आजकाल ऑनलाईन प्रेम जुळणं हे सहज शक्य आहे. अनेक Couples आजकाल थेट भेटण्याआधी अॅपवर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटतात. मग त्यांना एकमेंकात interest वाटला तर डेटवर जातात. बरेचदा ऑनलाईन डेटिंगचा वाईट अनुभव अनेकांना आला असेल पण काही #MyStory ज याला अपवादही असतात.
खरंतर एका वाईट ब्रेकअपमधून बाहेर पडल्यानंतर मला पुन्हा प्रेमात पडण्याची इच्छाच नव्हती. त्या भावनिक अनुभवाने मी इतकी तुटले होते की, पुन्हा कोण्याच्याही प्रेमात किंवा रिलेशनशिपमध्ये मला अजिबात पडायचं नव्हतं. पण तरीही फावल्या वेळात मी एक्स बॉयफ्रेंडचे व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावरचे फोटोज पाहत असे. त्याचं प्रत्येक अपडेट मी अजूनही फॉलो करत होते. मला ती वाईट सवयच लागली होती जणू. त्यामुळे मला हे जाणून घ्यायचं होतं की, तो माझ्याशिवाय आयुष्याशी कसं डील करतोय. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो अगदी व्यवस्थित दिसत होता. निदान त्याच्या सोशल मीडिया अपडेट्सवरून तरी असंच वाटतं होतं. त्याच्या मित्रांकडूनही कळलं होतं की, तो मूव्हऑन झाला असून त्याच्या आयुष्यात नवीन गर्लफ्रेंडसुद्धा आली आहे. तेव्हा मला कळून चुकलं की, आता मलाही पुढचं पाऊल उचलून यातून बाहेर पडायला हवं.
Canva
बदलासाठी मनाची तयारी
मी माझ्यात बदल घडवायचं ठरवलं. मी निर्धार केला की, आता बस्स… भूतकाळाचा विचार सोडून द्यायचा आणि मी स्वतःला डेटींगमध्ये ढकलंल. त्या क्षणी मी tinder डाऊनलोड केलं. माझा प्रयत्न प्रेमात पडण्याचा किंवा रिबाऊंड होण्याचा नव्हता. मला फक्त माझं लक्ष दुसरीकडे वळवायचं होतं. जेव्हा जेव्हा मी लेफ्ट किंवा राईट स्वॅप करायचे. तेव्हा मी त्या प्रत्येकाला माझ्या एक्सशी कंपेअर करत होते. मी desparately एका चांगल्या मुलाच्या शोधात होते. पण माझं नशीब काही त्या अॅपवर फळफळलं नाही. मग मी ते डिलीट करायचं ठरवलं. मी ते अॅप डिलीट करणार तेव्हाच मला एका कुणाला नावाच्या मुलाचा मेसेज आला. मी त्याचा फोटो झूम करून पाहिला. मी त्याची प्रोफाईल पाहिली मला तो चांगला वाटला. त्याचे केस कुरळे होते, ओठही चांगले होते आणि त्याने त्याची bio ही चांगली लिहीली होती. मला त्याची प्रोफाईल खूपच attractive वाटली आणि मला त्याच्याबाबत अजून जाणून घ्यायचं होतं. आमचं पहिलं conversation चांगलं झालं. मला कळलं की, त्यालाही फिरायला खूप आवडतं. त्याचं intelligent mind मला आवडलं. तो अंधेरीतल्या एका स्टार्टअपमध्ये graphic designer होता. त्याच्याशी चॅट केल्यावर मी टिंडर डिलीट न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही रोज एकमेकांशी तासंतास चॅट करायचो. त्या संवादाने मला पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये असल्यास फिलींग दिलं.
आमची पहिली भेट
एका दिवशी त्याने मला भेटण्याबद्दल विचारलं. हे वाचून तर मला गुदगुदल्याच होऊ लागल्या. मी कधीही असं कोणाला पर्सनली न ओळखता डेटवर गेले नव्हते. मला त्याची रिक्वेस्ट रिजेक्ट करायची होती. पण एकीकडे मनात माझ्या एक्स रिेलेशनशिपमधून मला मूव्ह ऑनही व्हायचं होतं. मी त्याला date फिक्स करायला सांगितली आणि त्याचा सेल नंबर शेअर करायला सांगितला. तो फक्त एवढंच म्हणाला, मला उद्या Carter Road ब्रांदाला 7 वाजता भेट. प्लीज उशीर करू नकोस.
पुढच्या दिवशी मला उठल्यावर एकदम फ्रेश वाटत होतं. एकाच वेळी मला त्या भेटीबाबत excited आणि nervous वाटत होतं. माझं काम झाल्यावर मी घरातून बाहेर पडले. मी माझा ब्रेस्ट ड्रेस घातला आणि त्या ठिकाणी वेळेत पोचण्यासाठी घाईत होते. मी कार्टर रोडला बरोबर 6:50 पोचले आणि त्याला कॉल केला. मी पहिल्यांदाच त्याचा आवाज फोनवर ऐकला. त्याचा आवाज खूपच soft होता आणि बोलताना थोडासा foreign accent सुद्धा जाणवत होता. तो म्हणाला की, मी पाचच मिनिटात तिथे पोचतोय. त्या पाच मिनिटात माझ्या मनात अनेक चांगले वाईट विचार येऊन गेले. तो कसा असेल, त्याची माझी भेट कशी होईल, त्याला मी आवडेन का असं अनेक प्रश्न मनात निर्माण झाले होते. दहा मिनिटं गेली तरी कोणीच दिसेना. मी त्याला कॉल करणार एवढ्यातच मला पाठून कोणीतरी घट्ट मिठी मारली. तो कुणाल होता.
Shutterstock
तो दिसायला इतका perfect होता आणि त्याने उशीर झाल्याबद्दल माझी माफी मागितली. माझी नजर त्याच्यावरून हटतच नव्हती आणि त्याचीही माझ्यावरून. आमच्यामध्ये मला instant chemistry जाणवली. मी त्याला विचारलं आता कुठे जायचं. तेव्हा त्याने समोरील CCD कडे बोट दाखवलं. मी म्हटलं, Coffee?, त्याने मान हलवली.
कॉफी पिता पिता आम्ही एकमेकांच्या past रिलेशनशिप्स, आमचं प्रोफेशन आणि आमच्या आवडीनिवडी याबाबत गप्पा मारल्या. आमच्या गप्पा एवढ्या रंगल्या होत्या की, मला आम्ही mentally connected असल्याचं जाणवलं. तो मधेमधे जोक्सही crack करत होता. त्या दोन तासांच्या coffee date मध्ये मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडला अगदी विसरून गेले होते. बदल म्हणून माझ्याशी कोणीतरी चांगल वागत होतं. रोमँटीक नाही पण मी त्याची कंपनी एन्जॉय करत होते. मला कळलं होतं की, आपल्या मनात एक्सबद्दल कितीही भावना असल्या तरी कोणीतरी त्याहून चांगल आपल्या आयुष्यात येऊ शकतं.
त्या डेटनंतर आम्ही बरेचदा भेटलो आणि डिनर किंवा मूव्हीला एकत्र गेलो. आता आमच्या नात्याला 7 महिने झाले आहेत आणि त्याच्यासाठी मनात feelings ही निर्माण झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याने मला प्रपोज केलं. खरं सांगायचं तर मी थोडीशी nervous होते. मी तो प्रपोजल टॉपिक वारंवार टाळत होते. तसंच मनात शंकाही होती की, मी पुन्हा रिलेशनशिपमध्ये पडावं की नाही किंवा मग काही महिन्यानंतर नाही म्हणण्याबद्दल पश्चाताप करून घ्याला. अजूनही मी confused आहे. काय करावं, मला मदत कराल का?
हेही वाचा –
#MyStory: तो मला सेक्ससाठी ब्लॅकमेल करत होता…
#MyStory: Birthday च्या दिवशी आलेला त्याचा मेसेज पाहून मला धक्काच बसला