ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
sequin saree

सिक्वेन साडी नेसताना टाळा या चुका, दिसाल अधिक आकर्षक

सिक्वेन साडीचा (sequin saree) ट्रेंड सध्या चालू आहे. तुम्हाला जर कोणत्याही कार्यक्रमात वेगळा साडी लुक हवा असेल आणि अधिक आकर्षक लुक हवा असेल तर तुमच्यासाठी सिक्वेन साडी हा एक उत्तम पर्याय आहे. पण तुम्ही सिक्वेन साडी नेसणार असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सिक्वेन साडी नेसत असताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात अथवा कोणत्या चुका टाळायला हव्यात जेणेकरून तुम्ही अधिक आकर्षक दिसाल याबाबत आम्ही तुम्हाला या लेखामधून सांगणार आहोत. कारण या लहानसहान चुका तुमचा लुक खराब करू शकता. तुम्हालाही सेलिब्रिटीप्रमाणे सिक्वेन साडी लुक हवा असेल तर आम्ही सांगितलेल्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा.

साधा ब्लाऊज (Simple Blouse)

सिक्वेन साडी ही दिसायला अतिशय सुंदर, अत्यंत ब्राईट आणि ग्लिटरी (Bright and Glittery) असते. सिक्वेन साडीला शिमरी साडी असेही म्हटले जाते. लग्नाच्या रिसेप्शनला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसल्या जातात. तुम्ही जर कोणत्याही कार्यक्रमाला अथवा लग्नाच्या रिसेप्शनला सिक्वेन साडी नेसणार असाल, तर तुम्हाला यावर साधा कॉटन अथवा पॉलिस्टरचा ब्लाऊज अजिबातच घालणं योग्य नाही. यामुळे तुमची साडी अतिशय निस्तेज दिसेल. सिक्वेल साडी इतकी शिमरी असते त्यामुळे त्यावर साधा ब्लाऊज घालणं योग्य ठरेल का याचा तुम्हीच एकदा नीट विचार करा. त्यामुळे सिक्वेन साडीवर नेहमी सिक्वेन ब्लाऊजच तुम्ही मॅचिंग करा. हा ब्लाऊज तुमच्या साडीला परफेक्ट लुक देईल. तसंच तुम्ही एखादा डिझाईनर ब्लाऊजदेखील यावर घालू शकता. तुम्हाला व्हेरिएशन ट्राय करायचं असल्यास खणाचे ब्लाऊज ही घालून पाहा.

भरजरी दागिने (Heavy Jewellery)

Instagram

तुम्ही सिक्वेन साडी नेसणार असलात तर तुम्ही चुकूनही त्यावर भरजरी दागिने घालू नका. यामुळे तुम्ही ओव्हररेटेड दिसाल. सिक्वेन साडी ही अत्यंत स्टायलिश असते. त्यासाठी कोणत्याही अतिरिक्त दागिन्यांची गरज भासत नाही. पण तुम्हाला जर दागिने घालायचेच असतील तर तुम्ही यासह स्टोन अथवा मोत्यांचे अर्थात पर्लचे दागिने घाला. स्टोन आणि मोत्यांचे दागिने हे अत्यंत नाजूक आणि सुंदर असतात त्यामुळे सिक्वेन साडीसह ते उठावदार दिसतात. तसंच तुम्ही नेकलेस घालणार असाल तर तुम्ही कानातले घालू नका. यामुळे तुमचा लुक अधिक आकर्षक आणि उठावदार दिसेल.

गडद मेकअप करू नका (Do not put heavy makeup)

मेकअप हा तर महिलांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक महिलांना गडद मेकअप करायला आवडतो. पण सिक्वेन साडी नेसणार असाल तर तुम्ही मिनिमल मेकअप करणे गरजेचे आहे. सिक्वेन साडी अत्यंत ब्राईट असते. त्यामुळे त्यावर गडद मेकअप अजिबातच चांगला दिसत नाही. याशिवाय अशा साड्यांसह गडद मेकअप मॅच करत नाही. या साड्यांवर तुम्ही मिनिमल मेकअप आणि न्यूड लिपस्टिक अथवा लाईट रंगाची लिपस्टिक लावली तर तुम्ही अधिक आकर्षक आणि उठावदार दिसता. असा लुक तुम्हाला अधिक एलिगंट बनवतो. 

ADVERTISEMENT

हेअरस्टाईल (Hairstyle)

Instagram

सिक्वेन साडीसह तुम्हाला तुमची हेअरस्टाईलदेखील योग्य ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या साडी लुकसाठी तुम्ही त्याला साजेशी हेअरस्टाईल करायला हवी. त्यामुळे तुम्ही जेव्हा सिक्वेन साडी नेसाल तेव्हा तुम्ही बन, कर्ल लॉक्स, स्ट्रेट हेअर अशीच स्टाईल ठेवा. सर्वात चांगला पर्याय म्हणजे केस मोकळे ठेवणे अथवा स्ट्रेट हेअर. या साडीसह स्ट्रेट हेअरस्टाईल तुम्हाला अधिक एलिगंट दर्शविते. सिक्वेन साडीवर तुम्ही कधीही पोनीटेल अथवा वेणी घालणं योग्य नाही. या साडीसह ही हेअरस्टाईल अजिबातच चांगली दिसत नाही. 

जॅकेट अथवा श्रग (Jacket or Shrug)

सिक्वेन साडीबरोबर तुम्ही एथनिक जॅकेट अथवा श्रगचा वापर करू नका. ही फॅशन तुमच्या साडीचा लुक एकदम खराब करू शकते. एथनिक जॅकेट अथवा श्रग हे तुमच्या साडीसाठी परफेक्ट मॅच नाही. सिक्वेन साडीवर स्लिव्हलेस आणि ट्रेंडी ब्लाऊज अधिक उठावदार आणि शोभून दिसतो हे नेहमी लक्षात ठेवा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

22 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT