ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ‘रॉकेट्री’चं कौतुक, आर माधवनसोबत पाहिली झलक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ‘रॉकेट्री’चं कौतुक, आर माधवनसोबत पाहिली झलक

अभिनेता आर माधवन लवकरच सर्वांसमोर त्याच्या आगामी चित्रपट रॉकेट्री: दी नाम्बि इफेक्टमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. हा चित्रपट भारतीय वैज्ञानिक नांबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून तो खूपच चर्चेत आहे. एवढंच नाही या ट्रेलरची झलक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दाखवण्यात आली असून. पंतप्रधानांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. पंतप्रधानांनी या चित्रपटासाठी टीमचं कौतुक केलं आहेच शिवाय नांबी नारायण यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत ज्या भावना शेअर केल्या त्यामुळे नांबी नारायण आणि आर माधवनही भारवून गेले. 

आर माधवनची पोस्ट व्हायरल

आर माधवनने या क्षणांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आर माधवनसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वैज्ञानिक नांबी नारायणदेखील दिसत आहेत. या पोस्टसोबत आर माधवनने  शेअर केलं आहे की, काही  दिवसांपूर्वी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एअरोस्पेस इंजिनिअर नांबी नारायण यांना भेटण्याची संधी मिळाली. आम्ही यावेळी माझ्या आगामी चित्रपट #rocketrythefilm वर भरपूर चर्चा केली. चित्रपटाची क्लिप पाहाताना आणि नाम्बि यांच्यासोबत झालेल्या गैरव्यवहाराबाबत पंतप्रधानांनी दिलेली प्रतिक्रिया ह्रदयस्पर्शी होती. या सन्मानासाठी मी त्यांचा खूप खूप कृतज्ञ आहे ” आर माधवनची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रॉकेट्रीच्या ट्रेलरलाही मिळतोय चांगला प्रतिसाद

रॉकेट्र: दी नाम्बि इफेक्टचा ट्रेलर एक एप्रिलला प्रदर्शित करण्यात आला. मात्र एक एप्रिलला तर एप्रिल फूल करण्याची पद्धत आहे. त्यामुळे या दिवशी हा ट्रेलर प्रदर्शित करण्यामागचं कारण काय असं विचारल्यावर आर माधवनने सागितलं की, एकदा नांबी सर म्हणाले होते की किती मुर्ख लोक अशी असतील जे माझ्यासारखी देशभक्ती करत असतील. या गोष्टींवर विचार करत निर्मात्यांनी एक एप्रिलला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित कऱण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाद्वारे त्या सर्व देशप्रेमींना ट्रिब्युट करण्यासाठी ही तारीख चित्रपटाच्या ट्रेलरसाठी निवडण्यात आली. हे आपल्या देशातील असे लोक आहेत ज्यांनी भारतावर वेड्यासारखं प्रेम केलं.

काय असणार रॉकेट्रीचं कथानक

रॉकेट्री दी नाम्बि इफेक्टमध्ये वैज्ञानिक नांबी नारायण यांची भूमिका आर माधवन साकारत आहे. या  चित्रपटात शाहरूख खानही एका छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अशा काही घटना दाखवल्या जाणार आहेत ज्यावरून नांबी सरांचे देशप्रेम आणि त्यांच्यासोबत झालेला अन्याय जगासमोर येईल. नांबी नारायण यांचा जन्म १९४१ साली तामिळनाडू येथे झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना इस्रोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपावण्यात आली होती. मात्र या प्रोजेक्टमध्ये त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले होते.पुढे त्यांच्यावर लावलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध झालं. मात्र त्यामुळे नांबी नारायण यांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. या चित्रपटात याच प्रकरणावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. नांबी नारायण यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते आणि प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

अर्जून कपूरने शेअर केला मंगळसूत्राचा फोटो, मलायकासाठी केलं का खरेदी

फ्रँड्री’मधली शालू या कारणामुळे पुन्हा आली चर्चेत

ADVERTISEMENT

‘फुलराणी’ येणार रुपेरी पडद्यावर,शूटिंगला सुरुवात

05 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT