ADVERTISEMENT
home / Recipes
अशा पद्धतीने तयारी केलीत तर तुमची बिर्याणी नेहमीच होईल बेस्ट

अशा पद्धतीने तयारी केलीत तर तुमची बिर्याणी नेहमीच होईल बेस्ट

 

खूप जणांना बिर्याणी हा शब्द जरी उच्चारला तरी तोंडाला पाणी सुटतं. मस्त वेगवेगळ्या फ्लेवरच्या मसाल्यामध्ये घोळवलेली बिर्याणीतोंडाची चवच बदलून टाकते. माझे इतके मित्र आहेत ज्यांचे बिर्याणीवर अक्षरश: प्रेम आहे. त्यांच्यासोबत जेवणासाठी बाहेर जायचे ठरवल्यानंतर ते कोणत्याही हॉटेलमध्ये गेले की, बिर्याणीचा कॉलम शोधून.. ‘भैय्या एक फुल बिर्याणी’ अशी ऑर्डर देऊन मोकळे होतात. आता हीच बिर्याणी घरी करायची म्हटली की, अनेकांच्या तोंडच पाणी पळून जातं. कारण बिर्याणी म्हणजे किती तो घाट असे अनेकांना वाटते. कारण युट्युब किंवा फेसबुकवर रेसिपी पाहताना त्यांना ती करावीशी वाटते पण प्रत्यक्षात त्याची इतकी तयारी अनेकांच्या जीवावर येते. बिर्याणी उत्तम तेव्हाच लागते जेव्हा त्याचा मसाला उत्तम होतो. म्हणूनच आज तुम्हाला काही अशा टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमची बिर्याणी नेहमीच बेस्ट होणार आहे. 

हैदराबादमध्ये जाणार असाल तर इथे खा चविष्ट चिकन बिर्याणी

अशी करा पूर्वतयारी

बिर्याणीची पूर्वतयारी

Instagram

 

आता तुम्ही कोणत्या प्रकारची बिर्याणी करणार यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. कारण आता फक्त चिकन किंवा व्हेज अशी बिर्याणी राहिली नाही. तर आता मटण, अंडा, प्रॉन्झ, बासा, पनीर अशा काही फ्लेवरमध्ये बिर्याणी बनवता येते. त्यामुळे तुम्ही कोणती बिर्याणी बनवणार ते आधी ठरवा. 

ADVERTISEMENT
  • बिर्याणीसाठी साहित्याचे प्रमाण योग्य हवे. जर तुम्ही चार माणसांसाठी बिर्याणी बनवत असाल तर तुम्हाला दोन वाटी तांदूळ हा पुरेसा असतो. कारण त्यामध्ये तुम्हाला अजून तुम्हाला भाज्या किंवा चिकन हे देखील घालायचे असते. त्यामुळे आपोआपच बिर्याणी दुप्पट होते. 
  • बिर्याणीसाठी साधारणपणे तमालपत्र, जावेत्री, दालचिनी मोठी वेलची, छोटी वेलची, जायफळ पूड इतके मसाले पुरेसे असतात. पण तरीही जर तुम्हाला लवंग, काळीमिरी आवडत असेल तर तुम्ही त्याचा वापर करु शकता. पण अनेकदा लवंग किंवा काळीमिरी दाताखाली आली की पदार्थ नकोसा होतो. पण व्हेज करताना काळीमिरी आणि लवंग मस्ट आहे. त्यामुळे तुम्ही हे  थोडे स्मॅश करुन वापरली की चांगली लागते. 
  • बिर्याणी म्हटलं की, त्यात भरपूर कांदा घातला जातो. साधारण चार माणसांसाठी बिर्याणी करताना त्यामध्ये दोन मोठे कांदे पुरेसे असतात. आता तुम्ही अंदाजानुसार तुम्ही कांदा वापरा. 
  • बिर्याणीमध्ये भाज्यांची निवड महत्वाची असते. म्हणजे व्हेज बिर्याणी करताना मटार, गाजर, फरसबी, बटाटा, फ्लॉवर( आवडीनुसार) तुम्ही निवडू शकता. 
  • बिर्याणी शिजवण्यासाठी जर तुम्ही कुकर वापरणार असाल तर तुमची बिर्याणी दोन शिट्टीमध्ये तयार होते. आणि जर कढई किंवा एअर टाईट भांड्यात करणार असाल तर त्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिटांचा दम पुरेसा असतो.
  • बिर्याणीला सुंदर रंग येण्याआधी केशरचा वापर केला जातो. ही केशर तुम्ही आधीच दोन मोठे चमचे घेऊन दूधात भिजवून ठेवली तर तुम्हाला शेवटी त्याचा वापर करता येतो. 

वाचा – प्लेन डोसा रेसिपी (Plain Dosa Recipe In Marathi)

बिर्याणी करताना

अशी करा सुरुवात

Instagram

 

  • बिर्याणीची सुरुवात करण्याआधी तुम्ही तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.तांदूळ निथळून ते साधारण अर्धा तास ठेवा. ज्यावेळी तुम्ही मसाल्याची तयारी सुरु कराल तेव्हा एका बाजूला तांदूळ शिजवायला घ्या.
  • बिर्याणीमध्ये तळलेला कांदा वापरला जातो. त्यामुळे तुम्ही कांदा चिरुन तो छान गोल्डन ब्राऊन तळून घ्या. 
  • आता कुकर किंवा बिर्याणी करत असलेल्या भांड्यामध्ये दोन मोठे चमचे तेल किंवा एक चमचा तूप आणि एक चमचा तेल घाला. आता व्हेज बिर्याणी करत असाल तर तमालपत्र, काळीमिरी, लवंग,शाही जीरं दालचिनी, मोठी वेलची, छोटी वेलचीचा वापर करा. नॉनव्हेज बिर्याणी करत असाल तर तमालपत्र, जावेत्री, मोठी वेलची,छोटी वेलची, शाही जीरंआलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या. 
  • खडा मसाला हा जास्त करपता कामा नये. त्यावरच तुमच्या बिर्याणीची चव अवलंबून असते. 
  • आता तुम्ही ग्रेव्हीसाठी टोमॅटो वापरत असाल तर फारच चांगले त्यामुळे तुमच्या बिर्याणीला एक छान बेस मिळतो. बिर्याणी कोणतीही असो तुम्ही त्यात दह्याचा वापर करु शकता. 
  • दही घातल्यानंतर बिर्याणीचा मसाला खूप शिजवू नका. कारण त्यामुळे मसाला आटण्याची शक्यता असते. 
  • आता या मसाल्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या. चिकन, मासे, उकडलेली अंडी असे घालून परतून घ्या. चिकन असेल तर ते शिजायला थोडा वेळ घेते. अशावेळी मंद आचेवर ते शिजवा. 
  • साधारण मसाला ¾ शिजला की गॅस बंद करुन ते भांडे बंद करुन तसेच ठेवा. 
  • आता वेळ वाचवण्यासाठीच तुम्हाला मसाला सुरु करताना एका भांड्यात भात शिजवायला घ्यायचा आहे. चांगल्या प्रतीचा लांब बासमती तुम्हाला यासाठी आवश्यक असतो. वर सांगितल्याप्रमाणे तो आधीच धुवून निथळत ठेवा. आता भात शिजवणार त्या भांड्यात चक्रफूल, लवंग, काळीमिरी आणि तेल, मीठ घालून पाणी गरम झाले की, त्यात तांदूळ शिजत ठेवा. भातही साधारण ¾ शिजवा.  शिजलेल्या तांदूळाचे पाणी फेकू नका. ते बिर्याणी शिजवण्यासाठी कामी येते. त्यामध्येच सगळे फ्लेवर असतात.
  • बिर्याणीमध्ये महत्वाची असते लेअरिंग जर तुम्हाला खूप वेळ नसेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यातच शिजलेला तांदूळ घालून हलक्या हाताने परतून दोन शिट्ट्या काढून शकता. 
  • लेअर करणार असाल तर तुम्हाला सगळ्यात आधी भांड्यामध्ये तेल घालायचे आहे. बिर्याणीची तयार ग्रेव्ही बॉटमला पसरवून त्यावर तांदूळ मग पुन्हा मसाला असे थर लावायचे आहेत. प्रत्येक थरावर तुम्हाला तुम्ही तळलेला कांदा घालायला विसरायचे नाही. तर साधारणपण ग्रेव्ही- भात- भात शिजवलेले पाणी- कांदा- केशराचे पाणी- चिरलेली कोथिंबीर- पुदिन्याची पानं(आवडत असतील तर)-तूप घाला.  अगदी शेवटच्या थरालाही तुम्हाला हेच करायचे आहे. 
  • आता भांडे बंद करुन तुम्हाला मळलेली कणीक भांड्याच्या अवतीभोवती लावून बिर्याणीला दम द्यायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कणीक लावण्याआधी कोळसा गरम करुन एका वाटीत घेऊन त्यावर तूप सोडून ही वाटीसुद्धा त्यात दोन मिनिटं ठेवू शकता. छान स्मोकी फ्लेवर येतो. ( हे तुम्ही ग्रेव्ही करताना केले तरी चालू शकते.)

गुलाबी शहर जयपूरचा फेरफटका, शॉपिंग आणि बरेच काही…मग तुम्ही कधी जाताय?

मग अशा पद्धतीने घरच्या घरी स्वादिष्ट आणि चविष्ट बिर्याणी करा. 

ADVERTISEMENT
05 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT