ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
या कारणासाठी हनिमूनला नाही जाणार राजकुमार राव आणि पत्रलेखा

या कारणासाठी हनिमूनला नाही जाणार राजकुमार राव आणि पत्रलेखा

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचे लग्न 15 नोव्हेंबर 2021 रोजी धुमधडाक्यात पार पडले. सोशल मीडियावर सध्या साखरपुडा ते लग्नसोहळ्याच्या फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. राजकुमार पत्रलेखाला अनेक वर्ष डेट करत असल्यामुळे दोघांच्या आयुष्यात आता हे आनंदाचे क्षण आले आहेत. राजकुमार आणि पत्रलेखा 11 वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. सहाजिकच लग्नानंतर चाहत्यांना आता राजकुमार आणि पत्रलेखा हनिमुनला कुठे जाणार याची उत्सुकता लागली आहे. मात्र लग्नसोहळ्यानंतर लगेच हनिमुनला जाण्याचा त्यांचा प्लॅन नाही. यामागे एक मोठे कारण दडलेले आहे.

एकता कपूरने केली ‘नागिन 6’ ची घोषणा, ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

राजकुमार आणि पत्रलेखाने यासाठी स्किप केला हनिमून

लग्नानंतर हनिमूनला जाणं हा प्रत्येक नवीन जोडप्यासाठी खास क्षण असतो. त्यामुळे लग्नाआधीच हनिमूनला जाण्याचं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. एखाद्या सेलिब्रेटीचं लग्न झालं की त्याच्या साखरपुड्यापासून हनिमूनपर्यंतच्या सर्व अपडेटवर चाहत्यांचं लक्ष असतं. मात्र राजकुमार आणि पत्रलेखाच्या लग्नानंतर चाहत्यांना त्याच्या हनिमूनचं कोणतंच अपडेट मिळणार नाही आहे. कारण राजकुमार आणि पत्रलेखाने त्यांचा हनिमून सध्या स्किप केलेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्या दोघांकडे खूप पेंडिंग कामे आहेत. त्यामुळे हनिमूनला जाण्याआधी त्या दोघांना ती पूर्ण करायची आहेत. राजकुमार तर आजपासूनच म्हणजेच नोव्हेंबरपासूनच शूटिंगला सुरूवात करत आहे. त्याच्या आगामी चित्रपट भीडचं शूटिंग सध्या सुरू झालं आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हाला राजकुमारने आधीच त्याच्या डेट दिलेल्या होत्या त्यामुळे नोव्हेंबर ते डिसेंबर राजकुमार भीडचं शूटिंग करण्यात व्यस्त असेल. ज्यामुळे तो लग्नानंतर लगेच पत्रलेखाला हनिमुनला घेऊन जाऊ शकत नाही. 

‘टिप टिप पानी बरसा’ गाण्यातून गोविंदाचा कमबॅक, चाहत्यांनी दिल्या या प्रतिक्रिया

ADVERTISEMENT

राजकुमार आणि पत्रलेखाची लव्हस्टोरी

राजकुमार आणि पत्रलेखा अकरा वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. एका मुलाखतीत पत्रलेखाने सांगितलं होतं की तिने लव्ह सेक्स और धोका या चित्रपटात पहिल्यांदा राजकुमारला बघितलं होतं. त्यामुळे या चित्रपटातील भूमिकेप्रमाणे राजकुमार खऱ्या आयुष्यातही विचित्र असेल असं तिला वाटलं होतं. मात्र तसं झालं नाही. उलट नंतर ती त्याच्या प्रेमात पडली. राजकुमारने एका जाहिरातीमध्ये पत्रलेखाला पहिल्यांदा पाहिलं आणि तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. राजकुमार आणि पत्रलेखा 2010 मध्ये एकत्र आले आणि 2014 मध्ये त्यांनी सिटी लाइट चित्रपटात एकत्र काम केलं. पुढे त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली आणि आता त्यांनी लग्न करून हे नातं अधिक दृढ केलं आहे. 

हळदीसाठी खास बॉलीवूडची गाणी, तुमचेही पाय थिरकतील

18 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT