असाल तर तुम्हाला तुमच्या प्रेयसीकडून अर्थातच वॉर्निंग सिग्नल्स मिळायला सुरुवात होते. त्यामुळे ही गोष्ट अगदीच मनावर घ्या नाहीतर तुमचं नातं लवकरच तुटेल हे समजून जा. शिवाय हेदेखील लक्षात ठेवा की, काळजी ही अतिकाळजीमध्ये कधीही बदलू देऊ नका. पण जर तुम्ही तिची काळजी घेतली नाही तर तिच्या दृष्टीने या नात्याला कोणताही अर्थ उरत नाही हे नेहमी प्रत्येक बॉयफ्रेंडने अथवा नवऱ्याने लक्षात घ्यायला हवं.
सर्वोत्तम मद्यपान खेळांबद्दल देखील वाचा
2. नेहमी आदर ठेवा
प्रत्येक मुलीला आपल्या आयुष्यातील मुलाने आपला आदर करावा हे वाटतंच आणि खरंतर प्रत्येक नात्यामध्ये आदर असणं गरजेचं असतं. त्यासाठी अगदी साध्यासाध्या गोष्टीदेखील तुम्ही करू शकता.
उदाहरणार्थ – तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये दोघंजण एकत्र गेल्यावर तुमच्या गर्लफ्रेंड अथवा बायकोसाठी स्वतः बसण्यापूर्वी तिला खुर्ची मागे करून नीट व्यवस्थित बसवा आणि ऑर्डर देण्यापूर्वी तिची आवड काय आहे हे नक्की विचारा. तिला न विचारता काहीही ऑर्डर देऊ नका. कार अथवा अगदी टॅक्सीमध्ये बसण्यापूर्वीही दरवाजा उघडून तिला पहिले आदराने आतमध्ये बसवा. काहीही महत्त्वाचं काम करण्यापूर्वी तिचा सल्ला नक्की घ्या. या लहानसहान गोष्टींमुळे ती नेहमी खुश राहते आणि तुमच्या आयुष्यात तिला जास्त महत्त्व आहे हे तिला जाणवतं. शिवाय आपल्या आयुष्यात असलेल्या मुलाला स्त्री चा योग्य मान राखता येतो याबद्दलही तिला आदर आणि प्रेम वाटतं.
3. ऐकणंदेखील आवश्यक
अधिकतर मुलींना बोलायला खूप आवडतं, बऱ्याच मुली तुमच्याशी दिवसभर बोलू शकतात. अर्थात केवळ बोलायलाच नाही तर त्यांना ऐकायलादेखील आवडतं. त्या बोलतील न कंटाळता तुम्हाला ऐकून घ्यायला हवं. शिवाय जेव्हा ती म्हणते तेव्हादेखील तुम्ही तिच्याबद्दल बोलायला हवं. तिच्याशी गोष्टी शेअर करायला हव्यात. तुम्हाला जर तुमच्या आवडत्या मुलीच्या मनामध्ये कायमस्वरुपी स्थान मिळवायचं असेल तर तिच्या आयुष्यातील टेन्शन्स, मित्र-मैत्रिणींच्या गोष्टी, शॉपिंग लिस्ट, इतर सगळ्या लहानसहान गोष्टीदेखील ऐकून घ्यायची सवय लावून घ्या. इतकंच नाही तर, तिच्याशी मध्येमध्ये रोमँटिक बोलणंही गरजेचं आहे. कारण रोमान्सने तुमचं नातं अधिक घट्ट होत असतं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा आणि जेव्हा तिला या भावना व्यक्त करायच्या असतात तेव्हा दोन्ही वेळा या भावनेमध्ये समरस व्हा. तरच तुमचं नातं अतिशय दृढ बनेल.
वाचा – प्रेम करता? घरी सांगायचय? तुमच्यासाठी खास टीप्स
4. प्रेम व्यक्त करायला शिका
तुम्ही जर एखाद्यावर प्रेम करत आहात, तर वेळोवेळी ते व्यक्त करायला शिका. नात्यामध्ये प्रेम व्यक्त करणं अतिशय गरजेचं आहे. हे प्रेम तुम्ही समोरासमोर व्यक्त करा किंवा अगदी सोशल मीडियावर (social media) सर्वांसमोर. फेसबुक किंवा इन्स्टाग्राम पोस्ट किंवा अगदी व्हॉट्सअपचा स्टेटस तुम्ही तिच्याबद्दल लिहिलंत आणि तिच्याबद्दल प्रेम व्यक्त केलंत तर तिला प्रचंड आनंद होतो. समोरची व्यक्ती आपल्यावर इतकं प्रेम करते की, सर्वांसमोर हे प्रेम व्यक्त करायला त्याला लाज वाटत नाही हे तिच्या मनात पक्कं होतं आणि त्यामुळे ती तुमच्या अधिक प्रेमात पडते आणि अधिक जवळ येते. तुमची गर्लफ्रेंड वा बायको नेहमी तुम्हाला आनंदी हवी असेल तर वेळोवेळी तिच्यावरच्या प्रेमाची कबुली तुम्हाला द्यायला हवी. तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीतून तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करायला हवं. मग ते बोलून असो वा अशा लहानसहान गोष्टी करून असो. तिच्यासाठी तुम्ही तिच्याबद्दल विचार करता हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. कोणत्याही गिफ्टपेक्षा तुमच्या आयुष्यात ती महत्त्वाची आहे ही जाणीव तिला जास्त सुखावून जाते. कोणत्याही मुलीला आपलं नातं लपवून ठेवायला नाही आवडत. त्यामुळे तुम्ही तिला आवडता हे जगजाहीर केल्यानंतर तिला जास्त बरं वाटतं.
5. कपाळावरील एका किसमुळे होते कमाल
तुम्हाला वेळोवेळी जर आपल्या गर्लफ्रेंडवर प्रेम असल्याचं सांगत असाल, तर तुम्ही जगातले सर्वात चांगले बॉयफ्रेंड आहात. प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे तिच्या कपाळावर किस घेणं अर्थात फोरहेड किस (forehead kiss). फोरहेड किसमुळे मुलींचा आत्मविश्वास वाढतोच पण त्यांना हेदेखील जाणवतं की, या जगात तुम्हीच आहात, जे त्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करत आहात. काहीच नाही तर हा पर्यायाचा नक्कीच एकदा अनुभव घेऊन पाहा. नेहमीपेक्षा तुम्हाला तुमची गर्लफ्रेंड जास्त आनंदी दिसेल. कारण तुम्ही तिच्याबरोबर कायम आहात हा विश्वास तिला या एका किसमधून जाणवतो.
6. तुमचा भूतकाळ कधीही लपवू नका
बऱ्याचदा आपल्या वर्मानातील गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला भूतकाळापासून दूर ठेवलेलं आपण ऐकलं आहे. पण ही सर्वात मोठी चूक आहे. आपला भविष्यकाळ जर योग्य हवा असेल तर आपल्या गर्लफ्रेंडला आपला भूतकाळ नक्की सांगा. तिच्यापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेऊ नका. कोणत्याही कारणाने तुम्हाला जर आपल्या भूतकाळातील गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंडला फोन करायचा असेल किंवा भेटायचं असेल तर तुम्ही आताच्या गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंडला याबद्दल माहिती करून द्यायला हवी. त्यामुळे तुम्ही एकमेकांवर कधीही संशय घेणार नाही. तुमचा एकमेकांवर योग्य विश्वास राहून नातं अधिक मजबूत व्हायला मदत होईल. शक्यतो आपल्या भूतकाळातील कोणत्याही व्यक्तीला भेटायला लागू नये हाच प्रयत्न करा. पण तसं नाही झालं आणि काही कारणाने भेटावं लागलं तर त्याबद्दल नक्कीच एकमेकांना माहीत असणं आवश्यक आहे.
वाचा – बॉयफ्रेंडला प्रपोज करण्याचे ‘हे’ हटके प्रकार तुम्ही पाहिलेत का
7. शॉपिंगसाठी वेळ काढा
बऱ्याच मुलींसाठी शॉपिंग म्हणजे स्ट्रेसबस्टर (stressbuster). त्यांच्या आयुष्यात त्यांच्या महत्त्वाच्या कामात तुम्ही सहभागी झालात तर त्याच्याइतका आनंद मुलींना नसतो. शिवाय शॉपिंग करताना तुम्हाला तिच्या आवडीनिवडीबाबतही चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एकमेकांबरोबर खूप चांगला वेळ या निमित्ताने घालवू शकता. शॉपिंग करताना तिला काय चांगलं दिसतं किंवा चांगलं दिसत नाही हे तुम्ही स्वतःहून सांगितल्यास तिला अजून आनंद होतो. त्यामुळे तिला नक्की काय सूट होत आहे हे तुम्ही तिला नेहमी शॉपिंग करताना सांगा. कारण ती सर्वात जास्त तुमच्यासाठी छान दिसण्याचा प्रयत्न करत असते.
8. फ्लर्टिंगची सवय सोडून द्या
बॉईज तुमच्या आयुष्यात आता तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी मुलगी जर आली असेल आणि तुम्ही जर कमिटेड (commited) असाल तर प्लीज फ्लर्टिंगची (flirting) सवय सोडून द्यायचा नक्की प्रयत्न करा. लव्ह टीप्सनुसार, फ्लर्ट न करतादेखील तुम्ही एक चार्मिंग बॉय नक्कीच बनू शकता. तुम्ही एखाद्याशी कोणत्याही भावनांशी न खेळता हेल्दी फ्लर्टिंग करत असाल तर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला नक्की याबद्दल सांगा. कारण तसं न केल्यास, तुमची मिनिटभरासाठी तर नक्कीच मजा होईल पण त्याची सजा जन्मभर भोगावी लागेल.
प्रियकरासाठी रोमँटिक मादक संदेश देखील वाचा
9. तिला नेहमी स्पेशल असल्याचं जाणवू द्या
कधी मुव्ही डेट (movie date) तर कधी लंच वा डिनर किंवा कधीतरी अगदीच धावती ट्रीप किंवा रिसॉर्टमध्ये बुकिंग…कधीतरी घरी अचानक एकत्र राहण्याचा प्लॅन किंवा अचानक कधीतरी तिच्या ऑफिसमध्ये तिला सरप्राईज गिफ्ट पाठवणं असे लहानसहान गिफ्ट्स किंवा सरप्राईज मुलींंना नेहमीच इम्प्रेस करत असतात. प्रत्येक मुलीला तिला स्पेशल असल्याचं जाणवू दिलं तर तिला आनंदच होतो. तुमच्या आयुष्यात ती एक महत्त्वाचा भाग आहे याची जाणीव तिला या सर्व तुमच्या वागण्यामुळे होत असते. त्यामुळे तिला खुश ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. ती आनंदी राहिली तर तुम्हाला दुप्पट आनंद मिळेल हे लक्षात ठेवा.
वाचा – एखाद्या मुलाला जाणून घेण्यासाठी हे ‘160’ प्रश्न नक्की विचारा
10. असूया ठीक आहे पण शंका नका घेऊ
तुमची गर्लफ्रेंड एखाद्या मुलाबरोबर जर बोलत असेल किंवा तिची चांगली मैत्री असेल तर त्या मुलाबद्दल असूया असणं ठीक आहे. पण कधीही शंका अथवा संशय घेऊ नका. कारण ही असूया संशयात बदलायला वेळ लागत नाही. कोणतंही नातं हे विश्वासाच्या पायावर उभं असतं. त्यामुळे एकमेकांवर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाला तडा जाईल असं दोघांनाही वागू नका. काही वाटत असेलच तर एकमेकांशी मोकळ्या मनाने बोला. कारण दोघांनीही मनात काहीही ठेवल्यास, त्याचा पुढे नात्यामध्ये त्रास होतो.
11. सरप्राईज द्यायला विसरु नका
जेव्हा लव्ह टीप्स फॉर बॉयफ्रेंड (Love Tips For Boyfriend) बद्दल आपण बोलत आहोत, तेव्हा सरप्राईज हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. ही गोष्ट तुम्हाला वाटेल की, किती जुनी आहे. पण हीच गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. जादूचे ते तीन शब्द कमाल करतात. वेळोवेळी तिला ‘आय लव्ह यू’ (I Love You) नक्की म्हणा. तुम्ही जेव्हा तिला आय लव्ह यू म्हणता तेव्हा तिला खूप बरं वाटत असतं. आपण त्याच्यासाठी खास आहोत हे तिला जाणवत राहतं. शिवाय ती सिक्युअर फील करते. कधीतरी कामात असताना तिला सहज फोन करून आठवण आली आणि आय लव्ह यू म्हणावं वाटलं असंही करा आणि बघा ती आनंदी होईल. तुमचं हे एक सरप्राईज फक्त तिच्यावर प्रेम व्यक्त केल्याने तुमचा आणि तिचा दोघांचाही दिवस अप्रतिम जाईल.
12. मित्रांना भेटवत असल्यास, लक्ष द्या
जेव्हा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला आपल्या मित्रांची ओळख करून देत असता तेव्हा ती तुमची गर्लफ्रेंड आहे अशीच ओळख करून द्या. ती तुमच्यासाठी स्पेशल आहे हे तुमच्या जवळच्या मित्रांना माहीत असायला हवे. त्यामुळे कदाचित तुमचे मित्र नाव विसरतील पण ती तुमच्या आयुष्यात खास आहे हे नक्कीच त्यांच्या लक्षात राहील. शिवाय तुम्ही तिची अशी ओळख करून दिल्यामुळे तिच्या नजरेतही तुमच्याबद्दल तिचा आदर वाढेल.
13. कुटुंबासमोर बना खास
तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला तिचे मित्रमैत्रिणी अथवा कुटुंबाला भेटायला घेऊन जात असेल तर त्यांच्यासमोर अतिशय चांगलं वागण्याचा नेहमी प्रयत्न करा. कदाचित लगेच तुम्हालाही त्यांच्यासमोर कम्फर्टेबल नाही वाटणार, पण तुमच्याकडून जास्तीत जास्त चांगला प्रयत्न करा. तिच्या घरच्यांनी अथवा मित्रमैत्रिणींनी तुमची स्तुती केली तर सर्वात जास्त आनंद तिलाच होतो आणि हे तेव्हाच शक्य होऊ शकेल जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर तुमचं वागणं अतिशय चांगलं ठेवाल.
वाचा – ब्रेकअपवर अशी करा मात
14. थोडी स्पेस गरजेची
आजकलच्या मॉडर्न (modern) आणि व्यस्त लाईफस्टाइल (lifestyle) मध्ये कायमस्वरुपी एकत्र राहणं गरजेचं नसते. त्यामुळे थोडीशी स्पेस देणंही महत्त्वाचं असतं. त्यामुळे तिला तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवायचा असेल किंवा घरी राहायचं असेल तर तिला ती स्पेस द्या. सतत तिला कॉल वा मेसेज करून तिच्यावर संशय घेऊ नका. तिला तुम्ही मिस करत असाल हे नक्की पण ते सारखे मेसेज करून नका जाणवू देऊ. पण म्हणून तिला मेसेज अथवा कॉलच करायचा नाही असंही करू नका. योग्य स्पेस द्या आणि वेळोवेळी मेसेज करून ती व्यवस्थित स्वतःची काळजी घेत आहे की नाही याचीदेखील माहिती घ्या. त्यामुळे तुम्ही तिच्याकडे लक्ष देत नाही असंही तिला वाटणार नाही.
15. स्वतःची स्टाईल बदला
बऱ्याच मुलांना आपला वॉर्डरोब (wardrobe) आणि स्टाईल (style) याकडे अजिबातच लक्ष देत नाहीत. जेव्हा तुम्ही सिंगल असता तेव्हा काहीही कॉम्बिनेशन चालतं. पण आता तुमच्या आयुष्यात जेव्हा खास माणूस येतं तेव्हा काही खास क्षणी तुमचे कपडेदेखील स्पेशल असायला हवे. याकडे नक्की लक्ष द्या. तुम्ही जर तिच्याबरोबर डिनर डेटला किंवा दिवसभर डेटसाठी जात असाल, तर तिला आवडणाऱ्या रंगाचे किंवा तिला आवडतील असे कपडे घाला. तिला जास्तीत जास्त इंप्रेस करता येईल याकडे लक्ष द्या.
16. प्रेमासह पाठिंबाही महत्त्वाचा
प्रत्येक मुलीला वाटत असतं की, ती ज्या मुलावर प्रेम करत आहे, त्याने प्रेमाबरोबरच तिच्या प्रगतीमध्ये साथ द्यावी. पाठिंबा द्यावा. तुम्हाला तिच्याबरोबर आयुष्य घालवायचं असेल आणि ती कोणतीही गोष्ट योग्य वा चुकीची करत असेल तर तिला वेळोवेळी याची जाणीव करून द्या. चुकीचं करत असताना तिला योग्य तऱ्हेने समजावून तिची चूक लक्षात आणून द्या. तुमच्या या छोट्या छोट्या गोष्टी तिचं मन नक्कीच जिंकून घेतील.
प्रेमाच्या या नात्यासाठी अर्थातच कोणते निश्चित असे नियम नाहीत. हे तुमचा समंजसपणा आणि मॅच्युरिटीवर नातं टिकतं. पण समोरचा खूपच समंजस आहे तर त्याला पिळवटून घेणं हे प्रेम नाही. त्याला गृहीत धरणं हे प्रेम नाही. नातं कोणतंही असो दोघांनी एकत्र आनंदी राहणं गरजेचं आहे. तरच तुम्ही एकमेकांबरोबर प्रेमात राहू शकता. त्यामुळे जर तुम्हाला एकमेकांबरोबर कायम राहायचं असेल तर परफेक्ट बनणं आवश्यक नाही एकमेकांना समजून घेत एकमेकांना साथ देणं जास्त गरजेचं आहे आणि त्यामुळेच तुमचं नातं योग्य प्रकारे टिकून राहू शकेल. तुम्हाला जर असं परफेक्ट बॉयफ्रेंड व्हायचं असेल तर या गोष्टी करायला नक्की विसरू नका.
You might like this: