आज शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. कोरोना काळापासून थोडे दूर जात सणांचा आनंद घेण्याची वेळ सुरु झालेली आहे. नवरात्रीचे नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते. यंदा 7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सव सुरुवात झाली आहे. नवरात्रीचे नऊ दिवस देवीची सेवा करताना तिला वेगवगेगळ्या रंगाची वस्त्रे परिधान केली जातात. नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाचा मान दिला जातो. अगदी तसाच 9 दिवस वेगवेगळे नैवेद्य देवीला दाखवला जातो. नऊरात्रीच्या या 9 दिवसांसाठी जर तुम्ही खास नैवेद्य बनववण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे 9 शुभ नैवेद्याचे प्रकार. नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन तुम्ही हा सण साजरा करु शकता
नवरात्रीची महत्त्वपूर्ण माहिती
शुभ नैवेद्य-1
खीर- देवीला पहिल्या दिवशी जो गोडाचा नैवेद्य दिला जातो. तो दूधापासून तयार केलेली खीर आहे. दूध हे पूर्णान्न आहे. या दूधाला आटवून खीर तयार केली जाते. दूधाची चव अधिक वाढवण्यासाठी त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घातले जाते. यामध्ये तांदूळ किंवा खीर देखील घातली जाते. त्यामुळे पहिल्या दिवशी तु्म्ही खीरीचा शुभ नैवेद्य दाखवू शकता.
शुभ नैवेद्य 2
गोड शिरा- रवा,दूध आणि तूप यांचा वापर करुन तुम्ही रव्याचा गोड शिरा हा पदार्थ देखील देवीला दाखवला जातो. अनेकदा पूजाविधीमध्ये रव्याच्या शिऱ्याला मान दिला जातो. आपल्याकडे वेगेवेगळ्या पद्धतीचे शिरा बनवला जातो. मुगाचा, गव्हाचा असा शिरा बनवला जातो. हा शिरा तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. दुसऱ्या दिवशी हा तुम्ही नैवेद्य दाखवायला काहीच हरकत नाही
शुभ नैवेद्य 3
पुरणपोळी- काही खास सणांसाठी आपल्याकडे पुरणपोळी करण्याची पद्धत आहे. चण्याची डाळ, गूळ याच्या मदतीने तुम्हाला नक्कीच हा नैवेद्य करता येऊ शकतो. पुरणपोळी हा असा गोड पदार्थ आहे जो सगळ्यांना खाता येऊ शकतो. देवीलाही तो अर्पण केला जातो. पुरणपोळी त्यावर मस्त तूप असा हा नैवेद्य करताना फार मेहनत घेतली जाते ज्यामुळे या पदार्थाची चव आणखी वाढते
शुभ नैवेद्य 4
मालपुआ- मालपुआ हा असा गोड पदार्थ आहे जो खूप लहानमुलांच्या आवडीचा आहे. पूर्वीच्या काळी मिठाई किंवा असे गोड पदार्थ मुळीच नव्हते. अशावेळी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हा पदार्थ करता येतो. गव्हाचे पीठ, गूळ याच्या मदतीने तुम्हाला हा पदार्थ करता येतो. मालपुआसोबत वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. पण तुम्ही मालपुआ हा सोपा गरम गरम पदार्थ बनवून देवीला अर्पण करु शकता.
शुभ नैवेद्य 5
गोड बुंदी – प्रसाद म्हटले की शेव बुंदी हा प्रकार अगदी आवर्जून खाल्ला जातो. देवीला गोड बुंदीचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता. जर तुम्हाला खारट बुंदी द्यायची असेल तर तुम्ही त्यामध्ये दही घालून देखील हा नैवेद्य देऊ शकता. आता गोड बुंदी आणि खारी बुंदी असा नैवेद्य देऊ शकता.
शुभ नैवेद्य 6
घेवर – तूपाचा जास्तीत जास्त वापर करुन जो गोडाचा पदार्थ बनवला जातो त्याला घेवर असे म्हणतात. घेवर बनवण्याचे काम हे सोपे नसते. त्यासाठी बरीच मेहनत लागते. जाळीदार आणि खुशखुशीत असा हा घेवरचा प्रकार तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून देऊ शकता.
शुभ नैवेद्य 7
मिठाई- देवीला अर्पण करण्यासाठी मिठाई हा प्रकारही आहे. पिवळया रंगाचे पेेढे हे देखील यामध्ये शुभ नैवेद्याचा प्रकार मानला जातो. दूध आणि साखर यांचा उपयोग करु हा पदार्थ केला जातो. जो अतिशय प्रिय अस पदार्थ आहे.
शुभ नैवेद्य 8
फळ – आरोग्यासाठी लाभदायक अशी फळ ही देखील देवीसाठी उत्तम असा प्रसाद आहे. देवीला अर्पण करण्यासाठी तुम्ही कोणत्याही फळांचा नैवेद्य दाखवू शकता. सफरचंद, केळी, चिकू, पेरु अशी कोणतीही फळं तुम्ही देवीला देऊ शकता.
शुभ नैवेद्य 9
गुळ-चणे हा नैवेद्य देखील देवीला अर्पण करण्यासाठी एक उत्तम असा प्रसादाचा प्रकार आहे जो तुम्ही देवीला देवी शकता. यामध्ये कुरमुरे घालूनही तुम्हाला देता येतात. चणे- गुळामुळे शक्ती मिळण्यास मदत मिळते. ड्रायफ्रुट्ससारखीच उर्जा देण्यासाठी हा नैवेद्य उत्तम आहे.
आता नवरात्रीच्या 9 दिवसात तुम्ही यापैकी अगदी कोणताही नैवेद्य दाखवू शकता.