एखादी मालिका नव्याने येणार असली की, त्याची उत्सुकता फारच शीगेला पोहोचलेली असते. पहिल्या काही प्रोमोजमध्येच ही मालिका काय असणार याचा अंदाज प्रेक्षकांना लागतो. साधारणपणे या मालिकेच्या नावावारुनच याचा अंदाज खूप जण काढतात. पण आता एका मालिकेने सगळ्यांना वेड लावून सोडलंय ती मालिका म्हणजे ‘मन झालं बाजिंद’ मालिकेच्या प्रोमोवरुन ही एखादी प्रेमकहाणी असू शकते. यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण याचा अर्थ काय यासाठी खूप जण गुगलचा आधार घेत आहे असे देखील दिसून आले आहे. तुम्हाला बाजिंद या शब्दाचा खरा अर्थ माहीत आहे का?जाणून घेऊया याचा अर्थ
खतरों के खिलाडीमध्ये टीव्हीवरील आदर्श सून करतेय जबरदस्त स्टंट
मन झालं बाजिंद
गुगलवर मोस्ट सर्च वर्डमध्ये गेल्यानंतर बाजिंद या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी खूप जण उत्सुक असल्याचे देखील सांगितले जात आहे. गुगल ट्रेंडमध्ये या गोष्टी दिसून आल्या आहेत. मालिका सुरु झाल्यानंतर ज्या ज्यावेळी हा प्रोमो लागतो त्या त्या वेळी प्रेक्षक या शब्दाचा अर्थ शोधतात. त्यामुळे साहजिकच संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री सगळ्या मालिकेपर्यंत हा सर्च जोरदार सुरु असतो. त्यानंतर तो कमी देखील होतो. मराठीतील अनेक मालिका फारच प्रसिद्ध आहे. वेगळ्या कथानकामुळे अमराठी लोकांनाही मराठी मालिका अधिक प्रिय वाटतात. म्हणूनच बाजिंद म्हणजे काय? बाजिंद Meaning in marathi, बाजिंद अर्थ मराठी असे काही सर्चमध्ये वरच्या पायरीवर दिसून येत आहे.
विकी कौशलचा बदलला लुक, आगामी चित्रपटासाठी केले ट्रान्सफॉर्मेशन
हा आहे बाजिंदचा अर्थ
आता ज्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी जी गडबड सुरु आहे. त्या बाजिंद या शब्दाचा अर्थ मालिकेमध्ये जिद्दी, मेहनती असा दाखवण्यात आला आहे. ही मालिका राया आणि कृष्णाची कहाणी आहे. पांढऱ्या शुभ्र कपड्यात दोघे दाखवण्या मागचा अर्थ ही .त्यांचा स्वच्छ स्वभाव आहे. राया हा अत्यंत गुणी असा व्यवसायिक असून तो लोकांना धरुन आणि त्यांचा मान राखून आपला व्यवसाय सांभाळत आहे. तर कृष्णा ही अतिशय हुशार असून तिला सी.ए. व्हायचं आहे. मामा-मामींकडे लाडात वाढलेली ही कृष्णा ही देखील मेहनती दाखवण्यात आली आहे. एरव्ही प्रेमासाठी गुलाबाची फुलं दाखवण्यात येतात. पण राया आणि कृष्णा हे चक्क झेंडूच्या फुलांत पडताना दिसत आहे. यामागेही एक कारण सांगितले जाते. आपल्याकडे झेंडूचे फुल हे सणाचे प्रतिक मानतात. त्याचा पिवळा रंग हा बुद्धीचे प्रतिक आहे. त्यामुळेच याचा वापर करण्यत आला आहे.
मालिका लवकरच येणार भेटीला
झी मराठीवरील अनेक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. नव्या मालिकांचे प्रोमोही यायला सुरुवात झाली आहे ‘ती परत आलीेये’, ‘मन झालं बाजिंद’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवंय’, आणि ‘तुझी माझी रेशीमगाठ’ अशा चार मालिका भेटीला येणार आहेत. आता कोणती मालिका कधी कधी सुरु होईल आणि कोणती मालिका निरोप घेईल हे अद्याप तितकेसे स्पष्ट नाही. पण या नव्या मालिका नक्कीच प्रेक्षक पसंतीला उतरतील याात काहीही शंका नाही.
दरम्यान, आता बाजिंद या शब्दाचा अर्थ तुम्हालाही कळला असेल अशी अपेक्षा